भेट व्हावी गोड गुळाशी
स्नेहल स्निग्ध तिळाची
अशीच भेटत रहा सखे
बनून वडी तिळगुळाची
स्पर्श वणवा स्नेहाचा
भाजेल खरपूस तीळ
धगधगत्या स्पंदनांवर
बनेल पाक मधूर गूळ
एक एक बोलू लागतील
तीळ, शेंगदाणे व काजू
एकमेका भेटल्यावर
मांडतात आपली बाजू
गुण ग्राही खरा तो गूळ
मैत्री इवल्या तिळाची
भेटताच दोघे पहिल्यांदा
घट्ट वीण जमते दोघांची
कणा कणाने वाढत जातो
स्नेह वृद्धिंगत तिळाचा
अशीच राहावी भेटत सखे
गोडवा जपताना ओठांचा

– रचना : विलास कुलकर्णी
छान कविता विलास कुलकर्णी. तिळगुळाची गोडी कवितेत उतरली आहे.
डॉ गौरी जोशीचा अभ्यास पूर्ण लेख.. आचार्य अत्रे च्या कवितेवर वेगळेपण सांगण्याचा त्यांनी छान प्रयत्न केला.