माणुसकी सेवा गौरव पुरस्काराबद्दल आदरणीय
श्री.देवेंद्र भुजबळ साहेबांचे हार्दिक अभिनंदन 🌹
संकटांना पाहून तरुणांनो
काढू नका पळ
प्रतिकूल परिस्थितीच देते
माणसाला लढण्याचे बळ
संघर्ष करत पेटत राहो
सदैव ज्योत शिक्षणाची
उराशी बाळगली देवेंद्रजींनी
शिकवण आईची व डॉ.आंबेडकरांची
खूपच गौरवास्पद व अभिमानास्पद
आहे भुजबळजींची यशोगाथा
प्रेरणेचे प्रवासी पुस्तकातूनही मांडल्या
त्यांनी ध्येयवादी व्यक्तींच्या यशकथा
पत्रकारिता, दूरदर्शन, माहिती खाते
देवेंद्रजींची ही वाटचाल मन थक्क करते
त्यांची संघर्षमय यशोगाथा
तरुणांसह आबालवृद्धांना प्रेरणा देते
सकारात्मक विचारातून मनात
मोठा आत्मविश्वास जागवते
जिद्द चिकाटी परिश्रमाने
पुढे जाण्याची प्रचंड ऊर्जा देते
ज्यूस सेंटरवरचा पोरगा
काम करत झाला चक्क पदवीधर
हाल अपेष्टांना तोंड देत
चढला यशाच्या शिखरावर
जिद्दीने मारली मजल थेट
माहिती संचालक पदापर्यंत
महाराष्ट्र शासनातली ही गरुडझेप
गेली आता देश विदेशापर्यंत
आकाशवाणी व दूरदर्शन मार्फत
साधला त्यांनी समाजाचा विकास
अभ्यासपूर्ण भाषणे व लेखांमधून जपला
सतत सामाजिक बांधिलकीचा द्यास
प्रथम ध्येय निश्चित करणे
व त्याच्या पूर्तीसाठी झपाटून जाणे
कितीही अपयश येवो
निराश न होणे, खचून न जाणे
या दिव्य मंत्रातूनच साकारले
देवेंद्रजींनी यशाचे मधुर चांदणे
आशावादातूनच मनुष्य पुढे जातो
हेच आहे तरुणांना त्यांचे सांगणे
संघर्षाच्या जीवघेण्या अग्नीतून निघाले
भुजबळ साहेब सोन्याप्रमाणे झळाळून
मनापासून अभिनंदन करतो त्यांचे
प्रेमपूर्वक हे काव्यपुष्प देऊन
त्यांच्यातल्या देव माणसाचा झाला योग्य सत्कार
माणुसकी सेवा गौरव पुरस्काराने
सातासमुद्रापार नाव मिळवले
त्यांच्या न्यूज स्टोरी टुडेने
सेवानिवृत्त होऊनही खळाळतोय
त्यांच्यात उत्साहाचा झरा
माननीय श्री. देवेंद्र भुजबळ साहेब
आहेत महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा
उत्तम आरोग्यासह होवो
सुखी आनंदी
त्यांचं कौटुंबिक जीवन
फुलो समृद्धीचं नंदनवन
सतत झिजणारं ते आहेत सुगंधी चंदन
त्यांच्या महान कर्त्रुत्वाला करतो वंदन🙏

– रचना : राजेंद्र वाणी. दहिसर, मुंबई
माणुसकीची सेवा’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 👍👍🎉🎉🙏🙏🙏,स्वकर्तुत्वावर मिळविलेल्या यशाचे खूप खूप कौतुक .तूम्हा उभयतांचे अभिनंदन .पुरस्कार मिळाल्यामुळे निंरतर कामात असलेल्या तूझ्या पंखातील बळ द्विगुणीत होईल ,होओ 🙏🙏व आमच्या सारख्यांना प्रेरणा मिळो 🙏🙏
आपणास राज्य स्तरीय माणुसकी सेवा पुरस्कार मिळाल्याचे वाचून अतिशय आनंद झाला.या पुरस्काराचं
नाव आणि आपलं आजपर्यंतचं इतरांसाठी केलेलं काम यात अद्वैत आहे. आपल्या अद्वितीय कामाचं हे पारितोषिक सुंदर फळ आहे.
मन:पूत अभिनंदन आणि अनंत शुभेच्छा!