Friday, March 14, 2025
Homeबातम्या२७, २८ ला पद्मगंधा संमेलन

२७, २८ ला पद्मगंधा संमेलन

विदर्भातील लोकाश्रित, लोकमान्य साहित्य संस्था, पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने, श्री शंकरराव जाधव पुरस्कृत मराठी भाषा साहित्य संमेलन यंदा आभासी व्यासपीठावर दिनांक २७ आणि २८ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात येणार आहे.

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या वार्षिक साहित्य संमेलनाचे
उद्घाटन डॉ.श्री ठाणेदार, साहित्यिक – उद्योगपती अमेरिका यांच्या हस्ते होणार आहे.

डॉ. श्री. ठाणेकर.

यावेळी प्रमुख अतिथी डॉ.सदानंद मोरे (सुप्रसिद्ध साहित्यिक पुणे) तसेच विशेष अतिथी विद्यावाचस्पती डॉ.स्वानंद पुंड (साहित्यिक यवतमाळ) आभासी व्यासपीठावर उपस्थित राहणार असून,

डॉ. सदानंद मोरे                              डॉ. स्वानंद पुंड

या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. उज्ज्वला सचदेव, कुलगुरू, एस एन डी टी विश्वविद्यालय या आहेत. यावेळी राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

डॉ. उज्वला सचदेव

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने दुसऱ्या सत्रात लोककला उत्सव संपन्न होणार असून यात दिंडी, ओवी, अभंग, भारुड, गोंधळ, लोकगीत, लावणी असे विविध साहित्य प्रकार पद्मगंधा प्रतिष्ठान चे सदस्य सादर करणार आहेत.

तिसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित केले असून या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी मा. संजीवनी बोकील या आहेत. विविध भागातील प्रसिद्ध कवी आपल्या काव्यरचना यात सादर करतील.

२८ फेब्रुवारीला साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मा.प्रवीण दवणे यांच्या अध्यक्षतेखाली ‘काव्यातून घडणारे स्त्री संत साहित्य दर्शन’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून रेखा नार्वेकर, अलका दामोदरे, किरण डोंगरदिवे, आणि डॉ राम बोडेवार या वक्त्यांचे विचार आभासी व्यासपीठावर व्यक्त केले जातील.

दुसऱ्या सत्रात मेघना साने मुंबई प्रस्तुत कथा काव्य नाट्य संगीत यांची सुरेल मैफल असलेला देश विदेशात लोकप्रिय झालेला संस्कार आणि मूल्ये जपणारा कार्यक्रम ‘कोवळी उन्हे ‘ सादर करण्यात येणार आहे.
तसेच कवी कट्टा अंतर्गत काव्य लेखन आणि अलक लेखन हा उपक्रम घेण्यात येणार आहे.

मेघना साने

श्री शंकरराव जाधव पुरस्कृत मराठी भाषा साहित्य संमेलनचा हा कार्यक्रम आभासी व्यासपीठावर संपन्न होणार असून हा पद्मगंधा प्रतिष्ठानच्या फेसबुक पेज वर यू ट्यूब लिंकच्या माध्यमातून संपन्न होणार आहे असे पद्मगंधा प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष मा.विजया ब्राह्मणकर यांनी कळवले आहे.

– लेखन : संगीता वाईकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Shrikant Pattalwar on कविता
शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित