कुणा काय वाटेल
नाही अपेक्ष
मला काय सुचते
छान निरपेक्ष
मोबाईलवर उतरते काव्यसाक्ष
उमलूनच बहरतो शब्दांचा वृक्ष
अंतर्मनात विचारांचे धुंदावर्त
फिरत राहते
सतत भोवऱ्यात
नकळत शब्द सूर गवसतात
अचानक एकमेकांशी गुंफतात
कुणी वाचेल
कुणाला आवडेल
न माहीत मला
जमेल न जमेल
ज्ञात नसते की
कुणा समजेल
ज्याला पारख
त्यालाच उमजेल
जेंव्हा अशी असते शब्दांची वेणी
काव्य वेडी
म्हणतही असेल कुणी
तरी माझ्याच माथी माळते त्रिवेणी
ज्ञात मजला हसतही असेल कुणी
शब्द बंबाळ होते रात्रंदिन नयनी
शिरावरी जणू ओझे विचार शयनी
कधी मोकळे आकाश करू अवनी
ज्यांस आवडे
त्यांनी ठेवा संग्रहानी
आता या शब्दांनाच
मनी कोंडुनि
आवरेना शब्द पिसारा येई फुलुनि
काव्य फुलांचा गजरा सुगंध भरुनि
हृदयकुपीतच
ठेविते हा सांभाळुनि

– रचना : स्वप्नगंधा आंबेतकर. विरार