इंटरकॉम वाजला, “मॅडम ! What would you prefer for lunch ? ”
दोघींनी मेनू कार्ड पाहिलं आणि ऑर्डर दिली..!
एक वाजला होता..! गप्पांच्या नादात..!
मिताली म्हणाली,
“अग..! तुला आणि तुझ्या हनीला गिफ्ट आणली आहेत..! दाखवायची विसरले की..!
अस म्हणत तिने बॅग उघडली..! रोमीला मस्त टॉप आणि जीन्स आणली होती..पिंक कलरचा आणि त्यावर फुलांच डिझाईन, रेड, व्हाइट रंगाच..! खूप सुरेख होता..! तो बघून रोमी म्हणाली, “मस्तच आहे मितु..!”
अविनाश ला ब्रूट चा perfume आणला होता..!
मदहोश करणारा सुगंध..!
मिताली चावटपणे म्हणाली, “त्याच्या मिठीत बेभान होशील, त्याने हा perfume मारला की..!”
तोच धागा पकडून रोमी ने विचारलं, “तुझ्या आयुष्यात कोण होत ? आणि आता नाहीए का ? ”
क्षणभर मिताली गप्प बसली, आणि बोलायला लागली..!
माझी आणि समीर ची ओळख झाली तिथे..!
तो जॉब करत होता..! दोघांचा रूट एक होता..!
पाहताक्षणी दोघे एकमेकांना आवडले होतो..!
कधी एकमेकांत गुंतलो कळलंच नाही..!
आम्ही लिव्ह अँड रिलेशन मध्ये रहायचं ठरवलं होत..! करियर जास्त महत्त्वाच हे दोघांच्या डोक्यात पक्क होत..!
दोघांना चांगला जॉब ही मिळाला…! आणि कस काय झालं कळलं नाही..! सगळी precaution
घेऊनही मी प्रेग्नेंट राहीले..!
मला वाटलं त्याला आनंद होईल, आम्ही लग्न करू..!
पण त्याने जबाबदारी घ्यायला नकार दिला..! Abort कर म्हणाला ..!”
मला खुप राग आला..!
“खर तर सगळंच mutual understanding ने ठरलं होतं..! मला रागवायच कारण न्हवत..! त्याने सगळं स्पष्टपणे सांगितलं होतं..! तरीही…!”
मिताली बोलायची थांबली..!
रोमी ने विचारलं, “तो दुसरीकडे कुठे गुंतलाय का ?”
“मी ते ही विचारलं ग त्याला” मिताली म्हणाली..! त्यावर तो “नाही” अस ठामपणे बोलला..!
“त्याला विचार करायला थोडे दिवस दे ..! तू काय ठरवलं आहेस ?”
“मी माझ्या मुलाला जन्म देणार..! सिंगल मदर म्हणून वाढविन.. ! माझा जॉब चांगला आहे..! समीर हो म्हणो किंवा नाही..!”
“हो..! काय काय खावस वाटतंय, ते ह्या मावशीला सांग..! ती सगळे लाड पुरवणार आहे ह तुझे..!” अस म्हणत रोमी ने तिच्या पोटावरुन हात फिरवला..!
“माझा निर्णय चुकीचा नाही ना रोमी ?”
“अजिबात नाही..!”
मिताली ने रोमी ला घट्ट मिठी मारली ..! “मला खात्री होती तू माझी साथ देशील ह्याची..! ”
” कोई शक ? ” रोमी हसत बोलली…!
” आणि बघ तू समीर चा फोन येईल आणि तो ही जबाबदारी आनंदाने स्वीकारेल..! ”
” खरच ”
” yes, baby, डोन्ट वरी..! आणि मी आहेच की..!”
मैत्रीचा विश्वास सार्थ ठरला होता..!
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800