मध्यमवर्गीय घरात आपण सुरक्षित असतो आणि मुलं ही..। कष्ट करून पैसे कमवायचे, मुलांवर चांगले संस्कार करायचे, त्यांना उच्च शिक्षण द्यायच आणि कोणावर अबलंबून रहायला नको म्हणून वृद्धापकाळाची सोय करून ठेवायची..। अस साधं आयुष्य जगणारे आपण..।
आपल्याला बाहेरच भयंकर जग कस असत ह्याची फार कल्पना नसते..। बातम्या ऐकतो, शहारतो, रागावतो, काहीतरी करावस वाटत असते म्हणून दान धर्म करतो..।
असच साधं आयुष्य जगलेल्या रुचीला आणि अविनाश, रोमीला हा खूप मोठा मानसिक धक्का होता..। मती गुंग झाली होती..।
रुची घरी आल्यावर तिने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलं..। तिला खूप समजावत होते अविनाश आणि रोमी बाहेरून..। तब्बल चार तासांनी तिने दार उघडलं..। विहानने सर्वांना समजावलं आणि दोन घास खाऊन झोपायला लावलं..।
झोप येणं शक्य होत ? अविनाश आणि रोमीने जेव्हा ती जागा पाहिली, तेव्हा तिथून दहा, बारा मुलींना बाहेर काढलं होत रुचीबरोबर…। सगळ्या पंधरा ते सतरा वयाच्या, काही त्याहून ही लहान..।
पोलिसांनी अविनाश आणि रोमीला लांब उभं केलं होतं..। कोणाला कळलं असत तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता..।
काही मुलींशी लग्न करून त्यांचा वापर करून विकून टाकलं होतं..। त्यांना कोणाचाच आधार न्हवता..। आईवडील किंवा नातेवाईक कोणीच ह्या मुलींना जवळ करत नाहीत..। हे दारुण सत्य आहे..। समाज सुधारला, कशात ? तर छान छान कपडे घालून, पार्टी करण्यात आणि आम्ही किती मॉडर्न आहोत, नव्या विचारांचे आहोत हे दाखवण्यात..। प्रत्यक्षात आपण ठामपणे कोणाच्या पाठीशी उभं राहतो का हा एक प्रश्नच आहे अजून..। ते बघून रोमी आणि अविनाश च्या अंगावर सरसरून काटा आला..।
आपल्या आयुष्यात अस काही घडेल, ह्याची कल्पनाही ते करू शकत न्हवते..। पण म्हणतात ना, “दैव जाणिले कुणी ?” ..।
रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही कोणाचाच..। तरी सकाळी अविनाश आणि रोमी उठले ते एका निश्चयाने…।
अविनाश च्या आईवडीलांचं जून घर होत भांडुप मध्ये..। जे रेंट वर दिलं होतं..। अविनाश ने देखील अजून एक घर त्याच कॉम्प्लेक्स मध्ये घेतलं होतं..। लग्न झाल्यावर जर मुलांना वेगळं रहायचं असेल तर त्याची सोय जवळच असावी जेणेकरून एकमेकांना एकमेकांची मदत होईल..।
भांडुपच घर तस बऱ्यापैकी मोठं होत..। ज्या मुलींना कुठेच आसरा नाही त्यांना तिथे ठेवायचं, सक्षम करायचं आणि स्वतःच्या पायावर उभं करायचं…। अस दोघांनी ठरवलं..
आयुष्यातल हे वळण खूप वेगळं होत..। ह्या वळणाने, त्यांना समाजकार्याकडे वळवलं..।
त्यांनी एका संस्थेची स्थापना केली, “आपलं घर” ह्या नावाने आणि त्याच अध्यक्षपद रुचीला दिलं..।
सुरवातीला रुची घराबाहेर ही पडत न्हवती..। तासनतास हरवलेल्या डोळ्यांनी हवेत बघत बसायची..। कधीतरी खूप रडायची..। चिडायची ही खूप..। तिच्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली..।
तिला समजावून ते आठवड्यातून दोनदा तिला, “आपलं घर” मध्ये घेऊन यायचे..। हळूहळू ती सावरली..। कॉलेजची दोन वर्षे बुडाली..।
आपण खूप भाग्यवान आहोत, आपल्याला आईवडिलांचा भक्कम पाठिंबा आहे, ह्याची जाणीव झाल्यावर तिने कॉलेज, “आपलं घर” नीट सांभाळायला सुरवात केली..
एक दिवस ती “आपलं घर” च्या ऑफिसमध्ये काम करत असताना, “आत येऊ का ?” अस एका देखण्या, रुबाबदार तरुणाने दार नाँक करत विचारलं…।
“हो..हो..या ना ..” ती गडबडीत म्हणाली..।
कोण होता तो तरुण ?
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800