Tuesday, September 16, 2025
Homeसाहित्यवाचक लिहीतात...

वाचक लिहीतात…

चैतन्यानुभूती हा एक विस्तृत विषय आहे.ती एक साधना आहे.
सायली कस्तुरे यानी थोडक्यित पण नेमके सोप्पे करुन सांगण्याचा छान प्रयत्न केला आहे.

माझी आई..
वर्षा भाबल यांच्या कणखर मातेस आदरपूर्वक वंदन!!

मराठी कवितेतल॔ सुरेल स्वप्न : मंगेश पाडगांवकर
श्रीकृष्ण बेडेकर यांचा कवीवर्य मंगेश पाडगांवकरांचा लेख फारच सुंदर..
प्रत्येक मराठी माणसाचं पाडगांवकरांच्या कवितेशी घट्ट नातं आहे.
हा लेख वाचतांना त्यांच्या अनेक कविता मनात खळखळून गेल्या.

आतुरता..एक व्याकुळ काव्य. सुरेख

कधी थांबणार हुंडाबळी ?
खरोखरच हुंडापद्धती ही मानवतेला कलंक आहे !

“कुर्ग” मध्ये रंगला महिला दिन
वा! कूर्ग येथील कॅपीटल रीझाॅर्टमधे साजरा केलेला आगळा वेगळा, सर्वसमावेषक जागतिक महिला दिन ! त्याचा रीपोर्ट ही मनोरंजक.
महिला दिनी देवेंद्र भुजबळांची उपस्थिती उल्लेखनीय वाटली..

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला
स्वाती सुळे…तुमचं म्हणणं शंभर टक्के पटलं.
आजची स्त्री स्वत:वर प्रेम करायला शिकली आहे.ही खूप मोठी मिळकत आहे !!

‘एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख…’
एका तळ्यात होती ..या गदीमांच्या गीताचे सुरेख रसग्रहण.
आपणच आपल्याला ओळखावे हा सुरेख संदेश या गीतातून
दिला आहे.
एक आवर्जून सांगावेसे वाटते की या पोर्टलवरुन प्रसिद्ध होणार्‍यासर्वच लेखांसाठी केलेली सजावट अप्रतिम असते !!

मास्टर माईंड हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे.
– राधिका भांडारकर

हुंडा : पवित्र विवाहविधीला गालबोट
अभ्यासपूर्ण लेख. खरच प्रत्येकाने ही प्रथा बंद होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
– आरती करमरकर

महिला दिनाच्या निमित्ताने…..
अतिशय विचारपूर्वक लेख !
– अरूणा मुल्हेरकर

आतुरता
कविता वाचताना देखील आतुरता की पुढे काय असेल.
सुंदर कविता
– विलास कुलकर्णी.

“कुर्ग” मध्ये रंगला महिला दिन
खूप छान ! अशीच उल्लेखनीय कामगिरी करत रहा अलका! रेखा जोशी तिकडचीच आहे का ?
– प्रीति परदेशी

“ओठावरलं गाणं”
‘लावणी’ चे रसग्रहण !
आतापर्यंत ही लावणी ऐकली-बघितली पण यापुढे ऐकतांना तुमचे कडव्याचे स्पष्टीकरण आठवेल आणि लावणी ऐकण्याची रंगत वाढेल, इतक छान रसग्रहण. खूप खूप छान.
– आशा लिंगायत.

लावणीचं रसग्रहण हा साहित्यिक दृष्ट्या काहीसा अवघड प्रकार आहे, पण आपण तो यशस्वीरीत्या हाताळला आहे. अभिनंदन !! 👌👌👍💐
– रवींद्र खासनीस.

खूपच छान लिहिले आहे.
धन्यवाद. तनुजा madam 🌹🌹🙏🙏
– अशोक साबळे.

सिंगापूर : हुंडा स्थिति
मोहना कारखानीस.
खूप छान वर्णन केलंय आपण.

मलय हे प्रामुख्याने मलेशियाई.
China town hi china लोकांची वस्ती.

Little India ही एक भारतीय लोकांची वस्ती आहे.

सर्वात मोठे मॉल सिंगापूर मध्ये ते आहे
मुस्तफा मॉल.
तो आहे एक इंडियन मालक.

भारतीय सरदार तर खूप आहेत.

Official laungage तामिळ पण आहे.
प्रेसिडेंट पण indian तामिळ होते. Mr. जगन्नाथन.
If i am not wrong

Changi Air port. Word’s busiest port.
Next is changi Naval base
Approx 25/30 km from city.

The best city n country in the world.
Santossa island.
एक दिवास्वप्न.

Night safari.
डॉल्फिन show 🌹🌹
धन्यवाद madam.

मी सिंगापूर.
Ambassy मध्ये. Naval attachi होतो

त्यामुळे सर्व वर्णन केलंय 🌹🌹

काही कविता : स्त्री शक्ती
काय बोलाव तेच कळत नाही. खूपच मार्मिक ज्वलंत अश्या कविता लिहिलेल्या आहेत.🌹🌹 सर्व कविचे मनःपूर्वक अभिनंदन.
🌹🌹 भुजबळ साहेब🌹🌹

हुंडा : ऑस्ट्रेलियातील स्थिती
खूपच छान लेखन.
वर्मी घाव लागणारे असे वाक्य. पण वास्तव लिहिले आहे.🌹🌹
– अशोक साबळे.

गव्हाणे सरांना जागतिक पुरस्कार
डॉ. सुधीर गव्हाणे सरांचे हार्दिक अभिनंदन
– सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी.

आम्ही “माहेरवाशिणी”
खुप खुप छान लेख. वर्षा, अलका तुमच्या पुढच्या ट्रीपपूर्वी मला सांगा हं, मी पण येईन तुमच्या बरोबर. अस “माहेर” आपल्याला, महिलांना, हव असत जिथे सगळी बंधने सहजतेने दूर करता येतात. लेख अतिशय आवडला. प्रतिसादाला उशिर होत आहे. 🙏 पुरूषांना अस का वाटत नाही हा विचार मात्र मनांत आला. उत्तर मिळेल का ?
– लीना फाटक. यु. के.

Congratulations to you Vasu. We are all so proud of you!
– अर्चना कवलकट.

कुर्ग मध्ये तुम्ही, विशेषतः संपादक अलका भुजबळ यांच्या कल्पनेतून साकारलेला महिला दिन छान वाटला. पहिली दाद या कल्पनेला. त्यांच्या पद्धतीच्या साड्या नेसणे, मस्तच. I miss it, असे म्हणावेसे वाटले. छान दिसताहेत सर्व सख्या. सत्कारही योग्य व्यक्तींचा! जिंदादिल श्री. प्रमोद नवघरे यांना नमस्कार आणि स्फूर्तिदायी म्हणून कौतुक.
– नीला बर्वे. सिंगापूर

हुंडाबळी ह्या विषयावर सर्वांनीच छान माहिती दिली आहे. कुठे कायकाय प्रथा आहेत ते ह्या लेखांमधून कळलं..

महिला दिनाच्या निमित्ताने राधिका भांडारकर ह्यांनी मांडलेले विचार ग्राह्य आहेत. मुले कितीही बिझी असली तरी आईशी थोडातरी संपर्क साधावा हे वाटण साहजिक आहे…

दीपक ठाकूर ह्यांनी रामदास भटकळ ह्याची सुंदर ओळख करून दिली आहे. ह्या वयात कामात व्यग्र राहून गाण्याचा रियाज चालू ठेवणं हा तरुण पिढी समोर ठेवलेला आदर्श आहे. लिखाण उत्तम आहे..

परवीन कौर ने आतुरता लिहावी ह्याच अतिशय आश्चर्य वाटल पण छान कविता आहे, अभिनंदन..
– सुनंदा पानसे.

जागतिक राजकारण याची प्रस्तावना पुस्तका बद्दल खूप काही सांगून जाते. जागतिक राजकारणा वरील हे पुस्तक मराठीत आहे आणि त्याचा खूप विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. खूप खूप अभिनंदन डॉ अंजली रानडे ताई💐💐💐

महिला दिनाच्या पूर्व संध्येला हा स्वाती सुळे यांचा लेख अप्रतिम.
स्त्री स्वतःच्या उदरात बीज घेते आणि मायेने त्याचे संगोपन करते.तिला लाभलेली ही नैसर्गिक देणगी आहे.त्या बदल्यात ती फक्त प्रेम कृतज्ञता एवढीच अपेक्षा करत होती. पण आता मात्र स्त्री बदलली आहे.ती आता स्वतः वरही प्रेम करू लागली आहे.किती सुंदर लेख आहे. खूप अभिनंदन आणि धन्यवाद स्वाती ताई 🙏🏻

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख ….हे माझे आवडते गाणे आहे. पिलाच्या भावना खूप छान रेखाटल्या आहेत. कुरूप वेडे पिल्लू राजहंस असतो. आसावरी ताईंनी अतिशय सुरेख रसग्रहण केले आहे.

विद्या जगताप यांची पाणी कविता खूपच छान अगदी वस्तू स्थिती सांगणारी.

महत्त्वाकांक्षी नवऱ्याच्या मागे सर्वस्वाचा त्याग करून जबाबदारीने उभी राहणारी स्त्री देखील दुय्यम स्थानावर असते. महिला दिनी जागर करावयाचा असेल तर स्त्रीशक्तीचा निर्णय क्षमतेचा समान दृष्टिकोन आसलेल्या अविकृत समाज बांधणीचा असावा. राधिका भंडारकर यांनी खूप छान विचार मांडले आहेत.

आशा कुलकर्णी यांनी हुंडा प्रतिबंधक कायद्याची अतिशय सुंदर माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलिया मध्ये हुंडा देण्या घेण्याची प्रथा नाही. तिथे विवाह बाबतीत वधू वरांना पूर्ण स्वतंत्र आहे. खूप छान माहिती सुलभा ताई भारतात मात्र हुंड्याची प्रथा कित्येक वर्षांपासून सुरूच आहे.

मोहना कारखानीस यांचा सिंगापूर मधील हुंडा स्थिती सांगणारा माहितीपूर्ण लेख खूप सुंदर.

महिला दिना निमित्त स्त्री शक्तीवर लिहिलेल्या सर्वच कविता अत्युत्तम👌🏻

महत्त्वाकांक्षी नवऱ्याच्या मागे सर्वस्वाचा त्याग करून जबाबदारीने उभी राहणारी स्त्री देखील दुय्यम स्थानावर असते. महिला दिनी जागर करावयाचा असेल तर स्त्रीशक्तीचा निर्णय क्षमतेचा समान दृष्टिकोन आसलेल्या अविकृत समाज बांधणीचा असावा. राधिका भांडारकर यांनी खूप छान विचार मांडले आहेत.

आशा कुलकर्णी यांनी हुंडा प्रतिबंधक कायद्याची अतिशय सुंदर माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलिया मध्ये हुंडा देण्या घेण्याची प्रथा नाही. तिथे विवाह बाबतीत वधू वरांना पूर्ण स्वतंत्र आहे. खूप छान माहिती सुलभा ताई भारतात मात्र हुंड्याची प्रथा कित्येक वर्षांपासून सुरूच आहे.

मोहना कारखानीस यांचा सिंगापूर मधील हुंडा स्थिती सांगणारा माहितीपूर्ण लेख खूप सुंदर.

महिला दिना निमित्त स्त्री शक्तीवर लिहिलेल्या सर्वच कविता अत्युत्तम👌🏻

कूर्ग मधील महिला दिन खूप छान रंगला, अर्थात याचे श्रेय अलका भुजबळ यांना जाते. अतिशय कल्पकतेने त्यांनी कार्यक्रम आखला अगदी थोड्या वेळात त्यांनी कार्यक्रमाची बांधणी केली. त्यांच्या कल्पकतेचा प्रत्यय उपस्थित सर्वांना आला. कूर्ग पद्धतीच्या साड्या नेसण्याची कल्पना अलका यांचीच. त्यामुळे कार्यक्रमास रंगत आली. मी स्वतः साक्षीदार आहे. खूप छान अभिनंदन अलका.🌹

कधी थांबणार हुंडाबळी हा तनुजा प्रधान यांचा लेख अंतर्मुख करतो.
भारतात हुंडाबळी ही जाचक प्रथा कित्येक वर्षांपासून सुरू आहे. बंगळूर मध्ये 2020 च्या पहिल्या 16 दिवसांत 17 बळी गेले हे वाचून अंगावर कांटा आला.

हुंड्यातून महिला मुक्त झाली आहे का ? या विषयावरील सर्वच लेख अत्युत्तम.

ओठा वरील गाणे विकास भावे यांनी अत्तराचा फाया तुम्ही आणा राया या गाण्याचे खूप छान रसग्रहण केले आहे.

नारी शक्तीवरील सर्वच कविता मनाला भवल्या.
खूप छान👍टीम देवेंद्र भुजबळ सर आणि अलका ताई भुजबळ.🙏🏻🙏🏻
– सुप्रिया सावंत. नवी मुंबई.

हिन्दू सुंकृतीत अधीन राहून लग्न, हुंडा व संस्कृती काहीही संबंध नाही, तर हुंडा घेणे ही मानसिकता आहे.
– राधिका भांडारकर.

नीला बर्वे ह्यांचा लेख वाचून शहारे आले अंगावर. किती सखोल अभ्यास केला आहे त्यानी. आजही ही परिस्थिती आहे हे वाचून स्त्रीला अजूनही त्याच प्रसंगाना तोंड द्यावं लागत आहे, ती अशिक्षित असो वा डॉक्टर. माहेरहून पैसे आणावेत याकरिता तिचा छळ केला जातो, जाळल जात. जग कितीही पुढे गेलं, स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, कधी त्याच्याही वरच्या हुद्यावर काम करून अग्रस्थानी असली तरीही हुंडा तिचा छळ करतोच आहे ह्या विचारांनी मन अस्वस्थ होतंय. नीलाताई नी जिवंत उदाहरणे देऊन ह्याला दुजोरा दिला आहे. अतिशय वैषम्य वाटतंय ह्या चालीरीती बघून.
नीला ताई लेख मनापासून आवडला, बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. लेखन पण सुंदर आहे, मनःपूर्वक अभिनंदन..
– सुनंदा पानसे

“आम्ही माहेरवाशिण”
मायेचा ओलावा हा दुधावरची साय असते ! छान वर्णन केले आहे. वाचायला मजा आली. धन्यवाद.
-विलास प्रधान. मुंबई.

👍🏼 वाह !!! खूप छान सहलीचे वर्णन केले आहे…मला ही तिथे जावेसे वाटते…😀
– नीता

आदर्श शिक्षिका : सीमा मंगरुळे
अभिनंदन.
खूपच मेहनत घेऊन, एक नवा आदर्श निर्माण केलात.

केरळ आयुर्वेद.
मनीषा पाटील
खूप उपयोगी माहिती.

प्रतिभा चांदुरकर, विलास कुलकर्णी. छान मुद्दे मांडलेत.
– अशोक बी साबळे. Ex. Indian Navy. महाड

सर, केरळ मध्ये आयुर्वेद उपचार उत्तम होतात. अगदी फॉरेनर सुद्धा खास पंचकर्म, इतर आयुर्वेदीक उपचारांसाठी केरळ मध्ये येतात. तसेच काळीमिरी, लवंग, वेलची, जायफळ, तमालपत्र, असे मसाले खूप छान मिळतात. मी तिकडे गेलो की पत्नी आधी तिथून मसाले आणायला सांगते. निसर्ग सौदर्य तर आहेच🌴🌴
– गणेश जोशी. व्यंगचित्रकार. ठाणे.

आम्ही माहेरवाशिणी खूप मस्तच.
– अपर्णा महाडिक. ठाणे

NewsStoryToday is very nice, informative, & entertaining portal. Keep it up ! 💐🙏
– Sujit Dol. Pune.

आदर्श शिक्षिका, केरळ आयुर्वेद, स्वप्नरंग स्वप्नीच्या छान 👌🏻👌🏻
– सौ मंजूषा किवडे. पुणे

जेष्ठ अणि श्रेष्ठ पत्रकार भावे साहेब यांच्या वरील लेख मनाला भावला भुजबळ साहेब धन्यवाद.
– निरंजन राऊत.

कुर्ग मध्ये रंगला महिला दिन सुंदर 👌🏻👌🏻
काहीही करायचे असेल ते वय आडवे येत नाही हे ‘नायला अय्यन्ना’ यांच्यावरून सिद्ध होते.👏🏻👏🏻👏🏻
– मनीषा पाटील. केरळ.

रामदास भटकळ एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व वाचनात आले. साहित्य व संगीतातील व्यासंगी आज 87 व्या वर्षीही सुद्धा गाण्याचा रियाज, लेखन ह्या मध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू न देता तरुणाईला लाजवेल अशा सळसळत्या उत्साहात जे कार्य त्यांच्या हातून घडत आहे त्याला तोड नाही. तरूणाईचा आदर्श म्हणून हा लेख जास्तीत जास्त तरुण युवकांमध्ये पोहोचणे गरजेचे आहे.
स्वातंत्र्य चळवळीतील अनेक क्षण प्रत्यक्ष अनुभवलेले जाणकार म्हणून त्यांच्या साहित्याचा अभ्यास पूर्ण माहिती साठी उपयोग करणे आवश्यक आहे.
– सुधीर थोरवे.
पर्यावरण व औद्योगिक सुरक्षा तज्ञ. नवी मुंबई. 👍🏻🙏🏻🌹

संकट येऊन ही स्त्रियांमध्ये उभे राहण्याची हिम्मत असते. खूप छान कार्यक्रम केला.
टेंशनच्या नावाखाली काही व्यसनांच्या आहारी जातात. ६० वर्षेच्या असूनही जी हिम्मत दाखवली ती खूप कौतुकास्पद आहे.🌹

पूनम सुलानी यांनी युद्ध कवितेतून .. युध्दाचे परिणाम काय होतील. काय झाले. मानवी जीवाला भोगाव्या लागणाऱ्या जिवंत वेदना. खूप सुंदर पद्धतीने आपल्या कवितेतून मांडल्या आहेत. युद्ध ठिकाणी काय होत असेल. माणसाच्या अहंकाराचे परिणाम काय भोगावे. लागतात ते छान शब्दात व्यक्त केलेत.. 🙏🏻🌹
– संगीता सावंत. महाड

छान आहे अंक.
विशेषतः डॉ मंगेश कुलकर्णी यांनी ..जागतिक राजकारण ..पुस्तकाची प्रस्तावना आणि स्वाती सुळे यांचा लेख, इतर ही चांगले.

महिला दिन विशेषांक एकदम पानोपानी स्त्री मुक्ती, स्त्री कर्तृत्व, स्त्री बळी या सर्व विषयांना वाहिलेला आहे.
सर्व कवी, कवियत्री उत्तम प्रकारे व्यक्त होतात.
कुर्ग च्या 70 वर्षीय उद्योजिका न डगमगता रिसॉर्ट पुढे नेऊन इतरांसाठी प्रेरणा स्रोत ठरतात. छान आहेत दोन्ही अंक.

बेडेकर यांचा आठवणीतील शेवाळकर लेख भावला. अत्त्युत्तम आहे. आवडला.
इतर लेख ही वाचनीय आहेत.
– स्वाती वर्तक. मुंबई

परवीन कौसर यांची आतुरता ही कविता फारच छान.
– साहेबराव पुंड.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी. अमरावती.

प्रथम ..अलक..संमेलन वृत्तांत वाचला. संमेलनाचा उपक्रम स्तुत्य आहे. एकच इच्छा आहे किमान १० ‘अलक लेखकांचा’ अलक आपल्या न्युज स्टोरी मध्ये दर आठवड्याला ठराविक दिवशी समावेश करावा. संमेलनाच्या प्रतिनिधींनी संमेलनात आटपाट नगर सारखे ‘अलक’ कथन केले असतील तर ते टीम एन एस टी ने दिल्यास आभारी राहू. धन्यवाद
🌼सुधाकर तोरणे🌼
निवृत्त माहिती संचालक. नाशिक.

प्रथम ‘अलक संमेलन’ ला उत्तम प्रसिद्धी दिल्याबद्दल संपादकांना धन्यवाद. हल्ली वाचकांना पाचशे शब्दापेक्षा जास्त वाचायला वेळ नाही. नवीन पिढीला मराठी वाचनाचा कंटाळा येतो.
. 🌹🙏🌹
– सुधाकरराव धारव.
निवृत्त माहिती उपसंचालक. यवतमाळ

नुकतेच आम्ही कूर्गला‌ जाऊन आलो. तेथे कॅपिटल रिसॉर्टवरच राहिलो होतो. तेथील मालकीण बाईंशी गप्पा केल्या होत्या… तिकडे खूप फिरलो. पु.शी. रेगे यांची सावित्री ही विख्यात कादंबरी याच परिसरात घडलेली आहे असे मानले जाते… तिकडच्या त्या साऱ्या आठवणी जाग्या
झाल्या.🙏
– प्रल्हाद जाधव.
निवृत्त माहिती संचालक. मुंबई.

“माझी आई”
अतिशय कष्ट व जिद्द यांच्या जोरावर एका बाईपुढे यश, देखील नमते. यशवंत व्हा, जयवंत व्हा.
न्युज स्टोरी टुडेला धन्यवाद.
– विलास प्रधान. कामगार नेते. मुंबई.

“हुंडा : पवित्र विवाह विधीला गालबोट”
खूप सुंदर लेख…🌹
– जयंत येलूलकर. नगर

देवेंद्र जी महिला दिनाची ट्रिप व कार्यक्रम छानच झालेले दिसतात. आपले दोघांचे व तुमच्या ग्रुपचे अभिनंदन व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
– सुधाकर वाणी. नवी मुंबई.
💐💐👌🏻👌🏻👍🏿👍🏿

हुंडा : पवित्र विधीला गालबोट.
हा नीला बर्वे यांचा लेख अंतर्मुख करणारा आणि विचारांना चालना देणारा आहे. त्यांनी लेखामध्ये जी उदाहरणे दिली ती वाचून मती गुंग झाली.
– उद्धव भयवाळ.
जेष्ठ साहित्यीक, औरंगाबाद.

नीला बर्वे मॅडम खूप छान लेख विचार करण्यास भाग पाडणारं लिखाण आहे अगदी.
– डॉ राणी दुष्यंत खेडीकर

“हुंडा : पवित्र विवाह विधीला गालबोट”
खूप सुंदर लेख…🌹
– जयंत येलूलकर.
सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ. नगर.

कविवर्य पडगांवकर🙏🏻 यांच्या वरील लेख आवडला.
माझे आवडते कवी.
लेखन खूप छान 💐
– पद्मजा नेसरीकर

हिन्दू संस्कृतीत अधीन राहून लग्न, हुंडा व संस्कृती काहीही संबंध नाही. तर हुंडा घेणे ही मानसिकता आहे. जर कडक शासन केले तरच हे थांबेल.
– बापूराव काळे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments