यु मिस “I do not like absent minded people in my lecture..”
अस म्हणून एका रुबाबदार, फ्लूएन्ट इंग्लिश बोलणाऱ्या एका तरुणाने रोमिला टोकल.. खूप राग आला आणि थोडं embarrassing झालं होतं.. आमच्या कंपनीत human resource development ह्या विषयावरचं लेक्चर होत..आणि त्यात एक्सपर्ट असलेला तो बोलत होता..
कित्येक कंपन्यांचा प्रॉफिट तो वाढवून देत असे.. कॉर्पोरेट मध्ये त्याच्या नावाचा दबदबा होता..
लग्नानंतर ही जेव्हा कधी लक्ष नसायचं, तो काय सांगतोय ह्याकडे, तेव्हा तो यु मिस करत तोच डायलॉग बोलायचा आणि ती ..ती हातात जे काही असेल ते घेऊन त्याला मारायला धावायची.. मग तो हात घट्ट धरून, तिला मागून पकडून, “आठवतंय ना ते” अस बोलून मिठी मारायचा.. हे बघून दोन्ही मुलं पिनाकीन आणि सुकांता, ते लहान असताना ही मजा बघायचे आणि हसायचे, मोठे झाल्यावर “we also want such love in our life” अस म्हणायचे..आणि अवि त्यांना अंगठा दाखवून येस अशी खुण करायचा.. हम्म..किती सुंदर दिवस होते ते..घरभर आनंद आणि सुखच सुख !
लेक्चर झाल्यावर तो आपणहून पुढे आला आणि सॉरी म्हणत हात पुढे केला, “मी अविनाश साठे, कॉफी घेणार सोबत ?” अस विचारत ..
भारावून ती नकळत हो म्हणाली…पहिल्या भेटीतच त्याच्या मनमोकळ्या स्वभावाचा प्रत्यय आला..कामात मात्र एकदम particular..म्हणून तर एवढ नाव होतं त्याच..अगदी स्वप्नवत भेट होती ती..त्या भेटीत तो म्हणाला “मी लेक्चर देताना प्रत्येकाने ते नीट ऐकाव, ह्यासाठी जरा जास्तच वेडा आहे मी..”
ती म्हणाली “ok.. माझ्या डोक्यात काही वेगळंच सुरू होत..तुम्ही बरोबर ओळखलंत..”
त्याच्या सल्ल्याने मॅनेजमेंट ने काही बदल केले आणि कंपनी चा फायदा झपाट्याने वाढला..
आणि त्याच्या बंगलोर च्या फेऱ्याही..
तिलाही प्रमोशन मिळालं होतं, त्याच्या सजेशन चा पुरेपूर उपयोग केला होता तिने..
एक दिवस बोर्ड मिटिंग मध्ये बोलावण्यात आलं..
पुढच आयुष्य ह्यातून च आकार घेणार आहे, ह्याची कल्पना तरी कुठे केली होती ?
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800