रस्त्यावर, स्टेशनवर व अडचणीत असणाऱ्या मुलांना घेऊन विकासात्मक पुनर्वसन करीत असलेली
“समतोल फांउडेशन” ही सामाजिक नोंदणीकृत संस्था आहे. संस्थेकडे दरमहा 100/150 नवीन मुले येत असतात. सध्या 5 जिल्हे व 10 रेल्वे स्टेशन वर कार्य सुरू आहे.
समतोल” पुढीलप्रमाणे उपक्रम हाती घेत आहे. यासाठी हवाय हात आपल्या मदतीचा हात…
1) समतोल मन परिवर्तन केंद्रात 50 मुलांसाठी बायोगॅस किंवा गोबरगॅस टाकी बांधायची आहे.
2) स्वामी विवेकानंद मन परिवर्तन केंद्र 3000 स्केअर फुट आहे बांधून 10 वर्षे झाली आहे. त्यासाठी टेरेसवर शेड बांधायची आहे जेणेकरून पाणी झिरपून स्लँप पडणार नाही
3) 50 मुलांना झोपण्यासाठी बंब बेड तयार करून घ्यायचे आहेत
4) समतोलच्या निसर्गमय वातावरणात निसर्ग उपचार केंद्र सुरू होणार आहे. यासाठी सोलर सिस्टिम एक हेक्टर जागेवर उभी करायची आहे.
5) संस्था गोशाळा सुद्धा चालवते. यामध्ये एकूण 30 देशी गायी आहेत. गायीच्या सुरक्षेसाठी गोठा शेड बनवायचे आहे.
6) पाणी सातत्याने जमा राहण्यासाठी water Bank म्हणजे 50×50 चे तळे खोदून तयार केली जात आहेत जेणेकरुन सेंद्रिय शेती सुरू राहील व त्यातून अन्नछत्रातुन अन्नदान करता येईल. हे सर्व सुरू आहे. परंतु अधिक मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
7) विटभट्टी वरील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बसमधील मोबाईल शाळा School In Bus प्रयोग मुरबाड भागात सुरू झाला आहे. अधिक प्रमाणात वाढण्यासाठी बस व इतर निधी जमा करीत आहोत.
8) लोक कलावंतांच्या मुलांना शिक्षणाची संधी कला व शालेय शिक्षण उपलब्ध होण्यासाठी समतोल लोककला समतोल कलामंच हाँस्टेल तयार होत आहे. यासाठी नारायणराव, ता. जुन्नर जि.पुणे येथे 20 गुंठे जागा घेऊन बांधकाम सुरू झाले आहे. यासाठी निधी उपलब्ध करीत आहोत जेणेकरून महाराष्ट्रातील कला, संस्कृती व शिक्षण टिकुन राहील.
अशा प्रकारची मदत समतोल फांउडेशन संस्थेला अपेक्षित आहे. संस्थेकडे सर्व कायदेशीर पेपर असुन आँडीट होते. आयकर विभागाचे 80 जी सर्टिफिकेट आहे. C.S.R.Number आहे . महिला आणि बाल विभागाची परवानगी आहे. परंतु कायमस्वरूपी विनाअनुदान तत्वावर घेतली आहे
www.samatol.Org मध्ये सविस्तर माहिती दिली आहे
‘samatol foundation‘ youtuub channel आहे. धन्यवाद !!!
– लेखन : विजय जाधव.
संस्थापक, समतोल फांउडेशन
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800