Wednesday, March 12, 2025

ती ….

झोपेतून उठल्या पासून
घडाळ्याच्या काट्यावर पळत असते ती
डबा बनवून मुलांचं आवरून,
लोकल पकडायला धावत असते ती

उशीर झाला नि ट्रेन सुटली तरी
जमवते कसं बसं ती
गर्दीतल्या धक्क्याधुक्क्याना सावरत
ट्रेन पकडायची कसरत करत असते ती

जागा मिळवायच्या गडबडीत ही
गंम्मतीने मजा घेत असते ती
प्रवास करताना अनोळखीही
मैत्रिणींचा मग छान ग्रुप बनवते ती

प्रवासाचा आनंद घेत असताना
कधी भांडणही करत असते ती
कधी झोपा काढत कधी गप्पा मारत
गाण्यांचाही आस्वाद घेत असते ती

भाज्या निवडत खरेदी करत,
मोबाईल वर सिरीयल ही बघते ती
गर्दीत ट्रेन मधून उतरण्याचं धाडस
नेहमीच करत असते ती

जीवावर बेतून प्रवास, जॉब
आणि घरदारही सांभाळते ती
संसार सांभाळत, स्वतः ला सावरत
जीवनाचा आनंद ही घेत असते ती

सुख समाधान मानण्यात आहे
वाटण्यात आहे समजते ती
दुखात राहणं रडत खडत जगणं
चक्क अमानवी समजते ती

प्रियांका कुलकर्णी

– रचना : सौ. प्रियांका श्रेयस कुलकर्णी

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. 💦 Great 👍

    प्रियांका ताई. ती.. म्हणजेच सतत दुसऱ्यांसाठी झटत राहणारी स्त्री … ची जाणीवपूर्वक केलेली भावना.. छान शब्दात व्यक्त केली.

    🙏🌹🙏 ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित