न्यूज स्टोरी टुडे चं नाशिक येथील स्नेहमिलन काल दि. २४.०२.२२ रोजी, अतिशय हसतखेळत पार पडलं.
ग्राहक चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते तथा माणुसकी सोशल फौंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी यावेळी त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन ग्राहक जागृतीचे महत्व विशद केले.
जेष्ठ माध्यमकर्मी, श्री विजय पवार यांनी त्यांचे प्रसार माध्यमातील ४० वर्षांच्या अनुभवांचे सार सांगितले. यावेळी जेष्ठ कवयत्री प्रा सुमती पवार यांनी त्यांच्या अध्यापन क्षेत्रातील विविध अनुभव सांगून त्यांची पुस्तके उपस्थितांना भेट दिली.
प्रा सुमती पवार व कवी, अभिनेते अजय बिरारी यांनी त्यांच्या स्वरचित कविता गाऊन या स्नेहमिलनात वेगळाच रंग भरला.
प्रारंभी न्यूज स्टोरी टुडे चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ व सौ अलका भुजबळ यांनी उपस्थितांचे स्वागत करून पोर्टलचे उद्देश, वाटचाल, स्वरूप, मिळणारा प्रतिसाद या विषयी माहिती दिली.
या स्नेह मिलनात, सौ अनिता पवार, सौ वंदना व श्री भूषण दीक्षित, सौ वर्षा व श्री विवेक वैद्य, श्री हर्षद गायधनी, योगेश मालुझकर उपस्थित होते.
– टीम एनएसटी. 9869484800