नमस्कार, मंडळी.
आपण पाहिले कि, सहार पोलिस ठाणे येथे कामकाज केल्यानंतर 2011 साली माझी बदली विशेष शाखा 2 येथे झाली. तिथे मला अंधेरी पोलिस ठाणे प्रमाणे प्रशासन पोलिस निरीक्षक म्हणून काम पहावे लागले.
सदर ठिकाणी आदरणीय दोरजे मॅडम (भापोसे) होत्या. मॅडम अतिशय स्वच्छ, पारदर्शी कामाबद्दल आग्रही असत. ही पोस्टींग साईड पोस्टींग असल्याने येथे कामाचा ताण नव्हता. त्याच दरम्यान सर्व परदेशी नागरिकांची (रजिस्ट्रेशन, स्टे एक्सटेन्शन) आदी कागदपत्रांच्या स्कॅनिगचे काम करून घेतले. अर्थात फार जुने ट्रॅव्हल डाॅक्युमेंट असल्याने हे काम सोपे नव्हते पण आदरणीय दोरजे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली ते व्यवस्थित चालू होते.
दोरजे मॅडम अतिशय मेहनती व कामामध्ये पारदर्शी. विषेश शाखा 2 उपायुक्त तसेच फाॅरिनर्स ओरिजनल रजिस्ट्रेशन पोलिस उपायुक्त पदाचा, आंतरराष्ट्रीय विमानतळ इमिग्रेशन आदि सुध्दा कामे दोरजे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली चालत. हा कामाचा व्याप इतका मोठा होता की, मॅडमना कधी लंच सुध्दा वेळेवर घेता येत नसे. केरळच्या प्रतिष्ठित कुटुंबातील लाडाकोडात वाढलेल्या मॅडमना ईतके हार्डवर्क करावे लागत असे त्यामुळे माझा जीव मॅडमसाठी गलबलत असे.
मी माझ्या कक्षेतील कामकाज उत्तम पार पाडत असे. अर्थात तेथे पोलिसिंगचे इतर काम नसल्यामुळे आराम होता. पहाता पहाता 3 वर्षांचा कालावधी संपला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून माझी बढती झाली व माझी मुंबई वहातूक विभाग येथे नेमणूक झाली. तेथील अनुभव पुढील भागात पाहू या….

– लेखन: सुनिता नाशिककर
पोलिस उपअधीक्षक (सेवानिवृत्त) मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
अभिनंदन न खूपच छान.
अशोक साबळे
Ex. Indian Navy