केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयातर्फे एनआयएसडी, आरआरटीसी,
सीएसएससी, मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व
मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने
मुंबई मराठी पत्रकार संघात काल ज्येष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याण कायदा व ज्येष्ठ नागरिकांच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते.
मुख्य अतिथी अध्यक्ष मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रधान न्यायाधीश नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई उर्मिला जोशी-फलके, सचिव मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्या.हितेंद्र वाणी, माजी महापौर तथा संचालक सीएसएससी अॅड.निर्मला सामंत-प्रभावळकर, स्वयं संस्थेचे अध्यक्ष ऍड डॉ. निलेश पावसकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, हेल्पएज इंडिया, मुंबई व गोवा विभाग प्रमुख प्रकाश बोरगांवकर इ.मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
श्रीमती निर्मला सावंत-प्रभावळकर यांनी सीएसएससी केंद्रामार्फत शासनमान्य रूग्ण सेवक कोर्सची माहिती देऊन प्रशिक्षणातून रोजगार व सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
न्यायमूर्ती श्री हितेंद्र वाणी यांनी दृकश्राव्याव्दारे
जेष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याण कायदा, 2007 हा मराठी सोप्या भाषेत उदाहरणाव्दारे समजावून सांगितला.
श्री प्रकाश बोरगांवकर यांनी लोकसंख्या, औषधोपचार, जीवनशैली इ. यामुळे वाढणारे आयुष्यमान व ज्येष्ठ नागरिकांचे वाढते प्रमाण तसेच आर्थिक विषमता, जागेचा अभाव इ. मुळे दुर्लक्षित होत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हेल्पएज इंडिया करीत असलेले कल्याणकारी कार्य या विषयी सांगून आईवडिलांना जपण्याचा सल्ला दिला.
ऍड डॉ निलेश पावसकर यांनी या कायद्याची महत्वपूर्ण माहिती देऊन समाजापर्यंत या कायद्याचा प्रचार-प्रसार करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निलिमा येतकर यांनी केले.
कार्यशाळेला निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडेचे संपादक देवेंद्र भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री विनोद साडविलकर, डाॅल्फी डीसुझा, ऍड. निलीमा पवार, रमेश चव्हाण, चारूदत्त पावसकर, संतोष धबाले, हनुमंत शिर्के, अंब्रिता ढवळे, रेणूका साळुंखे, जनसेवा फाउंडेशनचे प्रतिक खैरनार, भिमराव भोसले, सिमंतिनी खोपकर, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
– टीम एनएसटी, 9869484800