स्वप्नांच्या गावा जावे
रोजच नित्यनेम असे
कधी कुणाची सोबत असते
कधी कधी एकटे भासे
नको असताना स्वप्नांची
फुलमाळच पडते गळ्यामध्ये
त्या सुगंधातून न्हाऊन निघते
रात्र धुंद वेडीपीसे
मीही हट्टी स्वप्नही हट्टी
दोघेही मागे ना हटती
रोजच भेट घडावी म्हणोनि
भाव मनीचे नयनात वसे
– रचना : सौ. मंजुषा राजेश किवडे
💦 मंजुषा ताई..👌
फारच सुंदर भाव व्यक्त केलेत.. कविता वाचून.. आपणही,” स्वप्नांच्या गावी जावे.” असेच वाटते. कधी *निजामपूर एक्स्प्रेस* चालु होते? वाट बघतो.
👌👌🙏🌹🙏👌👌