त्यांनी दारातून आत प्रवेश केला आणि लाईट, म्युझिक सुरू झालं आणि डोक्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला..!
सर्व जोरात ओरडले,
“Happy Marriage Anniversary to both of you”
अविनाश आणि रोमी आश्चर्य चकीत झाले आणि आनंदीही..!
विहान आणि रुची पुढे आले आणि त्यांना बिलगले..! वरुण ही बिलगला..!
“अरे..! आम्हाला सांगितलं की वरुण ला मल्टी नॅशनल कंपनीत जॉब मिळाला म्हणून पार्टी आहे अस..!” अविनाश म्हणाला..!
सर्व जण विचारायला लागले कस वाटलं सरप्राईज..!
खरच खुप छान होत सरप्राईज..! घरातल्या सर्वांनी आणि मुलांनी, त्यांच्या मित्रांनी कविता, कथा, डान्स, मिमिक्री अस सगळं ठेवलं होतं..!
आल्यावर पेरु, पायनपल, मँगो, ऑरेंज अशी वेगवेगळी चविष्ट पेय आणि पनीर टिक्की, ग्रील व्हेजिटेबल, पोटॅटो चीप्स ग्रील केलेले असे यम्मी वेलकम स्नॅक्स होत..!
चाट पासून ते पंजाबी, चायनीज, गुजराथी, काँन्टीनेंटल अस सगळं जेवायला होत..!
हे सगळं बघता बघता, रोमी भूतकाळात गेली..! किती भरभर दिवस जातात..! असा विचार करत..!
मुख्य म्हणजे लग्नानंतर अविनाश ने रोमीच धर्म परिवर्तन केलं नाही…! कोणीच तसा आग्रह ही धरला नाही ..! रोमी थोड्याच दिवसात सासूबाईंच्या गळ्यातला ताईत झाली…! इतकी की रविवारी आईबाबा, अविनाश आणि रोमी चर्च ला ही जात..! दोन्ही धर्माचे सण आनंदाने साजरे होत असत..! तिला घराने आणि तिने ही घराला आपलंसं केलं होतं..! थोडा संयम, शांतपणा नाती टिकवून ठेवतो….!
लग्नानंतर दोन वर्षांनी विहान झाला..! विहान जेमतेम तीन वर्षांचा झाला आणि साधं तापाच निमित्त होऊन बाबा गेले..!
आई एकदम खचल्या..! विहान च्या बाललीलात
मन रमवत होत्या, तरी इतक्या वर्षाचा सहवास..! एकट एकट वाटत होतच..!
सहा महिन्यांत त्याही गेल्या…
विहान शाळेत जायला लागला आणि रोमीला एका नवीन उघडलेल्या क्लासमध्ये इंग्लिश आणि हिंदी शिकवण्यासाठी नोकरीची संधी चालून आली..! वेगळं क्षेत्र होत..! खर तर आर्थिक गरज ही न्हवती..! तिला बालपण अनुभवायला मिळालं न्हवत..! ते तिला मुलांना वाढवताना मिळत होत..! म्हणून तिने ही नोकरी स्वीकारली..!
तिला फार अनुभव न्हवता..! तिने तिच्या स्वभावाने, मेहनतीने ते ही पटकन आत्मसात केलं..!
एका वर्षाने रुची झाली..! घरात विमलाताई पहिल्यापासून मदतीला होत्याच..!
अविनाश परदेशात लेक्चर्स द्यायचा..! त्या निमित्ताने दुबई, ऑस्ट्रेलिया, U K, U S असे बरेच देश ही फिरून झाले..!
लग्नानंतर मिताली, समीर ने आईवडीलांना खर सांगितलं..! रागावले थोडे दिवस, नातवाला पाहून माफ केलं..! त्याच्या बाललीला दोन्ही आजीआजोबा एन्जॉय करायचे..! वैभव नावही दोन्ही आजीआजोबांनी ठेवलं नातवाच…! नावाप्रमाणेच वैभव ने आनंदाच्या वैभवाने घर भरलं दोन्ही कडच..! रोमी मितालीकडे दोन, तीन वेळा जाऊन आली..! ती ही भारतात यायची..! मैत्री आता प्रगल्भतेकडे झुकली होती..!
आयुष्यात चढ, उतार आले बरेच..! अविनाश चा अपघात झाला..! एक महिना दवाखान्यात आणि जवळपास सहा महिने तो घरीच होता..! मिताली मदतीला आलीच होती..! फार चिडचिड करायचा..! सर्वांच्या मदतीने त्यातून बाहेर आला..! परत लेक्चर्स घ्यायला लागला..! आता त्याच लेक्चर्स मधल अँग्रेशन कमी झालं होतं, तेही वैचारीकतेकडे जायला लागलं होतं..! वय आणि काळ प्रत्येक व्यक्तीमध्ये बदल घडवतोच..!
विहान, रुची, वैभव, वरूण ह्यांच्यात ही छान मैत्री झाली होती..!
रुची बारावीला गेली आणि तो भयानक प्रसंग आयुष्यात आला..!
अगदी अपेक्षित नसलेला..! अश्या प्रसंगाला कस सामोरं जायच हे ही माहीत न्हवत…!
काय झालं होतं नक्की ?
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
खूपच छान.
लेखिका प्रतिभा चांदुरकर
🌹🌹