रोमीने घराची बेल वाजवली …! आज सकाळपासून बाहेर आहोत..! आता सासूबाईंना काहीही काम करू द्यायच नाही..! असा विचार करत ती घरात कधी शिरली, ते ही तिला कळलं नाही..!
तिला सासूबाईंनी काहीतरी विचारलं..! तिच लक्षच न्हवत..! मग त्याच बोलल्या परत..”अग..! रिटा मावशी कश्या आहेत ? तुझं लक्ष कुठेय ?”
ती भानावर येत म्हणाली, “बरी आहे मावशी..! ताप होता, औषध घेतलं…! बर..! मी सकाळ पासून बाहेर होते आज..! आता तुम्ही काही करायचं नाही..! मी बघते सगळं..! आलेच फ्रेश होऊन..! चहा, कॉफी काही नकोय ह..!” अस म्हणत घाईघाईने रूममध्ये शिरली..!
ती फ्रेश होऊन आली, बघते तर सासू, सासरे निवांत सोफ्यावर बसून टी व्ही वर सिरीज बघत होते..!
“आई ! काय करायचं आहे ?”
“इथे बसून गप्पा मारायच्या आहेत..!”
“जेवण..!”
“केलंय ग मी ..! कितीसा वेळ लागतो ग..!”
“अरुणा ताई पोळ्या करून गेल्या..! भाजीही चिरून घेतली त्यांच्या कडून..! फोडणी ला घातली..! वरण, भात लावला आणि कोशिंबीरीच ही सगळं चिरून घेतलं आणि मिक्स केलं..! वरणाला दिली फोडणी..! झालं की सगळं..”
“थांबायच ना जरा..! मी केलं असत की..! सकाळी ही तुम्हीच केलं सगळं..!”
“उद्या कर की..! उद्या मी आराम करीन..!” त्या हसत म्हणाल्या..
स्वभाव रागीट होता सासूबाईंचा, तरी मनाने एकदम खुल्या दिलाच्या..!
“थांबा..! एक गंमत दाखवते..! तिने मिताली ने आणलेली चॉकलेट्स, गिफ्ट आणि रिटा मावशीने दिलेला हार दाखवला आणि ती काय काय बोलली, ते ही सांगितलं..!”
“खरच ग बाई..! माय मरो मावशी उरो..! अस उगाच का म्हणतात..!”
रोमी गोंधळून त्यांच्याकडे बघायला लागली..!
त्यांनी हसत हसत अर्थ सांगितला..!
रोमी ला मराठी तस बरच समजत होत.. ! शिक्षण मुंबईत आणि मराठी विषय compulsary होताच…! पण कॉलेज मध्ये गेल्यावर मराठीशी संबंध तुटला होता..!
तिने हार दाखवला आईची आठवण म्हणून रिटामावशीने जपून ठेवला होता..!
“खूप छान आहे हार..! त्यापेक्षा जास्त तुझ्या आईचा स्वभाव होता..! अग ..! सगळं मिळून ही किती जण अतृप्त असतात आयुष्यात..! तिला काही नाही मिळालं, तरी दुसऱ्याला देण्याची वृत्ती आणि त्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधण..! सोप्प नाही ग..!”
रोमी विचार करत होती, आईचा हा गुण
आपल्याला घेता येईल आयुष्यात..? कोण जाणे..!
तेवढ्यात फोन वाजला, पलीकडे हनी..! अविनाश..!
“काय मजा आहे ग तुझी..! दिवसभर भटकंती..!
नवरा आपला रोमँटिक दिवस आठवून जगतोय बिचारा..!”
आता ह्याचा चावटपणा वाढणार आणि आपल्याला आईबाबांसमोर आँकवर्ड होणार हे जाणून रोमी बेडरूम मध्ये गेली…!
ते बघून ते दोघेही हसले..!
“मला अस वाटतंय, की तुला गच्च मिठीत घ्यावी..! आणि म्हणावं छु लेने दो नाजूक होठोंको, कुछ और नही है जाम है ये…!”
“हो का..! मला वाटलं दुसऱ्या कोणाला म्हणशील तू..!”
“अरे..हम तो तेरे आशिक है सदीयो पुराने..”
“बास झाला ह चावटपणा…!” इति रोमी..!
“ऐक ना..! पंधरा दिवसांनी तुला तिकीट पाठवतो दिल्लीच…! मग ये ना..! नंतर दिल्लीतच काम आहे..! लेक्चर झालं की सात पर्यंत रूमवर..! मग तू, मै और बेहोशी का आलम…!”
“ok.. darling.. missing you..!”
“इस बात पर एक पप्पी हो जाय..”
“बर..! ऐक ना..! थोडं सिरीयस आहे..!”
तिने मितालीबद्दल सगळं सांगितल..!“ok बेबी..! उद्या किंवा परवा तिला घरी बोलावं..आणि समीर चा नंबर मिळव..! तिला असही विचार की समीर शी बोललो आपण तर तिला चालेल का ? बघू या..! काय करता येईल..!”
“ह्याच तुझ्या स्वभावामुळे प्रेमात पडले ह मी..!”
“कुडी फसली ह..!”
“नाही रे..! तुला आठवतंय माझा प्रॉब्लेम तू किती सहज सोडवला होतास..!”
“हो..हो…तिथेच प्रेमात पडलो …! नाही ..! नाही..! बुडालो तुझ्या..!” अस म्हणत तो हसला..!
काय झालं होतं त्यांच्यात ?
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800