मिताली आणि समीर मुंबईत मस्त भटकंती करत होते, पण थोडे सावध राहून…! रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन नाव नोंदवल..! सोनाराकडे जाऊन छान मंगळसूत्र घेऊन आले..!
मितालीच्या आईवडिलांना आणि समीरच्या ही अजून काही माहीत न्हवत..! खर तर दोघांनाही खूप अपराधी वाटत होतं..! आईच्या पारखी नजरेने ओळखला असता, तिच्यात झालेला बदल..! आईला अजिबात आवडलं नसत अस लिव्ह इन रिलेशन वैगरे…! ही आघाडी अविनाश सांभाळणार होता..!
दिल्लीहुन आल्यावर अविनाश आणि रोमी, एकमेकांच्या सहवासाने जास्तच सुंदर दिसत होते..! एकमेकांच्या प्रेमात व्हावून निघाले होते..!
परत आले तेव्हा सुखाच तेज चेहऱ्यावर होत दोघांच्या..!
अविनाश आल्या आल्या मिशन मिताली, समीर आणि त्यांचे आईवडील ह्यावर होता..!
मिताली आणि समीर ह्यांना अविनाशच्या पहिल्या भेटीतच, त्याच्या मनमोकळ्या स्वभावाचा अंदाज आला…! आणि रोमी त्याच्या प्रेमात का पडली हे ही कळलं..!
अविनाश ने रोमीला घेऊन आधी मितालीच्या आईवडलांचं घर गाठलं…! त्यांना समीर बद्दल सांगितलं, की तो मितालीशी लग्न करू इच्छितो..! माझ्या ओळखीचा आहे वैगरे..! पटकन लग्न करून जाणार आहे..!
हीच गोष्ट समीर च्या घरी सांगितली..! रजिस्टर लग्न करणार, हे मात्र मितालीच्या आईला पटत न्हवत..! तिला लेकीचं लग्न थाटात करायचं होतं..!
बऱ्याच गोष्टी लपवाव्या लागत होत्या..! तरी नंतर सगळं खरं सांगायचं, मग काहीही होवो, ह्यावर सर्वच ठाम होते..!
लग्नाच्या आधी चार दिवसच दोघे आपापल्या घरी रहायला गेले..! मिताली ने सैलसर कपडे घेतले होते घालायला..! सुदैवाने बाकी काही त्रास होत न्हवता..! मनातून खूप अपराधी वाटत होत..! तिच्या वागण्यातला बदल आईच्या लक्षात आलं होता..! लग्नाचं टेन्शन असेल अस तिला वाटलं..! तिने विचार केला की, इतके दिवस लग्नाला तयार न्हवतीच, किती मागे लागलो होतो..! आता हो तरी म्हणालीए..! तेच समाधान मोठं..! आजकाल मुली लग्नाला फारश्या तयार नसतात..! त्यांना करिअर महत्त्वाच वाटत..! मिळेल त्यात आनंद मानायचा..! आजकालची पिढी वेगळीच…! असा विचार मितालीच्या आईने केला..! आणि मिळालेले क्षण एन्जोय केले..!
लग्न थाटामाटात करण्यापेक्षा ते पैसे तिथे घर घ्यायला उपयोगी पडतील अस दोघांनी सांगितलं…!
लग्न व्यवस्थित झालं..! त्यानंतर चार दिवसांनी ते निघाले ही परत जायला..!
मिताली रोमीच्या गळ्यात पडून खूप रडली जाताना..! म्हणत होती, ” I am blessed with great friend like you…! सर्वांच्या नशिबात अशी एक तरी मैत्रीण किंवा मित्र असायला हवा..! भक्कम आधार देणारा..! पैसा इतका महत्त्वाचा नसतो आयुष्यात, महत्त्वाची असतात माणसं, जिवाला जीव देणारी..”
आयुष्यातली सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट किती सहजपणे बोलून गेली ती..!
मिताली गेल्यावर नाही म्हणल, तरी रोमी थोडी उदास झाली होती..! अविनाश म्हणाला, ” मी आयुष्यात किती जणांना मदत केली असेल ग, पण असा जिवाभावाचा मित्र लाभलाच नाही…!
मैत्रीण ही एकच लाभली, पण ती बायको झाली..! हाय रे दैव माझे..!”
हे ऐकून रोमी हसली..! हे सगळं तुला छान जमत अशी खुण करत..!
चला..! एक आयुष्य मार्गी लागलं, ह्याच समाधान होत..!
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर. ठाणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800