जन्नत…..बानो
मी शाळेत जाणारच होते तेंव्हा चौकशी करणार असं सांगितलं.बानो ने जन्नत ला लगेच तिच्या पाकिटातून पैसे दिले आणि काहीतरी खाऊ घेऊन यायला सांगितलं.
असं सारखं मुलांना पैसे देणं मला आवडत नव्हतं हे बानो ला माहिती होतं.माझ्या कडे बघून ती म्हणाली, “बस दस रुपये दिये है दिदी. गरम जलेबी खा लेगी. आप पुछना नानीसे मैं देतीच नहीं पैसे कभी. “मी ठिक आहे” म्हणाले आणि तिने माझ्या हातात दिलेला फोटो तिला परत केला.
मला मुलांच्या शाळेत जायचं होतं आणि जन्नत चं दप्तर बाईंनी का ठेऊन घेतलं हे कळ्ल्या शिवाय बानो ची अस्वस्थता कमी होणार नव्हतीच. तिने फोटो परत त्या जुन्या वहीत ठेवला आणि लांब श्वास घेत म्हणाली, “मेरी स्कूल के फुटे छप्पर ने मेरी किस्मत भी फोड दी, किसी दिन ये दस्तान भी सूनाऊंगी. दिदी अभी आप स्कूल जाओ. आते समय बताते जाना क्या हुआ हैं ?”. असं म्हणत तिने डोक्यावरची ओढणी सावरली. मी तिला हो सांगून पुढे निघून गेले.
शाळेकडे जाताना बानो चे शब्द आठवत होते. शाळेत असं काय घडलं असणार की ज्यामुळे बानो या वेगळ्या विश्वात येऊन पोहोचली. या सगळ्या विचारांच्या तंद्रीत मी जन्नतच्या शाळे पर्यंत पोहोचले देखील. मला मुख्याध्यापिकेला भेटायचं होतं पण आज त्या रजेवर आहेत असं कळलं.मग मी जन्नतच्या बाईन कडे गेले आणि त्यांनी मला घडलेला प्रकार सांगितला. असं बऱ्याचदा घडलं होतं आधी पण, यावेळी फार वेगळी वागली होती जन्नत. मी बाईंना काय विश्लेषण द्यावं असा मला प्रश्न पडला होता. दुसऱ्या दिवशी त्या जन्नत च दप्तर परत देण्यास तयार झाल्या. तिला शिक्षा
करण्यापेक्षा तिच्या मनातलं तिला बोलू द्यावं असं मी बाईंना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांना ते पटलं देखील पण तेवढी शिक्षा करणं पण गरजेचं आहे असं त्या म्हणाल्या. मी पण कधी फार वाद घालत नसे. कारण त्या बाई मुलांना खूप मदत करत. मी बाईंचा निरोप घेऊन शाळे बाहेर पडले.
परत जाताना बानो वाटेतच थांबली असणार हे मला माहिती होतं. शाळेच्या उजव्या बाजूला एक खूप मोठा पिंपळ होता आणि त्याच्या मुळाशी देवघर कोरून एक देवीची मूर्ती बसवली होती. बानो तिथे दोन्ही हाताने दुआ मागताना दिसली.मी दिसताच तिने जवळ जवळ माझ्याकडे झेपच घेतली. तिने काही विचारण्या आधीच मी सांगायला सुरुवात केली. “कल स्कूल मे जन्नत ने दो बच्चो को हात पर बूरी तरह से काट लिया. गहरा जख्म हो गया है उन बच्चो को.
इसलिये टीचर ने उसका बस्ता रख लीया हैं. आप कूछ काहियेगा नहीं जन्नत से. मैं बात करती हुं. कूछ हूआ हैं क्या इन दो दिनो मे ?” असं मी बानो ला विचारलं तर ती काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करू लागली. आणि एकदम मला म्हणाली, “दिदी आप बैठो इधर मैं अभी आती हुं.जाना नहीं आप.” मी हो किंवा नाही बोलण्या आधीच बानो जवळपास धावतच निघाली…
क्रमशः

– लेखन : डॉ राणी खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800