Wednesday, March 12, 2025
Homeसाहित्यपुस्तक परीक्षण "अस्तित्व"

पुस्तक परीक्षण “अस्तित्व”

आपल्या आगळ्या वेगळ्या लेखनशैलीने वाचकांना मोहून टाकणाऱ्या सुधा मूर्ती यांची ‘महाश्वेता’ ही संकटाशी सामना देणाऱ्या समर्थ स्त्रीची कादंबरी,
‘अमेरिका प्रेमी भारतीयांच्या मानसिकतेचा अचूक वेध घेणारी ‘डाँलर बहू’ ही कादंबरी’ आणि त्यांच्या ‘वाईज अँड अदरवाईज’ या पुस्तकातील सुधाजींनी केलेल्या प्रवासात भेटलेल्या असामान्य मनाच्या सामान्य माणसाविषयाच्या अनुभव कथा ही केवळ तीन पुस्तके वाचल्यावर सहाजिकच त्यांनी त्यांच्या कन्नड भाषेत लिहिलेल्या सर्व प्रथम कादंबरीची ‘अस्तित्व’ ची उत्सुकता लागली होती. सुदैवाने ती कादंबरी मिळाली आणि झपाटल्यासारखी वाचून काढली त्याविषयीचे काहीसे विश्लेषण….

सुधा मूर्तींचे कार्य सर्वांनाच माहिती आहे. काँम्प्युटर सायन्स या विषयातील एम्.टेक. ही पदवी संपादन केलेल्या त्या विख्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि कुशल लेखिका आहेत. त्या ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या
अध्यक्षा आहेत. भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ पुरस्काराने सुधाजींना सन्मानित करण्यात आले आहे. अनेक पुरस्कार व सहा सात विद्यापीठाच्या डॉक्टरेट पदव्या त्यांच्या साहित्य सेवा आणि सामाजिक कार्याबद्दल मिळाल्या आहेत. म्हणून त्यांच्या ‘अस्तित्व’ या पहिल्या कन्नड ‘तुमला’ या कादंबरीबद्दल विलक्षण उत्सुकता होती. आणि कुतहूल ऐवढेच होते की या कादंबरीवर आधारित ‘तुमला’ नावाची दूरदर्शन मालिका त्या काळात खुपच गाजली होती. विशेष म्हणजे ही कादंबरी बर्याच भाषेत वेगवेळ्या नावाने भाषांतरीत झाली आहे.

एका कुटुंबात घडलेली एक विलक्षण घटना या कादंबरीत सुधाजींनी अत्यंत ओघवत्या भाषेत कथन केली आहे.

मुकेश हा या कादंबरीचा विवाहित नायक असून त्याच आयुष्य अगदी सुखसमाधानात चाललेंल होतं. अचानक एक वादळ उठलं. झंझावातासारख्या आलेल्या वादळानं त्याच आयुष्य पार बदलून गेलं.
एक बळकट कौटुंबिक बंध अचानक तुटून गेला… मुळात कोण होता तो ? मग सुरू झाला शोध… मानलेली नाती खरी की, रक्ताची नाती श्रेष्ठ ?
अशा स्वरूपाच्या अनेक प्रश्नांचा शोध घेता घेता त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाचा शोध सुरु झाला. आणि त्यातूनच ही उत्कंठावर्धक कादंबरी साकार झाली.

वाचकांची उत्सुकता आणि उत्कंठांची हानी होऊ नये म्हणून मी संपूर्ण कथासार सांगत नाही. ही कादंबरी सुधा मूर्ती यांच्या अनेक कथा कादंबरी व वैचारिक लेखांची पुस्तकाहून काहीशा वेगळ्या धाटणीची आहे म्हणून ती वाचकांना निश्चितच आवडेल.

या मराठी अनुवादित कादंबरीचे जवळपास १२ वेळा पुनरावृत्ती झाली आहे हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे.

सुधाकर तोरणे

– लेखन : सुधाकर तोरणे.
निवृत्त संचालक, माहिती व जनसंपर्क. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. इतक्या सुंदर पुस्तकाचा परिचय दिल्या बद्दल धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित