मालवणी भाषेत !
कोकणात गावी फुलांका
सुरंगीची फुला म्हणतत
गजरो जरी बनयल्यांनी
वळेसार हुनान सांगतत
सुरंगीचो हार सगळ्यांका
कसो बाय जीव लावता
फुला बघून वास खुणायता
वासान आसमंत तो भरता
झाडा फुलाक लागली काय
गावभर फुलताना गमतत
पोराटोरा मगे झाडाखालीच
कळे,फुला काढताना रमतत
वासान मगे घरदार परमाळता
झाडाभोवती नागिणीचो वास
फुलांका बघूनच मनव भरता
ध्यानीमनी मगे फुलांचो भास
स्वर्ग सोना कोकणात गावता
पिवळो, केशरी रंग भारावता
फांद्या फांद्यांक कळी लागता
हिरव्या पानांक शोभा चढता
फुलांचा अत्तर, तेल बनता
कुणी तेका अलमारी ठेवता
कुणी मगे देवावरय घालता
वळेसार तो माथ्यान खोवता
रात्रीक ह्यो वळेसार करतत
सुई, धाग्यान ओवत जातत
वळेसार बघून प्रीत फुलता
घरवालनीचो चेहरो खुलता
चार दिसांचो ह्यो गमता खेळ
मागाच्या महिन्यान बहरतत
काढुक जाताना लागता वेळ
गंधीत वारे गावभर फिरतत
– रचना : सौ माधवी प्रसाद ढवळे. राजापूर
मी मार्च महिन्यात नेहेमी सुरंगीचा गजरा घालायचे. अमेरिकेत आल्यावर तो आनंद हरवला पण तुमच्या कवितेने पुन्हा तो मादक गंध आठवणीत दरवळला.
खूप छान वर्णन केलं आहे इतकं की सुरंगीचा दरवळ इथेपर्यंत पोचला.👌🏼👌🏼👌🏼👌🏼