नमस्कार, मंडळी.
आपल्या पोर्टल साठी काही नवीन सदरं, विषय सुचविल्या गेली आहेत. आणखी काही विषय सुचवायचे असतील तर अवश्य सुचवा. पोर्टल आपलंच आहे. असो…
या आठवड्यात प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
– देवेंद्र भुजबळ. संपादक
षड्रिपू अत्यंत आत्मपरीक्षण करायला लावणारा लेख. खूपच छान.
– सुनिता नाशिककर.
निवृत्त पोलिस उपअधीक्षक
म कल्याणपूर यांचे दैवी सूर लाभलेले भावगीत…. रात्र आहे पौर्णिमेची… छान गाण्याची आठवण ठेवली… धन्यवाद..
– अलका अग्निहोत्री
सुरेश दंडे यांचा परिचय भावला.
– अशोक डुंबरे.
I happened to read a nice post sent by Mr Devendra Bhujbal ex official from State govt’ s dept of public relation& information.
Most of us know from our child hood through school education , literature , social observation etc about six enemies within us” Shad Ripu”
Still there is a need to read this article of this writer.
It is many times a bit natural to experience the erruption of these enemies .
But when it is in reasonable ambit it may not harm unless it Crosses – ” line of limitation”
The article has a nice description of virtuous person who can control the six enemies.
This article will help for self realisation and self assessment.
– Mrs Nirmala Prabhavalkar
X – Chairperson
Women State Commission
व्वा… देवा, गझलगायक सुरेश दंडे … छान लेख.
– प्रा विसुभाऊ बापट, मुंबई.
गौरी कंसाराचा लेख अप्रतीम !!
– राधिका भांडारकर, पुणे
मधुसिंधू कोठे उपलब्ध आहे हे कळविल्यास उत्तम. वाचण्याची इच्छा आहे.
– शशिकांत गंधे उर्फ गंधेकाका
टीव्ही सिरीयल कलाकार
प्रकाश फसाटे यांचा षड रिपू वरील लेख उत्तम खूप छान प्रकारे त्यांनी षड रिपू बद्दल माहिती दिली👍👍
भीमथडी जत्रा हा फरझाना मॅम यांचा लेख खूप छान वाटला जत्रा किंवा फन फेअर मध्ये खूप वेळा विक्री होत नाही.आणि मग नक्कीच विक्री करणाऱ्या डिप्रेशन येत असावे त्यांनी ते खूप छान मांडले आहे.
तामिळनाडूतील सायलेंट व्हॅली च सुंदर दर्शन घडवले मनीषा ताईंनी👌🏻
पाणी म्हणजे जीवन पाणी संभळून वापरुया सांगणारी ज्योत्स्ना मॅम ची कविता खूप सुंदर👌🏻
खूप सुंदर लेख आणि कविता धन्यवाद टीम एनएसटी, देवेंद्र भुजबळ सर आणि अलका ताई🙏🏻
बहुआयामी आदरणीय जिजामाता यांच्या वरील अंजू निमसकर यांचा लेख खूप छान जिजामातांना कोटी कोटी प्रणाम🙏🏻
स्वामी विवेकानंद यांची जयंती ,त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू सांगणारा उपासनी महाराजांचा अक्षर योगी हा लेख खूपच छान आहे.
ओठावरलं गाणं रात्र आहे पौर्णिमेची… गाण्याचे रसग्रहण विकास भावे यांनी सुंदर शब्दात मांडले आहे.
पूर्णिमा शिंदे यांचा जिजाऊं वरील पोवाडा छान👌🏻
धन्यवाद देवेंद्रजी आणि अलका ताई.
येशुदास त्यावेळचे प्रसिद्ध गायक त्यांची खूप गाणी गाजली आतिशय तरल शांत आवाज त्यांचे का करू सजनी, गोरी तेरा गाव बडा प्यारा आणखी बरीच गाणी आम्ही गुणगुणत असायचो. त्यांचे 81वर्षात पदार्पण झाले अभिनंदन आणि छान माहिती दिल्या बद्दल धनंजय कुरणे यांना धन्यवाद🙏🏻
बिच्चारे पुरुष रश्मी हेडे ताईंचा लेख मस्तच👍
प्रा विसुभाऊ बापट यांचे अनेक किस्से वाचायला मिळतात त्यांचा क्रमशः असलेला लेख सुंदर आहे.
नयना ताईंची प्रश्न कविता साधी सरळ आणि खूप सुंदर आपलीच वाटावी इतकी छान👌🏻👌🏻👌🏻
गझल गायक सुरेश दंडे बद्दल खूप छान माहिती मिळाली त्यांच्या पुढील वाटचाली करिता मनःपूर्वक शुभेचछा.
डॉ गौरी जोशी यांचा अभ्यास किती मोठा आहे त्यांनी आचार्य अत्रेंवर लिहिलेला लेख अप्रतिम दोनवेळा वाचला खूप सुंदर गौरी ताई👍👍
गिरणारचा परिक्रमेची गोष्ट ऐकायला आवडेल बरं गंधे काका.
निवृत्त पोलिस अधिकारी सुनिता ताईंचा लेख क्रमशः आहे नेहमीच वाचते खरचं ताई ही शौर्य गाथा आहे आमच्या करिता🙏🏻
आयुष्यावर बोलू काही….निशिकांत धुमाळ यांची रचना खूप छान👌🏻
धन्यवाद देवेंद्र भुजबळ सर आणि टीम. धन्यवाद अलका ताई🙏🏻
शुभ संक्रांत🌷
विलास कुलकर्णी यांची स्नेहल भेट ही रचना तीळ गुळाच्या अवीट गोडीची आहे.
मराठी निबंध लेखन स्पर्धेला खूप प्रतिसाद मिळाला ऐकून बरं वाटलं जाणीव जागृती उपक्रमाला खूप यश मिळू दे 🙏🏻खूप छान आशा ताई.
विश्वास सोहनी यांचा नगर वरील लेख मस्त खूप माहिती मिळाली नगर ची मी पण एकदा मैत्रिणीकडे गेले होते नगर ला.परत जायला मिळाले तर नक्की जाईन.
आणीबाणी आम्ही पाहिली आहे शाळेत होते मी तेव्हा खूप विचित्र बातम्या यायच्या जयप्रकाश नारायण, वाजपेयी वगैरे मोठ्या व्यक्तींना अटक झाली होती. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत असे ऐकायला मिळायचे हुकूमशाही येणार असे म्हंटले जायचे.आम्ही आणीबाणी खूप जवळून अनुभवली आहे कारण माझी आई सोशालिस्ट पार्टी ची कार्यकर्ती होती .डॉक्टर साहेब तुम्ही पुन्हा आठवणी जाग्या केल्या.
मधुसिंधू बद्दल छान माहिती सर्व कवियात्रिंचे मनःपूर्वक अभिनंदन माधुरी ताईंचे अभिनंदन💐
धन्यवाद टीम एनएसटी, भुजबळ सर आणि अलका ताई.
– सुप्रिया सावंत
स्नेहल भेट
डॉ गौरी जोशीचा अभ्यास पूर्ण लेख.. आचार्य अत्रे च्या कवितेवर वेगळेपण सांगण्याचा त्यांनी छान प्रयत्न केला.
– विलास कट्यारे नाशिक
नवा श्वास
Nice to know that you are socializing with people
in usa,every one is suffering in corona period, i think to overcome any disability is like an achievement,its just like how you feel after prolonged illness same as after psychological treatment or recovering fractured tooth or leg.
– Gayatri dhok
मनातील कविता…
वा! वा!
गौरीआज तर एक मनातला काव्य खजीनाच ऊघडलास..
प्र के अत्रे म्हणजे महान चतुरस्त्र व्यक्तीमत्व…
त्यांच्या साहित्याची गोडीच अवीट…आणि या सार्या आठवणीतल्या कविता वाचताना मन कसं मोहरलं..
सुरेख अभ्यास पूर्ण आणि रसयुक्त लेख…..
– राधिका भांडारकर
गझलगायक सुरेश दंडे
सुरेश नाव असलेले सर्वांना मी उच्च पदावर विराजमान होताना पाहिले आहे .
– विलास कुलकर्णी
ओठावरलं गाणं…
ओठावरलं गाणं सदर झालंय
सर्व रसिकांच्या आवडीचं
मनापासून अभिनंदन करतो मी
कविवर्य विकास भावे सरांचं
चित्रकाव्य असो वा गाण्याचा अर्थ
यातून साधतो हा अवलिया चक्क परमार्थ
माय मराठीची सेवा आणि रसिक रंजन
यात होऊन जातो हा ध्येयवेडा अगदी गर्क
या अष्टपैलू कोहिनूर हि-याचे
कसे मानू कळे ना मज आभार
प्रेमपूर्वक अर्पण करतो माननीय विकासजींना
वाढदिवसाच्या शुभेच्छांचा हार
– राजेंद्र र.वाणी
कुटुंब रंगलंय काव्यात – भाग – ११
विसुभाऊंची कार्यक्रमाविषयीची तळमळ खरोखरच प्रशंसनीय आहे,
– राधिका भांडारकर
येसूदास @ 81
येसूदास यांची जन्म तारीख 10 जानेवारी 1940 आहे. तसं पाहिलं तर ते 82 वर्षाचे झाले. मग 81 कसे काय लिहिले आहे? कदाचित हा लेख गेल्या वर्षी चा जसाच्या तसा पुन्हा एकदा प्रसिद्ध केला आहे का?
शंका आली म्हणून लिहिले आहे.
– साहेबराव माने.
येशूदास यांच्याबद्दल अधिकची माहिती मिळाली, लेख चांगला आहे, धन्यवाद.
– हिरालाल पगडाल
अनाथांची माई
अनाथांची माय माऊली सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली अर्पण करणाऱ्या सर्व कवयित्रीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद
– श्री. अंकुशराव तानाजी
जीवनामृत
खुप यथार्थ, योग्य शब्दांत पाण्याचे महत्व कवितेत वर्णिले आहे. बक्षिसास पात्र अशीच आहे. मन:पूर्वक अभिनंदन जोत्स्ना तानवडे.
– लीना फाटक. यु. के.
भीमथडी यात्रे बद्दल बरेच दिवस ऐकते आहे. इकबाल ह्यांनी छान वर्णन केलं आहे. गावाहून येणाऱ्या कष्टकरी महिलांचं वर्णन ऐकून कमाल वाटली त्यांची. गावाकडून येणाऱ्या भाज्या आणि गोधड्या हे जत्रेच वैशिष्ट्य आहे अस ऐकल होत पण त्याचा उल्लेख नाही, कदाचित आता हे बदल झालेही असतील. परंतु एका नावाजलेल्या प्रदर्शनाची उत्तम ओळख झाली, धन्यवाद..
– सुनंदा पानसे
मदन लाठी : 77 वे रक्तदान
थोर समाजसेवक मान.श्री.मदन लाठी
यांचं वय ६२, रक्तदान मात्र केलं चक्क ७७ वेळा
देशभक्त मदनभाऊंनी फुलवला
प्रेम सेवा त्याग भक्तीचा मळा
त्यांच्या मनोगतातून दिसून येतो
पोलिसांबद्दलचा कळवळा
सदैव तत्पर असतात मदनभाऊ
दीन दुःखितांच्या मदतीला
थोरा मोठ्यांच्या कार्याची जाणीव
नेहमीच ते ठेवतात
वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन
कृतज्ञ भाव व्यक्त करतात
मनापासून करतो मी
मदनभाऊंचं अभिनंदन
प्रभूकृपेने फुलत राहो
त्यांच्या जीवनाचं नंदनवन
– राजेंद्र वाणी.
मायभूमीची ओढ
तुमची ओढ अगदी समजू शकते सुलभाताई ! अशा अनोळखी ठिकाणी वृक्षांच्या रूपात का होईना आपल्या जवळच्या खूणा भेटल्या की होणारा आनंद वर्णनातीत आहे.
– शिल्पा कुलकर्णी
दुध ऊतू जाऊ देऊ नका
शिल्पा कुलकर्णी, दूध उतू जाणे ह्या एका साध्या गोष्टीतून तुम्ही किती सुंदर आणि प्रभावी विचार तुमच्या लेखणीतून व्यक्त केले आहेत. चार लोक इतक्या जवळचे हवेत की ज्यांच्याशी तुम्ही मन मोकळ्या गप्पा करू शकाल, अगदी मनाच्या गाभ्यातल बोलून मुक्त होऊ शकला तर त्या सारखा आनंद दुसरा नाही. फार आवडल. अशाच लिहित्या रहा, खूप शुभेच्छा…
– सुनंदा पानसे
अतिशय सुंदर लेख…मोकळे व्हा ..ही संकल्पना आयुष्याचा पोत सुधारु शकते..
– राधिका भांडारकर
वाह् शिल्पा, आणखी एक छान लेख. जवळचे असे कोणीतरी प्रत्येकालाच असावे व आपणही कोणाचेतरी “जवळचे” व्हावे. अगदी बरोबर.
– लीना फाटक. यु. के.
देशाचा अभिमान : अलौकिक मुले
नमस्कार सर, खुपच छान माहिती ,आतापावेतो माहिती नव्हती. खुपच छान ,सर्वोत्तम उपक्रम. धन्यवाद सर.
– सोमनाथ साखरे