जगभर ८ मार्च हा महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने कर्नाटकच्या कुर्ग जिल्ह्यातील जंगलात असलेल्या कलात्मक ‘कॅपिटल रिझोर्ट‘ मध्ये न्यूज स्टोरी टुडे च्या संपादक अलका भुजबळ यांच्या संकल्पनेनुसार, उस्फुर्तपणे आयोजित करण्यात आलेला महिला दिन चांगलाच रंगतदार आणि अविस्मरणीय अनुभव देणारा ठरला.
यावेळी महिलांनी, कुर्ग पद्धतीने साड्या नेसून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रेखा जोशी यांनी महिला दिनाचा इतिहास, स्त्री हक्काची चळवळ आणि या दिनाचे आजच्या घडीला असलेले महत्व पटवून दिले.
“आजची स्त्री मुक्त आहे का ?” या विषयावर आयोजित परिसंवादात शुभा रेवाळे, सुरेखा धाटावकर, अलका भुजबळ, सदानंद सावंत, किरण देसाई, देवेंद्र भुजबळ यांनी आपापले विचार व्यक्त केले.
एकमेकांच्या आदराने आणि सहचार्यानेच जीवनाची वाटचाल सुकर होऊ शकते, असा या परिसंवादातुन निष्कर्ष काढण्यात आला.
६० व्या वाढदिवशीच पती निधनाची कुऱ्हाड कोसळल्यानंतर, पोटी २ मुलं असतांना, व्यवसायाचा कुठलाही अनुभव नसताना, अवतीभवतीचे लोक सर्व संपत्ती बळकावण्याच्या प्रयत्नात असताना, व्यवसायात लक्ष घालून केवळ व्यवसाय सांभाळलाच नाही तर, कशी भरभराट केली याचे सार्थ वर्णन ‘कॅपिटल रिझोर्ट‘ च्या ७० वर्षीय मालकीण बाई, ‘नायला अयन्ना’ यांनी केले. या प्रसंगी त्यांचा तसेच रिझोर्टच्या महिला कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी म्हणून, राधाबाई यांचा, हृदयाच्या ३ शस्त्रक्रिया झालेले, जिंदादिल ८२ वर्षीय प्रमोद नवघरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
प्रिया मोडक यांची नृत्यमय गणेश वंदना,
वासंती पाठक यांचे कविता वाचन,
वास्तुशास्त्र सल्लागार, मेधा नेने यांचे मार्गदर्शन, सर्वात लहानगी ईशा कुणाल चाचड हिने सादर केलेली मराठी व इंग्रजी गीते, अनुभव ट्रॅव्हल्स चे सहल संचालक किरण देसाई यांचे अनुभव कथन, कराओकेवर म्हटल्या गेलेली गाणी, महिला दिना निमित्त अनुभव ट्रॅव्हल्स तर्फे केक
आणि शेवटी जोशपूर्ण गाण्यांवर सर्वांच्या थिरकलेल्या पावलांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800
माननीय देवेंद्र भुजबळ यांनी सुरू केलेले मराठी न्युज स्टोरी टुडे चॅनल हे अत्यंत प्रभावीपणे चालवले आहे. देवेंद्र यांना दूरदर्शन, आकाशवाणी,प्रिंट मेडियाचा दीर्घकालीन अनुभव आहे. स्थळ,काळ,वेळ, व्यक्ती, घटना, प्रसंग, आणि लोकोपयोगी उपक्रम,लोक आवडीचे विविध विषयांवरील देवेंद्र चा दांडगा अभ्यास आहे. त्यांची 1बातमी किंवा आर्टीकल वाचले की पुढील सर्व बातम्या किंवा आर्टीकल सहजपणे वाचले जातात.वाचकांना आपलासा करणार्या या चॅनलला आणि संपादकांना धन्यवाद, शुभेच्छा आणि शुभचिंतन.
राम खाकाळ माजी निर्माता दिग्दर्शक मुंबई दूरदर्शन आणि संकल्पक मिशन एक गाव एक परिवार-यशस्वी गावकऱ्यांचा सुत्रधार आणि मिशन विषमुक्त शेती हीच खरी शेतकऱ्यांची आणि देशाची शक्ती.
खूप छान ! अशीच उल्लेखनीय कामगिरी करत रहा अलका! रेखा जोशी तिकडचीच आहे का?
वा! कूर्ग येथील कॅपीटल रीझाॅर्टमधे साजरा केलेला आगळा वेगळा,सर्वसमावेषक जागतिक महिला दिन ! त्याचा रीपोर्ट ही मनोरंजक.
महिला दिनी देवेंद्र भुजबळांची उपस्थिती उल्लेखनीय वाटली..