वेड्या मनाला आजही आहे,
आतुरता तुझ्या परत येण्याची
रातराणीच्या सुगंधाने दरवळलेल्या
आसमंतात कवेत तुला घेण्याची
सजवली कमानी तोरणे द्वारी
रंगबेरंगी सुंगधीत फुलांनी
तयारी केली तुझ्या स्वागताची
कोवळ्या उन्हाच्या किरणांनी
चमचणाऱ्या तारकांचे सोहळे
दीपमाळ तुझ्याचसाठी बनले
घेऊन ओंजळीत शुभ्र प्रकाश
चहुकडे लखलखीत बघ झाले
अभिमान वाटावा असा प्रियकर
स्वप्न बाळगले सौभाग्यवती होण्याचे
आतुरतेने वाट पाहत आहे इथे मी
पण तू नावच घेत नाही परतण्याचे
– रचना : परवीन कौसर. बेंगलोर
आतुरता..एक व्याकुळ काव्य.
सुरेख
फारच सुंदर कविता. 🌹🌹
कविता वाचताना देखील आतुरता की पुढे काय असेल.
सुंदर कविता