एक पाकळी बाबासाठी
लिहीन म्हणते रोज रोज
मिळो निरोगी आयुसाठी
प्रार्थना करीन मी दररोज
बाबा नावाच गोड तुफान
व्यापत असत फसव जग
कितीही वादळं आदळती
वादळात नौका धरते तग
हळवा कोपरा बाबाचा तो
दिसत नसतोच कुणालाच
एकटा घरात जेव्हा बसतो
प्रार्थना करतो तो देवालाच
कुटुंबाच्या शुद्ध मायेपोटी
जगासंगे अंतापर्यंत लढतो
मुलांचे भलेबुरे हितासाठी
घास कधीचाच तो अडतो
मनात असूनही तसं त्याला
प्रसंगी वेळ देता येत नसतो
सुखद सयींचा भरला प्याला
त्याच्या रुपात घरात असतो
बाबा नसतोच कुठेही कमी
त्यालाही मनानें जाणून पाहू
संघर्ष ,खस्ता,खात देई हमी
सुख दुःख त्याचीही ती साहू

– रचना : सौ माधवी प्रसाद ढवळे
एक पाकळी बाबांसाठी….
अतिशय सुंदर रचना.
बाबांसाठी हि एक पाकळी नव्हे… काव्य कुसुमांचा,”पुष्पहार” जणू अर्पण केला.
सुंदर..
👌👌🙏👌👌