Saturday, July 5, 2025
Homeसाहित्यतुम्हीच सांगावं

तुम्हीच सांगावं

अशी मी तशी मी
माझं मीच कसं सांगावं
तुम्हीच प्रांजलपणे
नि:संकोच मत मांडावं

स्पष्ट आणि खरंखुरं
दोष मान्य करणार
तेव्हाच तर मी माझ्यात
बदल करू शकणार

…कारण

हसरी मी, म्हटलं तर
म्हणतील उगीच काहीतरी
बोलकी सांगितली तर
बडबडी कित्ती बाई

वाचन, लेखन, छंद
केव्हा काम करते ?
कामात वेळ मिळेना
स्वतःसाठी कधी जगते ?

टचकन डोळ्यात पाणी
रडूबाई सदानकदा !
दुर्लक्षून पुढे चालावं,
बिनधास्त असते सदा

सगळ्यांची करावी कामं
नको ठेवुस लाडावुन
पाणी घ्या ना हातानं
आलोय ना मी दमून

घोड्यावर बसून जाऊ ?
उतरून पायी चालावं ?
आहे तरी कशी मी ?
बरंय…इतरांनीच ठरवावं

पण…खूपच छान लिहिता
असं जेव्हा खर्र्खुर्र म्हणतात
सार्थक झालं लिहिण्याचं
गुदगुल्या होतात मनात

– रचना : सौ.भारती महाजन-रायबागकर. चेन्नई

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. मला पण नेहमी हा प्रश्न पडतो. कस वागावे ते कळत नाही त्यामुळे कविता मनाला खुप भावली. अगदी “खर्रखुर्र” सांगते आहे हं भारती. लिहिण्याचे सार्थक झाले असे वाटू दे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments