ठाण्यात गेली १३ वर्षे अजेय संस्था कार्यरत आहे. संस्थेतर्फे अनेक नवनवीन साहित्यिक कार्यक्रम, विविध नाटके केली जातात. तसेच झपुर्झा नावाची नाट्य चळवळ गेली ९ वर्ष सुरु आहे. नवोदित कलाकारांना अजेय मधे रंगभूमीच्या सर्व अंगासाठी मार्गदर्शन मिळते तसेच नवनवीन संकल्पना राबविल्या जातात. अजेयचा प्रत्येक कार्यक्रम हा हटकेच असतो. याच सर्व श्रेय संस्थेचे सर्वेसर्वा डॅा.क्षितिज कुलकर्णी व तरुण निर्माता श्री. गौरव संभूस यांना जातं. याशिवाय श्री. अवधूत यरगोळे व श्री. कार्तिक हजारे आणि कार्यकारिणीतील अनेक जणांचा यात हातभार लागत असतो.
अजेय संस्था दरवर्षी २६ जानेवारी रोजी एक विषय घेऊन संमेलन भरवते. या वर्षीचा विषय आहे ‘तेजायन’! हा कार्यक्रम तेजाचे विविध पैलू या
लेखक, दिग्दर्शक डॉ. क्षितिज कुलकर्णी यांच्या संकल्पनेवर आधारित आहे.
“तेजायन” २३ जानेवारी रोजी ॲानलाईन व २६ जानेवारी रोजी ॲाफलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणार आहेत.
२३ जानेवारी रोजी पुढीलप्रमाणे कार्यक्रम होतील.
१) काव्यसंमेलन : देशविदेशातील विविध कवि यात सहभागी आहेत.
२) तेजानुबंध: तेज या विषयावरील नाविन्यपूर्ण आविष्कार सादर होणार आहेत.
३) मी कशाला आरशात पाहू : सौदर्याची नक्की व्याख्या काय, तज्ञांकडून जाणून घ्या.
४) याबरोबरच एका वेगळ्या विषयावरील परिसंवाद होत आहे. ज्याचे नाव आहे, “जादू“
यामध्ये vfx, editing, दिग्दर्शन, तांत्रिक बाजू या सर्व गोष्टीवर परिसंवाद होणार आहे. या मध्ये दिग्दर्शक म्हणून विचार तसच vfx, editing या बद्दल चर्चा होणार आहे.
हे सत्र २३ जानेवारी ला ऑनलाईन होणार असून याची वेळ दु. ३ः३० वाजता आहे. या सत्रा मधून vfx सारख्या आधुनिक तंत्राबद्दल अनेक नवीन बाजू, विचार प्रेक्षकांना समजतील.
हा कार्यक्रम पूर्णतः ॲानलाईन असून तो खालील लिंक वर क्लिक करून पाहता येईल.
तसेच zapurza fb page like केल्यास संस्थे तर्फे वेळोवेळी होणाऱ्या कार्यक्रमाचे अपडेटस् मिळत राहतील.
zapurza fb page लिंक – http://Fb.me/zapurza2022
२६ जानेवारी रोजी
मराठी ग्रंथ संग्रहालय, स्टेशन रोड, ठाणे येथे होणाऱ्या
कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे असेल :-
१) सकाळी १० वाजता : कार्यक्रमाचे उद्घाटन व त्यापाठोपाठ ‘तेजशब्दोत्सव’ हे काव्यसंमेलन
२) ११.४५ वाजता : “कलाकार कसा घडतो” या विषयावरील चर्चासत्र.
३) दु. २ः३० वाजता : अभिवाचन, एकपात्री असे अनेक कलाविष्कार घेऊन तेजानुबंध सत्र
४) संध्याकाळी – ४ः३० : आपल्या भेटीसाठी येणार आहे ‘एका वाक्यात उत्तर‘ या व्यावसायिक नाटकाचे कलाकार.
५) संध्याकाळी ५ः३० : कार्यक्रमाचा समारोप.
तर अशा या ॲाफलाईन व ॲानलाईन भरगच्च कार्यक्रमांचा आस्वाद अवश्य घेऊ या ☺️

– लेखन : सौ. शिल्पा कुलकर्णी. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
खूप छान तेजायन संकल्पना. नेहमीप्रमाणे नाविन्यपूर्ण कार्यक्रम. 💐💐 हार्दिक शुभेच्छा!
शिल्पा, अजेय संस्थेच्या कार्याचा आणि कार्यक्रमांचा खूपच छान आढावा घेतलास आणि परिचय करुन दिलास… धन्यवाद 🙏