नवी मुंबईतील, कामगार नाक्यावर गाडी येताच नेत्र तपासणी साठी भलीमोठी रांग लागली. परंतु महिला दिनानिमित्त फक्त महिलांची तपासणी होणार असल्याचे स्वयंसेविका प्रीता नायर हिने कामगार महिलांना तपासणीसाठी बोलावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यास प्रतिसाद मिळत नव्हता.
मग डॉ.मीनाक्षी कुऱ्हे व डॉ.अश्लेषा थोरात यांनी संवाद साधला तर त्या कामगार महिलांचा प्रश्न होता… महिला दिन म्हणजे काय ग ताई…? (खरंही आहे हातावर पोट असणार्या कामगारांसाठी कसला आलाय महिला दिन !)
मात्र पुढे मैत्रीपूर्ण साधलेल्या संवादाला यश आले व त्यांची पावले आरोग्य तपासणी साठी वळाली. दैनंदिन रोजंदारी महिला कामगारांसाठी नवी मुंबईतील नेरूळ नाक्यावर प्रभात ट्रस्टच्यावतीने महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी, मोफत चष्मा वाटप तसेच व्यक्तिगत स्वच्छता जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
महिला डॉक्टरांशी शिबिरादरम्यान झालेल्या संवादातून त्यांच्या विविध प्रश्नांची उकल झाली.
आपण महिला दिन साजरा करत असताना समाजातील उपेक्षित घटकातील महिलांसाठी प्रभातच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प करू यात..
अधिक माहितीसाठी संपर्क : 9869432224
– टीम एनएसटी. ☎️9869484800