सोसले घाव किती कधीच मोजले नाही
अश्रुंचेही मोल जाणते उगीच ढाळत नाही
निघून जातो सूर्य संध्याछाया येता
निशाचरांची सोबत असता नाती हुडकत नाही
तू असताना काळोखाची कधीच भीती नसते
उजेड नसला तरी कशाची उणीव नसते
शिशिरामधल्या पानगळीने उजाड अंगण झाले
दैवावरती खापर त्याचे कधीच नाही फोडले
वेगवेगळ्या रंगांसाठी रक्त सांडले जाते
माणुसकीचा रंग कोणता कधीच समजत नाही

– रचना : स्नेहलता अंदुरे
रचना नक्कीच चांगली आहे…
मात्र गझल म्हटले की काही नियम लागू होतात…
त्यामुळे थोडी शंका…