भारताच्या इजिप्त मधील दूतावासा तर्फे २६ जानेवारी २०२२ रोजी कैरो येथे प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात व थाटात साजरा झाला. राजकीय, सामाजिक, डिप्लोमॅटिक व दूतावास कर्मचारी मिळून सर्व क्षेत्रातील एकंदर २५० निमंत्रित ह्या कार्यक्रमास उपस्थित होते.इंडिया हाऊसच्या विस्तीर्ण हिरवळीवर भारताचे राजदूत श्री. अजित गुप्ते ह्यांनी ध्वजारोहण केले. गुलाबाच्या पाकळ्या विखुरल्या आणि इंडिया हाऊसचे प्रांगण “जन गण मन” ह्या भारताच्या राष्ट्रगीताने दुमदुमून गेले.
विशेष म्हणजे वर्षातून मोजक्या ३-४ वेळा पडणारा पाऊस नेमका ध्वजवंदनानंतर अचानक धो धो कोसळू लागला. जणू तोही समारंभात उत्साहाने सामील झाला ! त्यामुळे वातावरणातील आधीचीच थंडी अधिकच वाढली. पण उपस्थितांचा उत्साह त्याचे स्वागतच करीत होता.
दूतावासाचा कार्यक्रम असल्यामुळे अनपेक्षित पावसाला तोंड देण्याची जय्यत तयारी होती. प्रांगणात अनेक तंबू उभारलेले होते.
ध्वजारोहणानंतर राजदूत श्री.अजित गुप्ते ह्यांनी निमंत्रितांना भारताच्या राष्ट्रपतींचा संदेश वाचून दाखवला. श्री. गुप्ते ह्यांनी त्यांच्या भाषणात गणतंत्र दिनाचे महत्व व स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान विषद केले .
कोविड च्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवरांना दोन बॅचेस मध्ये निमंत्रित केले होते.
यावेळी यथोचित अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था केली होती. कोविड, पाऊस किंवा थंडी भारतीयांच्या
राष्ट्रप्रेमावर पाणी फिरवू शकत नाही हेच ह्या दिमाखदार सोहळ्याने सिद्ध केले.
एक भारतीय म्हणून मला सार्थ अभिमान वाटतो.
गणतंत्र अमर रहे ! जयहिंद ! भारत माता की जय. 🙏

– लेखिका : सुलभा गुप्ते. ऑस्ट्रेलिया
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
ईजीप्त येथील भारतीय दूतवासात साजरा झालेला
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा नक्कीच अभिमानास्पद..