माध्यम व संवाद शिक्षण क्षेत्रात लक्षणीय योगदानाबद्दल ग्लोबल मिडीया एज्युकेशन कौन्सील (जीएमइसी) व्दारे जीवनगौरव पुरस्कार दिला जातो . २०२२ चा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्त दिला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार ज्येष्ठ माध्यम़ शिक्षक, माध्यमतज्ज्ञ व माज़ी कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे सर यांना घोषित झाला आहे.
“माहिती युध्द“ या विषयावर होत असलेल्या आंतरराष्ट्रीय वेबीनारमध्ये हा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे.
माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता विश्वविद्यालयाचे कुलगुरू व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ मास कम्यूनिकेशन, नवी दिल्लीचे माजी महासंचालक प्रो. के. जी. सुरेश हे ग्लोबल मीडिया एज्युकेशन कौन्सीलचे अध्यक्ष असून वरिष्ठ माध्यमतज्ज्ञ प्रो. उज्ज्वल चौधरी हे त्याचे सचिव आहेत. या संघटनेच्या १० देशांमध्ये शाखा असून माध्यम व संवाद शिक्षण या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन, अभ्यासक्रम गुणवत्ता सुधार, माध्यम शिक्षा प्रसार माध्यम उद्योगातील देवाणघेवाण, माध्यम संशोधन आदि बाबतीत ही परिषद काम करते आहे.
अल्प परिचय
प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी “माध्यमांचे अर्थशास्त्र व मक्तेदारी” या विषयावर संशोधन केले असून माध्यम शिक्षणातील युनेस्कोचा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम भारतात सर्व प्रथम संस्थापित करणे, पत्रकारिता व माध्यम शिक्षणात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डीजीटल स्टुडिओ, एचडी रेडिओ, मल्टीमीडिया लँब आदिंच्या सुविधा निर्माण करणे व ग्रामीण -निमशहरी भागातील पत्रकारितेची काहीही पार्श्वभूमी नसणारे शेकडो विद्यार्थी पत्रकार, संपादक, जनसंपर्क अधिकारी, संवादतज्ज्ञ, प्रसारण पत्रकारितेतील पत्रकार घडविण्याचे कार्य प्रा. सुधीर गव्हाणे सर निरपेक्ष भावनेने गेली चाळीस वर्षे करीत आहेत.
माध्यम संशोधन क्षेत्रात एम. फ़ील अभ्यासक्रम सुरू करून युजीसीच्या व आयसीएसएसआरच्या फेलोशीप्स, पीएचडी व पोस्टडॉक फेलोशीपच्या रूपात त्यांनी विद्यार्थी संशोधकांना संधी निर्माण केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागात जवळपास ५० हून अधिक संशोधकांना सुमारे अडीच कोटी रुपयांच्या फ़ेलोशिप प्राप्त झालेल्या आहेत.
प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, १५ संशोधकांनी उत्तम दर्जाचे पीएच. डी . प्रबंध व १० संशोधकांनी एम. फील. लघुप्रबंध पूर्ण केले असून सध्या पाच देशातील संशोधक त्यांच्याकडे संशोधन करीत आहेत.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800
डॉ. सुधीर गव्हाणे सरांचे हार्दिक अभिनंदन
डाॅ. सुधीर गव्हाणे यांचे हार्दिक अभिनंदन!!