बघ धुक्यात हरवली वाट
हळुवार क्षणाची आस घेउनी
जुनीच तरिही मृदु कहाणी
मनी तीच रे..वहीवट
बघ धुक्यात हरवली वाट…..
सुखद गार पहाटवारा
मनी बहरे हा शब्दफुलोरा
अंगणी येता कविताराणी
बहरे सुगंधी… वहिवाट
बघ धुक्यात हरवली वाट…..
किरणांच्या स्पर्शाने खुलते
जागी होते हळुच पहाट
धुक्यात रमते अन सावरते
मोहरते रे.. हळवी वाट
रम्य बावरी हळवी वाट……
– रचना : पद्मजा राजन नेसरीकर
सुंदर लयीत