नमस्का, मंडळी.
14 फेब्रुवारी हा जगभर व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्यात येतो.
प्रेमाची शिकवण देणारे संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मृती निमित्ताने हा दिवस साजरा होतो.
योगायोगाने हा आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे.
अर्थात 35 वर्षांपूर्वी लग्न झाले, तेव्हा भटजींनी काढलेला मुहूर्त, मी दूरदर्शन मध्ये असल्याने त्याच दिवशी दुसऱ्या शनिवारची सुट्टी येत असल्याने सहकारी मोकळे पणाने पुण्याला लग्नाला येऊ शकतील असा विचार केला होता.
या निमित्ताने आपण सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या, या बद्दल आम्ही उभयतां मनःपूर्वक आभारी आहोत.
जगभरात विविध कारणांमुळे निर्माण झालेली, होत असलेली द्वेष भावना दूर होऊन, प्रेम भावना वाढीस लागावी, त्या साठी आपल्या कडून होतील तेव्हढे प्रयत्न करावेत हाच आपल्या या पोर्टलचा हेतू आहे. असो…..
पुढच्या आठवड्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने आपण दररोज “सावरकर समजून घेताना” ही श्री हेमंत सांबरे लिखित लेख माला प्रसिद्ध करीत आहोत. या लेखमालेला आपला भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे.
या आठवड्यात प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
– देवेंद्र भुजबळ. संपादक
वय ओशाळाले इथे…
खूप छान लिहिले आहे.
जे माहित नव्हते ते आज आपण सर्वासमोर मांडले आहे.
लेखिकेला धन्यवाद. 🙏🙏👌🌹🌹
मुखवटा
खूपच छान कविता.
मुखवटा होय खरंच आजच जीवन तसंच झालं. अभिनंदन.
– अशोक साबळे.
येणारा तर यायचाच्…
गझल आवडली. वास्तवता दाखवणारी. नविन शब्दहि भावले. धन्यवाद.
– सौ. लीना फाटक, यु.के.
गिरनार परिक्रमा
अभिनंदन गंधेकाका..
श्रद्धा, भक्ती, निर्धार, मनाचा विश्वास शक्ती याचे हे सुंदर फळ….
– राधिका भांडारकर.
ओठावरलं गाणं ( २७ )
वा, काही गाणी अशी असतात जी थोडी बाजूला राहतात, पण भावे सर त्याना परत लखलखीत करून समोर आणतात ! धन्यवाद सर !
– क्षितिज कुलकर्णी.
नांदा सौख्यभरे
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्हां दोघांना माझ्यातर्फे खुप खुप हार्दिक शुभेच्छां. तुमचे उभयतांचे जिवन सुखाचे, सुआरोग्याचे व समृद्धिचे जावो. व तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ह्या सदिच्छां. जगांतील सर्व मराठी भाषीकांना तुमच्या वेबपोर्टलवर एकत्र आणण्याचे तुम्ही उभयता जे बहुमोल कार्य करत आहांत त्याला भरघोस यश येवो.
– सौ. लीना फाटक, यु.के.
अलका, तुझ पुस्तक प्रसिध्द झाल्याचं वाचलं मी. तुझा मनःपूर्वक अभिनंदन. नावच इतकं छान आहे की लगेच वाचायची इच्छा झाली. तू त्यातून गेली आहेस, तो अनुभव गाठीशी आहे त्यामुळे पुस्तक उत्तमच झालं असणार ह्याची खात्री वाटते. हा व्याप सांभाळून तू पुस्तक लिहिलंस, कौतुकास्पद आहे. आता वाचायची उत्सुकता वाढली आहे. अशीच लिहिती रहा, खूप शुभेच्छा तुला..
माणूस व्हायचंय तुला ही सायली कस्तुरे ह्यांची कथा अतिशय आवडली. विषय इतका महत्त्वाचा आहे, अनेक मुलांच्या मनात असे विषय घोळत असतील की आईबाबा आपल्याकडे लक्ष देतात का ? दोघंही नोकरी करणारे असतील तर संवाद कमी होतो घरात, अशावेळी मुलांच्या मनात असे प्रश्न उभे राहू शकतात. त्या पत्रातून व्यक्त केलेल्या भावना सर्व मुलांपर्यंत पोहोचाव्यात अशाच आहेत. अभिनंदन सायली…
– सुनंदा पानसे.
सावरकर आणि मंगेशकर: हेमंत सांबरे यांचा लेख उत्तम मंगेशकर आणि वीर सावरकर यांच्यातील कौटुंबिक संबंध खूप छान उलगडून सांगितले आहेत. खूप छान माहिती मिळाली.👌🏻
शाश्वत कृषी पर्यटन खूप छान उपक्रम छान माहिती आणि उपक्रमास शुभेच्छा💐
प्रतिभा चांदूरकर यांची स्वप्नरंगी …कथा क्रमशः आहे छान वाटते वाचायला .
स्वप्नांच्या गवा मंजुषा ताईंची कविता बरंच काही सांगून जाते खरचं स्वप्नात मन रंगल की वास्तव विसरायला होत. अधून मधून स्वप्नाच्या गावी जायला हवे खूप छान वाटते. 👍👍👍
धन्यवाद देवेंद्र सर आणि अलका ताई
🙏🏻🙏🏻🙏🏻💐
पहिलं प्रेम: सुलभा गुप्ते
यांची यांची कथा खूपच छान वाटली. लहानपणीच अल्लड प्रेम शेवट पर्यंत मनाच्या तळाशी खोल लपून बसतं. आणि मग कधीतरी डोकं वर काढत. अगदी ५० वर्षा नंतर ही ते आठवत रहात गंमतच आहे ना. मस्त मज्जा आली गोष्ट वाचायला.👌🏻👌🏻👌🏻👌🏻
शलाका कुलकर्णी यांची कथा सोलमेट विचार करायला लावणारी आहे वयाच्या ४५ वर्षानंतर मुक्ताला तिच्यावर नितांत प्रेम करणारा सोलमेट मिळणे म्हणजे … खूप छान विचार मांडले आहेत शलाका ताईंनी मनाला भावली ही कथा👍👍👍
व्हॅलेंटाईन ही परवीन कौसर यांची व्हॅलेंटाईन डे आणि इतर डेज म्हणजे किस डे चॉकलेट डे टेडी डे… यावरील कल्पनाविलास छान वाटला. त्यातील अबिद आणि फरहीन ही पात्र घेऊन छान कथा रचली आहे. नवरा बायकोची संसारात अशी एकमेकांना साथ असणे खूप महत्त्वाचं आहे आणि पत्नीने संसार करताना केलेल्या कष्टाची जाणीव नवऱ्याला असली की संसार खूप छान होतो. मस्त कथा👌🏻
श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचे मी दोन वेळा दर्शन घेतले आहे अतिशय भव्य दिव्य असे हे मंदिर आहे. साडी नेसून मंदिरात जावे लागते. पुरुषांना धोतर नेसून शर्ट खांद्यावर घेऊन मंदिरात जावे लागते. मनीषा पाटील यांनी छान माहिती दिली आहे.
खरं प्रेम कळण्यासाठी पवित्र मन असावं लागतं. प्रेम म्हणजे काय पुनम सुलाने यांची कविता अप्रतिम🌹👌🏻
खूप छान होता व्हॅलेंटाईन डे विशेष न्यूज स्टोरी टू डे. खूप आभार
वय ओशाळले इथे .. नीला बर्वे यांनी एम पप्पामल यांच्या विषयी अतिशय सुंदर माहिती सांगितली धन्यवाद ताई.
डॉ किरण ठाकूर यांचा बातमीदारी करताना लेख नेहमीप्रमाणे अत्युत्तम
राजेश सुर्वे यांची
मुखवटा कविता अप्रतिम👍
ग्रंथ हेच आपले गुरू आहेत. ग्रंथांमधून
विविध प्रकारचे ज्ञान मिळते. कला शास्त्र वाणिज्य विज्ञान तंत्रज्ञान ईत्यादी चे ज्ञान ग्रंथतून मिळते. म्हणूनच वाचू आनंदे सारखे महोत्सव होणे खूप गरजेचे आहे.
सुधाकर तोरणे यांचे अस्तित्व या पुस्तकाचे परीक्षण खूप सुंदर
स्वप्नरंगी स्वप्नीच्या..प्रतिभा चांदूरकर यांची क्रमशः कथा छान
नांदा सौख्य भरे … वर्षा भाबल यांची कविता सुंदर.
धन्यवाद
डॉ नारेशचंद्र काठोळे यांनी सरदार धाम विषयी खूप सुंदर माहिती दिली आहे.👌🏻
विकास भावे यांनी आठवणी दाटतात या गाण्याचे रसग्रहण खूप सुंदर केले आहे.👌🏻
पद्मजा नेसरीकर यांची धुक्यात हरवलेली हळवी वाट कविता अप्रतिम
🙏🏻
पुलवामा शहीद दीन ..सुलभा गुप्ते यांचा लेख वाचून अंगावर काटा आला.
४० शहीद जवानांना श्रद्धांजली💐🙏🏻
आणि मी पोलीस अधिकारी झाले सुनिता नाशिककर यांचा क्रमशः लेख नेहमी प्रमाणेच खूप छान
गिरनार परिक्रमा गंधे काका तुम्ही पूर्ण केली खूप अभिनंदन💐
येणारा तर यायचाच श्रीकृष्ण बेडेकर यांची कविता अप्रतिम👌🏻
धन्यवाद टीम देवेंद्र भुजबळ सर आणि अलका ताई भुजबळ🙏🏻
– सुप्रिया सावंत. नवी मुंबई.
व्हॅलेंटाईन….
परवीन कौसर..फार सुंदर ह्रदयस्पर्शी कथा..
प्रेमाचा सच्चा अविष्कार..
खरं म्हणजे कथेतला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हा सारख्या घटनांचा असूनही ऊत्तरार्धातील अबीदच्या भावनांची ऊलगड!त्याचं अशा रितीने व्यक्त होणं, हे मनाला भारावून टाकतं..
खूप छान !!
पहिलं प्रेम
अतिशय सुंदर फुलपांखरी कथा सुलभाताई प्रांजळ भावपूर्ण…
दुरुन येणार्या झुळुकेसारखी हळुवार..सुगंधी
– राधिका भांडारकर
१.पहिलं प्रेम
छान कथा लिहिली आहे सुलभाताई तुम्ही. ईमोजींमुळे शब्दांना आणखी उठाव आला आहे. पहिल ते सगळंच, पहिल प्रेम, पहिल प्रेमपत्र, पहिल्या मुलाचा जन्म, सगळ अविस्मरणीय असत. धन्यवाद.
२.व्हॅलेंटाईन….
परवीन कौसरनी सुंदर कथा लिहून सगळे प्रेमाचे वेगवेगळे “डे” छान उलगडून दाखवले आहेत. अशीच लिहित रहा परवीन.
३.प्रेम म्हणजे काय…
कविता छानच आहे. शेवटची दोन कडवी मनाला भावली.
– सौ. लीना फाटक, यु.के.
अलका भुजबळ उभयतांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्षा भाबल ने केलेली कविता खूपच छान.
– वृंदा आधटराव.
वाचू आनंदे महोत्सव
ग्रंथ हेच गुरु असुन समाजाला ज्ञान, विद्या, कला, शास्त्र, विज्ञान, मनोरंजन माहिती आणि सर्व प्रकारच शिक्षण देण्याची प्रभावी साधन आहे. ”इये मराठीचिये नगरी ! ब्रम्हविद्दे्चा सुकाळु करी ! घेणे देणे सुखचिवरी होऊ देई या जगा !” असा ब्रमहज्ञानाचा स्रोत म्हणजे मराठी भाषा आणि मराठी ग्रंथ आहेत. म्हणून आपण सर्वांनी मराठी भाषेतील कोणत्याही ग्रंथाचं एक तरी पान नियमितपणे वाचल्यास आपणा सर्वांना मराठी भाषा आणि मराठी ग्रंथाची महती कळुन येईल. मराठी भाषेत इंग्रजीच्या हजारो पटीने जास्त शब्द आहेत आणि आणि प्रत्येक शब्दात अर्थ, माधुर्य, संगीत, शास्त्र, ज्ञान, विज्ञान आणि आरोग्य उपचार आहेत. परंतु यासाठी मराठी ग्रंथ वाचन करायला हवे. मला ग्रथवाचनामुळे साहित्य, व्याकरण, नाटक -गडकरी, इतिहास यदुनाथ सरकार, काव्य विशेषता प्रेम काव्य – भा.रा. तांबे पासुन प्रविण दवणे, डॉ शाहु रसाळ, उच्च कोटीची अध्यात्म विद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सहीत सर्व संतांचे काव्यरुपातील अदभुत अध्यात्म विज्ञान म्हणजे जगातील सर्वोत्तम जीवन जगण्याचं सर्वश्रेष्ठ व्यवस्थापन शास्त्र आहे. या आणि अशा अनेक उत्तमोत्तम ज्ञान मिळवण्याची बहुआयामी साधने म्हणजे मराठी ग्रंथ आहेत. त्यासाठी असे नवे नवे उपक्रम आवश्यक आहेत.
– राम खाकाळ, निवृत्त निर्माता.
मुंबई दूरदर्शन आणि संकल्पक मिशन एक गाव एक परिवार-
१.💦 शलाका ताई..
“सोलमेट..” …. शिर्षक आणि ,”मुक्ता आनंद” हि पात्र.. प्रसंग.. आणि कथेचा आशय धावता पण कमीतकमी शब्दात.. अगदी खुबीने मांडला आहे.
सुंदर लिखाण.
सलाम लेखणीला..✒️
२.स्वप्नांच्या गावा…
💦 मंजुषा ताई..👌
फारच सुंदर भाव व्यक्त केलेत.. कविता वाचून.. आपणही,” स्वप्नांच्या गावी जावे.” असेच वाटते. कधी
“निजामपूर एक्स्प्रेस” चालु होते ? वाट बघतो.
– सुभाष कासार. नवी मुंबई
सावरकर आणि मंगेशकर
मंगेशकर कुटुंबियांना सावरकर कोणत्या कारणासाठी व कसे जगले हे ठाऊक होते.
या वाक्य रचनेतून फार मार्मिक उदभोदता समोर येते आणि तमाम महाराष्ट्रीय किंबहुना भारतीय जनतेला सावरकारांचे जीवन आणि त्याग कळलाच नाही.
– शंतनु श.कडुसकर
१.सोलमेट
अप्रतिम लेख.
प्रेम हे दुबळं करणारं नकोच. कणखर बनवणारं आत्मविश्वास जागवणारं हवं.
२.हृदयनाथ मंगेशकरांनी स्वा. सावरकरांच्या ने मजसी ने या कवितेला चाल दिल्याचा किस्सा ऐकला होताच.
पण सावरकर आणि मंगेशकर कुटुंबीयांचे असलेले जिव्हाळ्याचे नाते या लेखातून जास्त स्पष्टपणे जाणवले.
लेख उत्तमच.
– सायली कस्तुरे.
संपादक ई साप्ताहिक साहित्य मंजिरी. पुणे
वय ओशाळले ….
अप्रतिम 👌👌🌹🌹😊😊🙏🙏
– गंधेकाका. मुंबई
इथे ओशाळले वय.
निला बर्वे, यांनी लिहिलेला लेख खूप सुंदर.
कर्तव्य आणि वय यांचा दुरानुव्ये संबंध नसतो हे खरेच आहे.
पप्पम्माल या एक पडद्या आड होत्या पण आज प्रसिद्ध झाल्यात.
लेखिकेने खूप छान शब्दात आपले विचारलं मांडले.
धन्यवाद.
– अशोक बी साबळे. महाड 🙏
निष्काम कर्मयोग… 🌹🙏🌹
– सुधाकर धारव निवृत्त माहिती उपसंचालक
वय ओशाळले इथे ….
सलाम💐
– स्नेहलता झरकर -अंदुरे
Superlative Ghazal
Kya bat hai 👏👏
– Dr Sangita Kamat. Mumbai
व्यर्थ, न, हो, बलिदान, पुलवामा, शहीद, जवान🙏
– विलास प्रधान. मुंबई
अशोक साबळे यांस धन्यवाद🙏
1987 च्या श्रीलंकेतील युद्धात आमचे जवळचे स्नेही (आर्मीचे) होते.
मिस्टर आर्मीत होते, त्यामुळे सर्व्हिसेसचे लोक खूप जवळचे, फॅमिली मेंबर वाटतात.
– सुलभा गुप्ते. ऑस्ट्रेलिया
गिरनार परिक्रमा छान अनुभव🙏🏻
– वर्षा फाटक, पुणे
पुलवामा शहीद दिन.
खूप छान लिहिले आहे.
धन्यवाद.
मी पण 27 वर्ष Navy service केली.
1987 ला श्रीलंका मध्ये शांती सेनेत होतो.
काही दिवस somalia ला पण होतो.
मृत्यू खूप जवळून पाहिला आहे.🙏
– अशोक साबळे. महाड
Very much impressed by Sardar Dham . The Idea behind it is of par excellence. We need such dhams n not temples . Height of Statue of unity though higher than the sardars statue erected here ,the vision n the vaues we find here have the greatest height than any other statues or temples. Salute to that legendary who dedicated himself for building Such a great Dnyan mandir. Though he might be less educated in the general sense people have for qualification. The creater of this dham has proved that real education doesn’t come from obtaining no of certificate but from developing the faculty of judging right things. By creating this dham he has paid true tributes to Vallabhbhai Patel n rendered a great lesson for us.🙏
– Ranjit Chandel.
Retd. District Information Officer
Really very informative post on Sardaardham.👌
– Ajit Sing. Mumbai.
डॉ.नरेशचंद्र काठोळे यांचा लेख वाचला. आवडला आणि एकच विचार मनात आला की राजकीय पक्ष सोडा, पण असा विचार कोणा मराठी दानशूर व्यक्तीच्या मनात का येत नाही ? आपण फक्त विचार करतो, की मराठी मुले आणि मुली प्रशासकीय सेवांमध्ये आणि परीक्षांमध्ये मागे का? त्यावर काथ्याकुट होतो, पण कोणी असे काहीतरी भव्यदिव्य करायला पुढे येत नाही. दुर्दैव आपले. 🙏
– अरविंद गोखले. जेष्ठ संपादक. पुणे
सरदारधामचा लेख खरोखर चांगले तीर्थक्षेत्र आहे. सरदारधाम, ह्या लेखाचा अंतर्भाव पाठ्यपुस्तकात करावा, हि विनंती.. 🌹
प्रा. काठोळे सरांचे मी आभार मानतो… 🙏
– सुधाकर धारव. निवृत्त माहिती उपसंचालक
यवतमाळ
खूपच छान, सरदारधाम. आपल्या महाराष्ट्रमध्ये पण असे एक धाम पाहिजे. आपल्याकडे दानशूर व्यक्तींची कमी नाही पण त्याना एकत्र आणणे गरजेचे आहे. अभिनंदन काठोळेजी व भुजबळजी.
– प्रा उदय वाईकर. परभणी
सुधाकर तोरणे यांचं सुधा मूर्ती यांच्या ‘अस्तित्व’ या पुस्तकाचा परिचय छान आहे.
वाचण्यास उत्सुक.
– सायली कस्तुरे. दूरसंचार अभियंता, पुणे
मिरा ढास यांचा शाश्वत क्रुषि पर्यटन लेख आवडला .
– माधव अटकोरे. जेष्ठ पत्रकार, नांदेड
हेमंत सांबरे यांचा लेख वाचनीय आहे. लता आणि तात्या यांच्या बाबतीत… 🌹🌹🌹
– सुधाकर धारव. निवृत्त माहिती उपसंचालक
सावरकर व मंगेशकर संबंध.
अप्रतिम लेख. 🙏👌
धन्यवाद भुजबळ साहेब व Mr. हेमंत सांबरे
– अशोक साबळे