नमस्कार, मंडळी.
थोर लेखक, सामाजिक कार्यकर्ते डॉ अनिल अवचट यांच्या निधनानंतर आपण न्यूज स्टोरी टुडे चा विशेषांक प्रसिद्ध केला. डॉ अवचट यांची थोरवी अशी की, या विशेषांकातील 4 लेख अमरावती येथील प्रसिद्ध जनमाध्यम या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहेत. या वृत्तपत्राचे संपादक श्री प्रदीप देशपांडे यांचे मनःपूर्वक आभार.
जागतिक कॅन्सर दिनानिमित्त, अलका भुजबळ लिखित “कॉमा” पुस्तकाचे परीक्षण खूप वाचकांना भावले.त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.
चला, शतायुषी होऊ या !
हा उपक्रम व त्यावर आधारित लेखही खूप जणांना आवडला. तर चला, खरंच आपण आनंदाने शतायुषी होण्याचा संकल्प करू या.
पुढे या आठवड्यात प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया देत आहे.
आपलाच,
– देवेंद्र भुजबळ. संपादक
कॅन्सर : फुलस्टॉप नव्हे तर “कॉमा” !
अलकाताई, सामाजिक बांधीलकीतून, तुम्ही तुमच्या कर्करोगाशी केलेल्या झुंजीचे अनुभव पुस्तकरुपाने लोकांसमोर, मनोबल वाढवण्यासाठी मांडले हे खूपच स्तुत्य आहे…
या पुस्तकाचे नक्कीच स्वागत होणार. तुम्हाला भरभरुन शुभेच्छा !!
– राधिका भांडारकर
अलका, तुझ्या धाडसास सलाम ! रश्मी ह्यांनी दिलेला तुझ्या “कॉमा” पुस्तकाचा परिचय, साऱ्यांनी हे पुस्तक संग्रही ठेवून नक्की वाचावे.
मला वाटते, कॉमा म्हणजे स्वल्पविराम असला तरी तो कँसर सारख्या आजाराशी, धैर्याने सामोरे जाण्याची एक ताकद आहे.
– सौ. वर्षा महेंद्र भाबल.
काँमा हे अलका भुजबळ हिने लिहीलेले पुस्तक आवर्जून विकत घेऊन वाचले पुन्हा पुन्हा वाचले
केवळ महिलांनीच नव्हे तर सर्वांनीच वाचावे असे हे प्रांजळ कथन आहे.
खूपच महिला प्रापंचिक जबाबदाऱ्या, नोकरी व्यवसायात मग्न असताना प्रकृतीकडे दुर्लक्ष
करीत असताना दिसतात असे चित्र आपण नेहमीच पहातो, पण अलकाने खंबीरपणे या परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेळीच बाहेर येऊन आज इतरांपुढे एक उत्तम उदाहरण ठेवले आहे.
आणखी एक, मला सांगितल्यावाचून रहावत नाही
ते म्हणजे आपले नातलग आणि मैत्रिणी यांची साथ मिळते तरीही मटेनिलि आस्थापन अधिकारी
सहकारी यांची साथ मिळाली त्यामुळे यातून वेळीच सावरता आले ही बाब मला महत्त्वाची वाटते.
सध्या अलका इतरांना सुध्दा व्याख्याने आयोजित करुन मार्गदर्शन करीत आहे, खाजगी किंवा शासकीय आस्थापनांतून ज्या महिला या असाध्य आजाराला सामोऱ्या जातात आर्थिक प्रशासकीय अडचणीत
त्यांच्या नातेवाईकांची फरपट होते, तशी कुणाची होऊ नये यासाठी प्रयत्न केले तर समाजातील अनेक हे कार्य करण्यासाठी नक्कीच पुढे येतील असे या दिना निमित्त आवाहन करावेसे वाटते.
– सुरेखा पाटील. कवयित्री आणि मुक्तपत्रकार
🕉️🙏🏻 काँमा पुस्तकाचे रश्मी हेडे यांनी लिहिलेले परीक्षण वाचले. सौ.अलकाताई भुजबळ यांनी पुस्तकाचे शीर्षकावरूनच आपले असाधारण अनुभव प्रकट करून एक चांगला अविष्कार प्रकट केला आहे. पुस्तक अद्याप हाती आले नाही परंतु त्यात काय आहे हे रश्मीजींनी उत्तम प्रकारे सांगितले आहे. मला सौ अलकाताईंच्या व त्यांच्या कुटंबियांच्या मनोधैर्याचे खुपच कौतुक वाटते. काँमा स माझ्या मनापासुन हार्दिक शुभेच्छा.
लेखिका सौ अलकाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन..
🍈🕉️🙏🏻 सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक. नाशिक.
रमेश देव : उमदं व्यक्तीमत्व
देखणे आणि कसदार अभिनेते आपल्यातून निघून गेले. खरोखरच परमेश्वराने त्यांचे एक स्वप्न पूर्ण करायला हवे होते, ते म्हणजे आयुष्याची शंभरी पार करण्याचे. परंतु हेच सत्य की पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा हे त्यांचे गाणे इथे लागू पडले…
– श्री. अंकुशराव तानाजी
रमेश देव एक उमदं व्यक्तिमत्त्व👌👌
अतिशय छान आलेख मांडला आहे रमेश देव यांच्या कारकीर्दीचा👍👍🌹
सर्वच लेख सुंदर नेहमीप्रमाणेच👍👍
– प्रणाली म्हात्रे. मुंबई
प्रा.वर्षाताई गायकवाड : मला भावलेल्या…
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्या सुंदर साध्या सोप्या लेखनातून शिक्षणमंत्री प्रा.सौ. वर्षाताई गायकवाड यांचे तळमळीने भारावलेले व्यक्तिमत्व वाचण्यास मिळाले.
त्यांच्या हया धारावी मधील उपक्रमास खूप खूप शुभेच्छा !
सामान्य जनतेचा जाणता, सौ. वर्षाताई गायकवाड यांस, वाढदिवसा निमित्त लाख लाख शुभेच्छा !
– सौ. वर्षा महेंद्र भाबल.
आपण बऱ्याच दिवसापासून पहात आहोत की सर्व झोपडपट्ट्या जुगार अड्डे आणि दारूचे दुकान आणि आणि भयानक दारिद्र्याने व्यापलेल्या असतात. अशा या अंधारमय जीवनाला प्रकाश देण्यासाठी आणि त्यांचा शिक्षणातून उद्धार करण्यासाठी या. वर्षाताईंनी केलेले हे प्रयत्न अनमोल आहेत. अशी विचारधारा असणारे लोक मंत्रिमंडळात किंवा सत्तेत कमी प्रमाणात पाहायला मिळतात. मग ती सत्ता कोणाचीही व कोणत्याही पक्षाचे असो. त्यामुळे वर्षा ताईच्या या कार्यक्रमाला मानाचा मुजरा आणि सलाम…
– श्री. अंकुशराव तानाजी
चला, शतायुषी होऊ या !
उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्य साठी दररोज नित्यनेमाने चालणे, व्यायाम, योगा, प्राणायाम, केलेच पाहिजे.
भुजबळ साहेब आपण चला, शतायुषी होऊया ह्या आपल्या लेखात खूपच छान माहिती व अनुभव शेअर केले त्या बद्दल धन्यवाद. वजन कमी करण्यासाठी श्री रामदेव बाबा यांचे कोणते दोन चूर्ण वापरले त्यांची नावे लेखातून कळली असती तर बरे झाले असते. 🙏धन्यवाद
– मोहन आरोटे.
नेहमीच देवेंद्र सरांचे, वाचनात येणारे लेख, जीवन जगण्याची एक किल्ली देवून जातो. आजचा लेख तर जीवनाचा खरा मंत्र देवून गेला. आजच्या जीवनशैलीत औषधे म्हणजे अन्न झाले आहे. एक वेळ जेवण चुकेल पण बी पी ची गोळी चुकत नाही. अगदी खरे आहे सर !
खूप उपयोगी माहिती वाचनात आली.
धन्यवाद ! सर.
– सौ. वर्षा महेंद्र भाबल
नात्यांचे सर्व्हिसिंग…
तोरणे सर,
नेहमी प्रमाणे उत्तम परिक्षण. लेखकाच्या लेखनाची नाडी एखाद्या अनुभवी वैद्यांनी परीक्षा करावी तशी आपण नात्यांचे सर्व्हिसींग ह्या श्री विश्वास ठाकूर यांच्या पुस्तकाचे परिक्षण रुपाने केली आहे.
जसे एखाद्या पक्वान्नाची चव चोखंदळ व्यक्ती पारखतो तसे विश्वास ठाकूर यांच्या पुस्तक रुपी पक्वान्न आपण चाखले आहे. अभिनंदन
– ओमप्रकाश
काय महिमा सांगु जिजाऊ ची … घडविला स्वराज्य शिवराय घडविला तो इतिहास रचियला
– योगिता टोगे.
अंतरीचे भावपुष्प
खूपच मार्मिक आणि हृदय परिवर्तन करणारे विचार आहेत. वास्तविकतेचे दर्शन आहे.
– नवनाथ ठाकुर
“ओठावरलं गाणं”
वा, खूप सुंदर ! गीत, संगीत आणि स्वरसाज यांचा सुंदर मिलाफ असलेलं गीत भावे सर तुम्ही उलगडून दाखवलं आहे.👌👌
– सौ नूतन बांदेकर
विकास भावे यांचा गाण्यांचा खजिना उघडून दाखवण्याचा हा उपक्रम खरोखरीच चांगला आहे.
या बाबतीत ते रत्नपारखी आहेत त्यामुळे त्यांची निवडही चांगली असते.
तेजोनिधी लोहगोल हे काव्य दार्व्हेकर मास्तरांचे आहे हे अनेकांना माहितही नसेल.तेजाची उपासना असलेलं हे गीत केवळ अमर आहे. दाहक परी संजीवक असे असलेले सूर्याचे अस्तित्व ज्यांनी ओळखले त्या माणसांची दृष्टी काय असेल ?
साहित्यातील हा अमोल ठेवा विकास भावे यांनी आमच्यासमोर ठेवला आणि प्रेमाने त्यावर विवेचन केले. धन्यवाद विकासजी !
– मेघना साने.
माणूस व्हायचंय तुला !
सायली कस्तुरे यांची माणूस व्हयचंय् तुला ही कथा अतिशय सुंदर संदेश देते.
आजच्या स्पर्धेच्या जगात, माणूस माणूसपण गमावून बसलाय्..
पुढच्या पीढीवर चांगले संस्कार डोळसपणे करणे ही पालकांची जबाबदारी या कथेतून अतिशय सुंदर पद्धतीने मांडलीआहे..
मानसा मानसा कधी व्हशील तू मानूस…या बहिणाबाईंच्या प्रश्नाचं उत्तर या कथेत सापडतं,,.
सुंदर कथा…
– राधिका भांडारकर
नमस्कार सायली मॅडम !
तुमची कथा मनाला खूपच भावली. सतत मुलाच्या पाठीमागे लागणं हे चुकीचेच आहे पण त्याच्या वर नजर ठेवणं हे तितकेच महत्त्वाचे आहे. मुलाला सामाजिक भान आहे हे आईनं ओळखले म्हणून ती आपल्या मुलाला काहीच बोलत नव्हती.
सायली मॅडम नेहमी अशाच बोधप्रद कथा लिहित रहा. धन्यवाद.
– अनिल चाळके
कथा मनापासून आवडली. शालेय शिक्षण आणि त्यातील प्रगती महत्त्वाची आहेच पण व्यक्तिमत्वाचा समग्र विकास होण्यासाठी अन्य पैलूही तितकेच महत्त्वाचे आहेत आणि त्यातूनच खराखुरा माणूस घडू शकतो हा संदेश वाचकांपर्यंत पोहोचवण्यास ही कथा यशस्वी ठरलीय.
– अरुण कमलापूरकर
खूप सुंदर बोधप्रद कथा !
खूप खूप आवडली.
– विनोद पंचभाई.
खूप छान गोष्ट सांगितली सायली तू. फारच सकारात्मक वाटली. मी ही माणूस होण्याचा प्रयत्न करतो आहे. खूप शुभेच्छा
– रवींद्र कामठे.
“ओठावरलं गाणं”
कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी लिहिलेलं हे गाणं व जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि तितक्याच समर्थपणे वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं सूर्याचे वर्णन करणारे हे गीत मनाला आनंद देते व उत्साह निर्माण करते. आपण केलेले रसग्रहण हे नेहमीप्रमाणेच उत्तम जमले आहे.
– विवेक भावे.
इजिप्तमध्ये भारतीय प्रजासताक दिन उत्साहात साजरा..
ईजीप्त येथील भारतीय दूतवासात साजरा झालेला
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा नक्कीच अभिमानास्पद..
– राधिका भांडारकर
अनोखे आनंद निलायम
आनंद निलायम …एक चांगला समाजाभिमुख उपक्रम !!
– राधिका भांडारकर
उणीव
रचना नक्कीच चांगली आहे…
मात्र गझल म्हटले की काही नियम लागू होतात…
त्यामुळे थोडी शंका…
– राधिका भांडारकर
महाराष्ट्राचा चित्ररथ अप्रतिम
– सुनिता नाशिककर.
निवृत्त पोलिस उपअधीक्षक. मुंबई.
मोरेश्वर जोशी यांचा नाडीशास्त्र हा लेख आवडला. नवनवीन ज्ञान आणि वापर केला आहे… धन्यवाद… 💐
– सुधाकर धारव. निवृत्त माहिती उपसंचालक
“ओठावरलं गाणं”
अप्रतिम🌹
– स्नेहलता झरकर
सुभाष कासार यांची लग्नाचं वय … ही कविता प्रत्यके मुलींच्या व तिच्या आई वडिलांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. खरोखरच वास्तवादी कविता आहे.
धन्यवाद सुभाष कासार सर व भुजबळ साहेब👍🏻🙏🏻🙏🏻
– संजय अहिरे. नंदूरबार
🕉️🌼काकाणी नगर वाचनालयात बालपणापासून दहावी पर्यंत दररोज वर्तमानपत्र, गोष्टींची पुस्तके, चांदोबा आदि मासिके वाचण्यासाठी सायंकाळी नियमित जात असू. वाचनाची गोडी या वाचनालयामुळेच लाभली व ती आतापर्यंत (८२ वर्षे) चालू आहे यास्तव श्रेयाचे मानकरी काकाणी वाचनालय हेच आहे. समीना शेख यांनी वाचनालयाची नाबाद १५० वर्षे लेख फारच उत्तम प्रकारे लिहिला आहे. त्यांना धन्यवाद. डॉ. नवलराय शहा व मित्रवर्य दत्ता गवांदे याचे सातत्यपूर्ण कामामुळे वाचनालय महाराष्ट्रात प्रसिद्ध पावले आहे….
– सुधाकर तोरणे, निव्रुत्त
माहिती व जनसंपर्क संचालक, महाराष्ट्र शासन, हल्ली मुक्काम नाशिक. (मूळ मालेगावकर)
रमेश देव : आठवणीचा सुगंध
रमेश देव मराठी, हिंदी चित्रपट, दूरदर्शन मालिका गाजवणारे एक दिग्गज चरित्र अभिनेते. रसिक चाहत्यांचे लाडके. उमदे व्यक्तिमत्व, साधा, सरळ मराठमोळा.
त्यांची एक आठवण सांगते…
बऱ्याच वर्षांपूर्वी आम्ही दिल्लीला मुलाकडे गेलो होतो. माझा वाढदिवस होता म्हणून आम्ही रेस्टॉरंट मध्ये जेवायला जाऊ, म्हणून पायीच निघालो होतो. अचानक रस्त्यावरून चालत जातांना श्री रमेश देव दिसले. साधे कपडे, प्रसिद्ध अभिनेता सांगितले असते तर कोणी विश्वास ठेवला नसता. आमचा चित्रपटाशी संबंध फक्त पडद्यावर त्यांना पाहण्यापुरता. पण एक अभिनेता दिल्लीच्या रस्त्यावर पायी फिरताना बघून मी एक्साईट झाले.
मुलाला विचारून, मी भराभरा चालत त्यांच्या जवळ पोचले. त्यांना थांबवून आमची ओळख करून दिली.
“माझा वाढदिवस आहे, जेवायला जातोय. तुम्ही येता कां आमच्या बरोबर जेवायला ?”
काय सांगू ? ते लगेच “हो” म्हणाले.
“आई ! तुमचा वाढदिवस ! इतक्या प्रेमाने विचारताय. नाही म्हणणे शक्यच नाही.”
मस्त आनंदात हसत खेळत साध्याच गप्पा मारत जेवलो. निघताना मला हॉटेलातच वाकून नमस्कार केला. “येतो आई ! पुढच्या वर्षी वाढदिवसाला बोलवा.” तो दिवस पुन्हा आला नाही…
माझ्यासाठी अविस्मरणीय भेट, वाढदिवसाची.
मला “आई” म्हणून हाक मारलेले रमेशदेव आज आपल्याला सोडून गेले. आठवणीचा सुगंध मागे ठेवून.
– सुलभा गुप्ते. ऑस्ट्रेलिया
रमेश देव यांच्यावरील लेख वाचला. म्हणून मलाही रहावले नाही. रमेश देव यांच्याबद्दल काही आठवणी…
१९७४ साली मी लिंकींग मार्ग खार येथे तत्कालीन मुंबई टेलीफोन दू केंद्रला रुजू झाले.
सहा अंकाचे दु. क्रमांक होते, खूप अभिनेते खलनायक अभिनेत्री यांच्याशी सहज बोलणे होत असे, त्यामुळे रमेश देव सीमाजी यांच्याशी ओळख झाली. ३० जानेवारी रोजी ते म्हणाले होते की आज माझा वाढदिवस आहे, तेव्हापासून अनेक वर्षे आठवणीने शुभेच्छा देत असे त्यांची नाटके सुध्दा पाहिली जात, नंतर हळूहळू ☎️लँडलाईन बंद झाले, दरम्यान शिवाजी पार्क येथील पार्कक्लब मध्ये खेळताना दिसले पण मी व्यत्यय आणला नाही असो, अजुनही रमेश देव म्हणजे ५३२७०२ हा दूरध्वनी क्रमांक आठवतो आणि त्यांचा तो भारदस्त आवाज कानावर घुमतो आणि मी पुन्हा एकदा त्या १९७४ च्या काळात जाऊन पोहोचते, खूप छान आठवणी स्व.रमेश देव यांना आदरांजली 🙏🏼💐
– सुरेखा पाटील. मुंबई
👌👌सुंदर ओठावरील गाणे फारच सुरेख.
तेजोनिधि लोहगोल हे अभिषेकी बुवांच, आणि ऋणानुबंधाच्या हे कुमार गंधर्व ही मराठी नाट्य गितातील मैलाचे दगड (दगड शब्द या गिताबद्दल आणि गायकाबद्दल फारच थोटा वाटतो)
– शंतनू कडूसकर. श्रीरामपूर.
विसुभाऊ यांचे लेखन अतिशय सुंदर आहे. मी त्यांचा हा कार्यक्रम साधारण 1980 मध्ये बोईसरला पहिल्या रांगेत बसून पाहिला होता त्यांचा आवाज कविता म्हणण्याची पद्धत व त्यांचे गोड गोड दिसणे अगदी मनावर कोरले गेलेय तसेच ते आजही दिसत आहेत (फोटो) असे वाटते पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांची मला आवडलेली कविता “उन उन खिचडी सज्जूक तूप” स्पष्ट आठवतेय…..
– रेखा जोशी. नवी मुंबई.
🕉️🙏🏻रमेश देव यांच्यासंबंधीचा राधिका भांडारकर यांचा लेख आवडला.
– सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक. नाशिक
अप्रतिम शब्दांकन देवेंद्र सर🌹
डॉ. राव आणि टिमचे अभिनंदन आणि शुभेच्छा !💐
– स्नेहलता झरकर.
रमेश देव आणि किशोर कुमार लता मंगेशकर हे सर्व सारख्याच वयाचे होते. 1929 चा जन्म किशोरदा 1987 ला गेले. 34 वर्ष जगले फक्त 58 वय होते असो पण रमेश देव शेवट पर्यंत तंदुरुस्त होते.
– संदीप भुजबळ. संगमनेर
प्रणव सखदेव यांची मुलाखत छान आहे. या लेखकाचे निळ्या दाताची दंतकथा हा कथासंग्रह मी सध्या वाचत आहे. लेखनशैली खुप छान आहे…
– लक्षमीकांत विभूते. नवी मुंबई.
चला, शतायुषी होऊ या !
या लेखात खूपच छान, सुंदर माहिती दिली. धन्यवाद.
– सौ सुरेखा गोरख रासने. संगमनेर.
माझ्या आईला अन्ननलिकेचा कॅन्सर होता. माझ्या खूप जवळच्या मित्राची पत्नी ब्रेस्ट कॅन्सर ने गेली. रुग्णाच्या वेदना या निश्चितच खूप क्लेशकारक असतात. परंतु या आजाराने संपूर्ण घरच हतबल होऊन जातं. त्यामुळे तुमचे पुस्तक खूप प्रेरणादायी असेल असा विश्वास आहे. मुळात असं पुस्तक लिहीण्याची कल्पना सुचणे आणि इतरांना जगावे कसे हे शिकवणे याच खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे त्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि आणि आभार.
– प्रा डॉ किरण ठाकूर. पुणे
सुप्रभात
कॉमा,
खूप छान आहे लेख.
पुस्तक नक्की वाचेल.
– सायली कस्तुरे, दूरसंचार अभियंता. पुणे
प्रा डॉ किरण ठाकुर सर,
“या सगळ्या लेखनातून एक गोष्ट लक्षात येते आणि ते पदोपदी जाणवते की तेव्हाची पत्रकारिता ही मूल्यांवर आधारलेली होती. पण दुर्दैवाने आजची बहुतांश पत्रकारिता, काही सन्मान्य अपवाद वगळता, ‘मूल्यावर’ आधारित आहे. बहुतेक वेळा तर बातमीला तळटीप द्यावीशी वाटते की,
“वास्तव आणि बातमी यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. असल्यास तो योगायोग समजावा !”
– मिलिंद मधुसूदन आठवले. पुणे
प्रा डॉ किरण ठाकूर, आणीबाणीच्या त्या काळात तुम्ही पत्रकारांनी कोणत्या परिस्थितीत काम केलं याची कल्पना तुमचे लिखाण वाचून येते.
– सौ तेजस्वी ठाकूर, नाशिक
खतरनाक खत्री आणी अलेक्झांडर दि ग्रेट ।
अलेक्झचा जीवन प्रवास मस्त मांडला।
अभिनंदन ।
– अमर पांडे. सांगली
सलाम अलकाताई 🙏🌹💐
– स्नेहलता झरकर