मेघना खूप छान लेख आणि मराठी मनाची माहिती सगळ्यांपर्यत तू पोहोचवली आहेस. माणसं व्यवसाय, नोकरी निमित्ताने जगाच्या कोणत्याही भागात असली तरी त्याची नाळ मराठी मातीशी, इथल्या परंपरा, सणवार, मराठी भाषेशी घट्ट जुळलेली असते. मनाने ते इथेच असतात..पण जाँबसाठी त्यांना मराठी वातावरणाचा त्याग करावा लागतो….हे मराठीवरच प्रेम, संधी मिळेल तेव्हा अनेक माध्यमातून ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात आणि यासाठी सांस्कृतिक देवाणघेवाण, मेळावे, स्नेहभेट, संमेलनातून मराठीपण जपतात, मराठी संघटना सर्वदूर होत आहेत हे खरोखर अभिमानास्पद आहे…आणि तू परदेशस्थ मराठी माणसांच्या मराठीपणाची प्रसिध्दी देत आमच्या पर्यंत ती माहिती आणलीस त्याबद्दल तुझे धन्यवाद….
मी माझ्या मुलीकडे बफलोला गेले होते तेव्हा बफलो मराठी मंडळाच्या गेटटूगेदरला गेले होते…मुलांपर्यत मराठी संस्कार, संस्कृती संक्रमीत व्हावी ही इच्छा बाळगणाऱ्या तमाम परदेशात स्थाईक झालेल्या मराठी बांधवांना माझा मानाचा मुजरा
– प्रा. सौ. मानसी जोशी. ठाणे
खरंच मराठी माणसांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. परदेशात राहूनही ही माणसे आपली मराठी भाषेप्रती असलेली नाळ विसरली नाही. भारतात आम्हाला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे. तिकडे प्रदेशात मात्र ही मंडळी मराठी भाषेचा जागर करत आहेत हे खरोखरच अभिमानास्पद आहे. मेघना मॅडम मुळे ब-याच नवनवीन लोकांना न भेटता उमजून घेण्याचा योग येतो त्यांचे शतशः आभार
– दीपक म कांबळी.
ऑस्ट्रेलियातील मराठी जग
मेघनाताई संपूर्ण लेख वाचला.
महाराष्ट्रातून बाहेर परदेशात गेल्यानंतर मराठी भाषा आणि मराठी संस्कृती किती महान आहे हे दुसऱ्या संस्कृतीत गेल्यानंतरच लक्षात येते. येथील कला, क्रीडा, साहित्य, संस्कार उत्सव या गोष्टींना जपणारी तेथील मराठी मंडळी मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यासाठी खूप मोठे मोलाचे काम करत आहेत बाहेर गेल्यावरही त्यांना आपली संस्कृती, आपली भाषा, आणि आपले संस्कार जपावे असे वाटतात यातच महाराष्ट्राचे आणि मराठीचे महत्त्व अधोरेखित होत आहे. परदेशातील सर्व मराठी मंडळांचे यासाठी धन्यवाद करायला हवेत. त्या निमित्ताने आपले जे काही चांगले आहे उत्तम आहे उदात्त आहे त्याची ओळख परदेशातील लोकांना ही होते आहे. तुमचा लेख खुप छान झालाय. मला खूप आवडला. अभिनंदन
– सौ. प्रतिभा जयंत भिडे.
नवीन ग्राहक संरक्षण कायदा
नवीन ग्राहक संरक्षण कायद्याविषयी खुप सुंदर माहिती मिळाली
🙏धन्यवाद
– मोहन आरोटे.
पुस्तक परीक्षण : “चाणक्य
भा द. खेर यांची चाणक्य ही कादंबरी अतिशय वाचनीय आणि वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी आहे.
श्री. सुधाकर तोरणे यांनी या कादंबरीचे नेमके परिक्षण केले आहे,
– राधिका भांडारकर.
नशिब
🌹अप्रतिम 🌹
खूपच छान कविता, भावनास्पर्शी.
धन्यवाद
– अशोक साबळे.
हुंडा : पवित्र विवाहविधीला गालबोट
खूप अभ्यासपुर्ण लेख, समाजउद्बोधक लेख, अलका भूजबळ व देवेंद्र भूजबळ चांगला विषय हाताळण्यास प्रोत्साहीत केलेत, खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👍🙏🙏
– डॉ स्वाती दगडे.
माझी आई
खूप कठीण प्रसंगातून गेलात वर्षाताई तूम्ही (तूमची आई, कुंटूंबीय) नमन तूमच्या मातेला, तिच्या उदरी जन्मलेल्या स्री शक्तीला.🙏🙏
– डॉ स्वाती दगडे.
बये
ऊमा नाबर यांची बये ही कविता खूपच सकारात्मक.
विपरतेतही रुजतो स्नेह शोधायची असते अनवट वाट वहिवाट होऊ न देता.. सुंदर विचार.
– राधिका भांडारकर.
ऑस्ट्रेलियातील मराठी जग
नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात राहावं लागलं तरी आपल्या मायभूमीची ओढ असते, आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं त्यांना भान असतं. मेघनाताई, आॅस्ट्रेलियातील मराठी माणसाची ही भावना आणि त्यानिमित्ताने ते करत असलेले कार्य आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद !!
– श्रद्धा जोशी
मेघना ताई, संपूर्ण लेख वाचला….आवडला….मराठी भाषेची आवड, अभिमान आपल्या मातृभाषेचा विरह होतो त्यावेळेस जास्त जाणवते. आपल्या मातृभाषेचा अभिमान म्हणजे साहित्य संमेलन जे आज परदेशात मोठ्या हौसेने भरवलं जातं आहे ….हे संमेलन आयोजित करणाऱ्या सर्व मराठी कलाकारांना व त्यांची ओळख करून दिल्याबद्दल तुम्हालाही खूप खूप धन्यवाद 🙏🙏
– विकास मधुसूदन भावे.
स्वच्छता कर्मचारी भगिनींचा गौरव
मी लेकविस्टा सोसायटी मध्ये सुरुवातीपासून राहतोय. इथे सर्व सण व इतर कार्यक्रम पण खूप चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात. विशेषतः लेकविस्टाचा गणेशोत्सव बघण्यासारखा असतो. संपूर्ण 10 दिवस वेगवेगळे कार्यक्रम व लहान थोरांसाठी स्पर्धा असतात. ह्या वर्षी महिला दिन पण खूप उत्साहात साजरा झाला त्या साठी मी सर्वांचे अभिनंदन करतो 💐💐
– अमोल कोपर्डे
सुरंगी फुले
मी मार्च महिन्यात नेहेमी सुरंगीचा गजरा घालायचे. अमेरिकेत आल्यावर तो आनंद हरवला पण तुमच्या कवितेने पुन्हा तो मादक गंध आठवणीत दरवळला.
– डॅा सुलोचना गवांदे
खूप छान वर्णन केलं आहे इतकं की सुरंगीचा दरवळ इथेपर्यंत पोचला.👌🏼👌🏼👌🏼👌🏼
– संजना म्हात्रे.
रंग माझा वेगळा
रंगाचे वर्णन सुंदर शब्दात गुंफुन टाकले आहेत आपण.
अतिशय उत्तम.
🌹🌹👌
– अशोक साबळे.
रंगोत्सव : काही कविता
सुष्ट्री निराळी भासते.
Dr. सुचिता पाटील.
खूप छान
🌹🌹👌👌
सर्व कवयत्री
Nice
🌹🌹🙏🙏❤👌
– अशोक साबळे.
बातमीदारी करताना ( २७ )
बातमीदारी करताना …हा डॉ. किरण ठाकूर यांचा लेख अतिशय वाचनीय आहे. विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांना आलेले अनुभव वाचून खरोखरच थक्क झाले. कमीतकमी विद्यार्थ्याला स्थानिक ज्ञान तरी असावे ही त्यांची किमान अपेक्षाही पूर्ण होउ नये, हे खूपच लक्षवेधी आहे!
– राधिका भांडारकर.
सत्तरीची सेल्फी
बर्वे सरांची सत्तरावीची सेल्फी असावी,सत्तरीची नव्हे. माझ्या मुंबई दूरदर्शनच्या १९७७ ते २०१४ या ३७ वर्षांच्या काळात जी प्रचंड उत्साही, मंडळी भेटली त्यात बर्वे सरांचा अव्वल नं.आहे. त्यांच्याकडे सदासर्वदा प्रसन्न भाव असल्याने भावनिक वय सदासर्वदा तरुण आहे. सर तुंम्हाला आणि तुमच्या परिवाराला शुभेच्छा आणि शुभचिंतन.
– राम खकाळ
ऑस्ट्रेलियातील मराठी जग
महाराष्ट्र मंडळाचे कार्यकर्ते आणि सदस्य यांनी मराठी संस्कृतीचा वारसा ऑस्ट्रेलियामध्ये टिकवून, जोपासून, तो भावी पिढीपुढे जो आदर्श निर्माण केला आहे त्या बद्दल, सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा!!!!
– अशोक घुगे.
💦 सीमाताई यानी.. होळी सण याविषयी छान माहिती दिली. कवितेची फारच सुंदर रचना केली.
Best of luck to next presentation..🎉
– सुभाष कासार. नवी मुंबई
ऑस्ट्रेलियामध्ये होणारे त्रैवार्षिक अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन हा मराठी भाषाप्रेमी मंडळींचा येथील सगळ्यात मोठा सण. पैठणी आणि फेटे, कोल्हापुरी साज आणि नथी, लेझीम आणि ढोल अशा अनंत रूपांनी हा मराठी सण आकारतो. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मधून मराठी मंडळी खूप मोठ्या प्रमाणात संमेलनास आवर्जून येतात. अनंत क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेला ऑस्ट्रेलियन मराठी समाज त्याच्या भारतीय मराठी उगमाशी सण संपर्क प्रस्थापित करू इच्छितो आणि वृद्धिंगत करू पाहतो आहे. या मनोवृत्तीचा लाभ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यरत असलेल्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायवृद्धीकरिता उपयोगी होईल. या संमेलनांमध्ये व्यावसायिकांनी प्रत्यक्ष येणे, त्यांच्या जाहिराती करणे, आणि आपला व्यवसाय विस्तार करणे अशा संधी नक्कीच उपलब्ध आहेत. प्रस्तुत लेखक २०१० अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनाचे अध्यक्ष होत…
– मुकुंद देशपांडे
ऑस्ट्रेलियातील मराठी जग
महाराष्ट्र मंडळाच्या कार्याच कौतूक करावे तितके कमीच आहे.
Corona च्या काळातही केले गेलेले कार्यक्रम अप्रतिम आहेत.
अध्यक्ष यशवंत जगताप अणि कार्यकारी यांचे मनापासुन आभार
– अभय कांबळे.
खेळताना रंग बाई होळीचा होळीचा…
खूप सुंदर लिहिलं आहे राधिका ताई 👌🏻 लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
वाईटाची होळी, चांगल्याचं पुनर्गुंफण…किती छान👌🏻
– गौरीं जोशी कंसारा
होळी या सणाची अत्यंत महत्वपूर्ण माहीती राधिकाताईंनी त्यांच्या या लेखात दिली आहे.
जुनी परंपरा नव्या दिशेने कशी सांभाळायची ह्याचे आजच्या पिढीला छान मार्गदर्शन
– अरूणा मुल्हेरकर
वा!! मस्त.
नेवाडाची सफर आनंददायी…
कढी खिचडी : परभणीची खासियत
जो करतो तो मिळवतो..
राजाभाउंची कल्पकता, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास
आदर्शवत..
– राधिका भांडारकर.
यौवनाच्या वाटेवर
खूप भावपूर्ण रसपूर्ण काव्य…
अरुणाताईंनु सर्वांनाच यौवनाच्या वाटेवर नेलं…
– राधिका भांडारकर.
कोरोनानंतरची माझी अमेरिका वारी
वाह मोहनाताई…! सुंदर लेख आहे… तुम्ही मध्ये ‘लेक टाहो’ या शीर्षकाखाली जे लिहू लागलात, त्यात मला आधी वाटलं की तुम्हाला पाहिल्यावर तुमची लेक टाहो फोडू लागली, असं काहीसं तुम्ही लिहिणार आहात …!
पण छानच वर्णन आहे… – प्रशांत थोरात,पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
कढी खिचडी : परभणीची खासियत
कढी खिचडी परभणीची खासीयत हा लेख मनापासून आवडला उमेद न हरता खूप काही करता येऊ शकते हे ह्या लेख मालेतून नक्कीच कळलय मनापासून राजाभाऊ दादाना त्यांच्या व्यवसायासाठी शुभेच्छा 👍👌💐💐
छान कविता केली आहे लेखणीतून समर्पक भाव उतरले आहेत🌹🌹👌👍💐💐
– सौ माधवी प्रसाद ढवळे राजापूर
कविवर्य पडगांवकर🙏🏻 यांच्या वरील लेख आवडला.
माझे आवडते कवी.
लेखन खूप छान 💐
– पद्मजा नेसरीकर
मेघना साने यांनी ऑस्ट्रेलियातील मराठी जगत याविषयी सविस्तर माहिती दिली. छान वाटले वाचून आणि न पाहता, न भेटता एका समान धाग्याने जोडले गेल्याचे जाणविले. इथे सिंगपूरलाही महाराष्ट्र मंडळ विविध उपक्रम राबविते. एकूणच आपण जगांत कुठेही गेलो तरी आपली मराठी अस्मिता जपतोच. खूप शुभेच्छा मेघनाजी आपल्या सर्व उपक्रमांना !
…नीला बर्वे, सिंगापूर.
सुरंगी फुले ….reminds me childhood near my next building ‘Surangi ‘s tree. 👍
– Sangita Satoskar. Mumbai.
प्रा.प्रमोद दस्तुरकर अतिशय प्रेरणादायी प्रवास……स्वतःच्या हिमतीने विश्व उभे करण्याचा आनंद खूप मोठा असतो हे अगदी खरे.सुंदर शब्दात मांडणी केली आहे.👌
– रश्मी हेडे. सातारा
खूप सुंदर लेख आणि कविता 👌👌👌👌
– विद्या जगताप. जेजुरी, पुणे.
🕉️केरळी मसाजची छान माहिती सौ मनिषा पाटील यांनी दिली.जेष्ठ नागरिकांसाठी दोन तीन सोपे मसाज देता येणे शक्य असेल तर आवर्जून देण्याची विनंती आहे. ते असे असावेत की कुणाचा आधार न घेता स्वयं करता यावेत.आपण लवकर यावर असाच चांगला लेख लिहावा ही मनोकामना. सर्वांना त्याचा उपयोग होईल.
धन्यवाद.
☸️सुधाकर तोरणे☸️
नशिब कविता खुपच हृदयस्पर्शी व भावनिक….
– रश्मी हेडे (सातारा)
खूप खूप अभिनंदन सर. आपल्या हस्ते नियत कालिकाचे अनावरण झाले☺️ 👏👏💐💐🙏🙏ग्राहक कायदा माहिती सुंदर .👌👌👍👍
– विद्या जगताप. जेजुरी, पुणे.
सायली कस्तुरे यांचं अध्यात्मिक लिखाण खुपचं प्रभावी आहे.परमेश्वरी चैतन्य शक्तीची अनुभुती असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारचे लिखाण जमते.शुभेच्छा आणि शुभचिंतन.
– राम खाकाळ. निवृत्त दूरदर्शन निर्माता
आजच्या अंकात पुस्तक परीक्षण खूप छान. आवडले.ते पुस्तकच उत्तम आहे खरे.
– स्वाती वर्तक, मुंबई.
परदेशी राहून मराठी भाषा, आपल्या मातीसाठी मदत करत असलेल्यांची माहिती आपण करून दिली आहे हे फार छान आहे लेख खूप आवडला.याकामासाठी सर्वांना धन्यवाद् आणि खूप खूप शुभेच्छा.
– वीणा टिळक
अत्यंत महत्वाच्या ग्राहक संरक्षण कायद्याला लोकमताच्या दबावामुळे मान्यता मिळाली. त्याचा परिणाम म्हणून ग्राहकांची लूट कमी होईल असे मला वाटते.
यातील कांहीं महत्वाच्या व्यक्तीची नावे व फोन नंबर मला मिळाले तर मलाही या कार्यास हातभार लावता येईल असे मला वाटते. धन्यवाद.
– विलास प्रधान. कामगार नेते. मुंबई.
खूप छान
अमेरिका वारी 👌🏻👌🏻
कढी खिचडी सुंदर 👌🏻
– मनिषा पाटील. केरळ
नशीब
ही कविता सुध्दा
महिलांची आंतरीक धुसमुस व तिची होणारी कुचंबणा व्यक्त करणारीं
सुंदर काव्यरचना. 🌷👌👍👏👏
– विलास राऊत. विरार
सर वेळ मिळेल तसे एक एक लेख कविता वाचत असते या सदरातील सर्व मान्यवर साहित्यिक सदस्य उत्कृष्ट लेखन करत आहेत सर्वांना खरतर वैयक्तिक शुभेच्छा देण कठिण होत पण तुम्ही मला समुहात सहभागी केल्यामुळे सुंदर सुंदर वाचन करायला मिळतय त्याबद्दल तुमची आभारीच आहे 🙏🙏🌹🌹
– माधवी ढवळे. राजापूर
कढी आणि खिचडी राजभाऊंच्या हिमतीला दाद👌👌👌👌
– विद्या जगताप. जेजुरी, पुणे.
प्रशासनातील देव माणूस…खूप छान 👌🏻
लालबत्ती छानच 👌🏻
पूर्ण कथा वाचण्याची उत्सुकता
होळी कथा सुंदर👌🏻👌🏻
– मंजुषा किवडे. पुणे
अमेरिका वारी.
खूपच छान. लिखाण म्हणजे आम्ही वाचून अमेरिका गेलो असं वाटलं.
ठाणे -रंग.
खूपच छान. सुसंकृत शहर.
प्रत्येक सण उत्सव साजर करणार शहर.
– शुभा पानसरे.
छान, कढी खिचडी. मस्तच.
ओठावरलं गाणं.
विकास भावे. सुंदर.
संपादक.
श्री. भुजबळ साहेब.
धन्यवाद.
– अशोक बी साबळे.
Ex. Indian Navy
महाड
अंक वाचनीय आहे
लेक ताहो वाचताना माझ्याही तेथील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.धन्यवाद
– स्वाती वर्तक. मुंबई
ऑस्ट्रेलियातील मराठी जग हा मेघना साने लिखित लेख वाचला. मराठी भाषा आता फक्त महाराष्ट्रापुरतीच न राहता ग्लोबल झाली आहे,याचा प्रत्यय आला.मराठी नाटके,मराठी भाषा संमेलने हे सोहळे पार अमेरिकेपासून ते ऑस्ट्रेलिया पर्यंत साजरे केले जातात हे वाचून खूप आनंद झाला. मराठी माणसे जिथे जातील तिथे आपल्या मराठी भाषेचा,मराठी संस्कृतीचा ठसा उमटवत आहेत.त्यासाठी अनेक कष्ट उपसायची त्यांची तयारी असते.आणि तेही आपले नोकरी व्यवसाय सांभाळून !मनात प्रचंड आवड,ओढ असल्याशिवाय हे शक्य नाही. इतकेच नाही,तर भावी पिढीसाठी मराठी,संस्कृत शाळाही स्थापन करण्यात येतात ही खरंच आनंदाची गोष्ट आहे.परदेशातील मराठी प्रसाराचा सुरेख आढावा मेघनाताईंनी घेतला आहे.
– डॉ अलका दुर्गे
कढी आणि खिचडी राजभाऊंच्या हिमतीला दाद👌👌👌👌
– विद्या जगताप. जेजुरी, पुणे.
🕉️होळी आणि रंग याविषयावरील सुलभा गुप्ते,अलका अग्निहोत्री, राधिका भांडारकर ,सीमा तवटे यांचे सर्व लेख आवडले.सणांचे आपले अवधान उत्तम. होळी व रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
♨️सुधाकर तोरणे♨️
-निवृत्त माहिती संचालक
महाराष्ट्र शासन
रंग माझा वेगळा.. अप्रतिम लेख👌
उधळूया रंग..सुरेखच👍
सर्वच कविता, सदर नेहमीप्रमाणेच सुंदर👌
– प्रणाली म्हात्रे. मुंबई