Tuesday, September 16, 2025
Homeबातम्यानिबंध स्पर्धा : अभूतपूर्व प्रतिसाद

निबंध स्पर्धा : अभूतपूर्व प्रतिसाद

“अभ्यास तोंडपाठ, लेखनात सपाट !” या मथळ्याखालील महाराष्ट्र टाइम्स मधील बातमी वाचली. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या लेखन क्षमतेवर, विचार शक्तीवर, आकलन क्षमतेवर झालेला परिणाम पाहून पालक आणि शिक्षकांची चिंता वाढली आहे, तसेच भाषा विषयात विद्यार्थी मागे पडत
असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आलेले असतांना हुंडाविरोधी चळवळीने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे.

सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारी सामाजिक संस्था हुंडाविरोधी चळवळीतर्फे राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विशेष बाब ही की गेल्या ३३ वर्षांपासूनच्या या उपक्रमात लॉकडाऊन मुळे खंड पडला नाही.

निबंधाचे विषय होते :-
(१) कोविड -१९ महामारीने काय शिकवले ?
(२) सोशल मीडिया शाप की वरदान
(३) २१ व्या शतकात धर्माचे स्थान.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी, हिंदी, आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये ८४३ निबंध स्पर्धेत दाखल झाले.
पहिल्या विषयावर ९२ महाविद्यालयांतून ४०४ निबंध, दुसऱ्या विषयावर ८७ महाविद्यालयांतून ३३९ आणि तिसऱ्या विषयावर ४९ महाविद्यालयांतून १०० असे एकूण ८४३ निबंध असा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच दर्शवतो की युवा पिढीची लेखन क्षमता अबाधित असून युवकांची सकारात्मक विचार शक्ती समाजाला आणि पर्यायाने देशाला उज्वल भविष्य देण्यासाठी सक्षम आहे. देशात नुकताच राष्ट्रीय युवा दिन साजरा झाला असून त्या निमित्ताने हा अहवाल सादर होत आहे ही अतिशय समाधानाची बाब आहे.

चळवळीच्या युवापिढी साठी प्रदीर्घ काळ राबवलेल्या जाणीव जागृतीच्या उपक्रमाचे हे यश मानावे लागेल. या स्पर्धेचा निकाल २६ जानेवारीपर्यंत लागणे अपेक्षित आहे, असे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.

आशा कुलकर्णी

– लेखन : आशा कुलकर्णी.
महासचिव – हुंडाविरोधी चळवळ, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. फारच छान…
    आमच्या महाविद्यालयाला या स्पर्धेचा एक घटक होता आले याबद्दल आपले मनस्वी आभार…
    Vivekanand College of Agriculture Business Management, Hiwara Bk.

  2. फारच छान…!
    मनापासून धन्यवाद..!
    … प्रशांत थोरात,पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
    9921447007
    9850573747

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं