चिमणी : अनमोल ठेव २० मार्च हा जागतिक चिमणी दिवस. पण लोभासाठी आणि विज्ञानाच्या युगात हरवून गेलेली एक अनमोल ठेव.
इवल्याशा अंगणात, होता चिमण्यांचा थवा ।
चिवचिव आवाजाने, जणू शुद्ध होई हवा ।।
भल्या रामाच्या पहारी, भरे चिमण्यांची शाळा ।
चार दाणे टिपायला, फांदीवर होई गोळा ।।
हराळीच्या गवताने, खोपा चिमणी बांधते ।
खोपा टांगून झाडाला, सुखी खोप्यात नांदते ।।
माणसाने लोभासाठी, फक्त मनमानी केली ।
त्याच्या सुखासाठी साऱ्या, निसर्गाची हानी झाली ।।
आता नाही चिवचिवाट, चिमणी दूर गेली उडून ।
तुझ्या अज्ञानापोटी, सगळं काही गेली सोडून ।।
आता नाही किलबिल, नाही कोठे चिवचिव ।
अशी अमूल्य सृष्टीची, हरवून गेली ठेव ।।
– रचना : रामदास आण्णा.
एक अनमोल ठेवा..अतिशय भावस्पर्शी सुंदर कविता.
या चिमणीत आपलं सर्वांचच चिमणविश्व सामावलं आहे..
ती चिमणी हरवली…
🌹खूपच छान रचना 🌹
गेले ते दिवस चिऊताई, खारुताई आता राहिला तो इतिहास.
आज कुणीही मुलगा नाही सांगू शकत.
गोष्ट विसरले मेनाच्या घराची नं पावसाची.
असो. शब्द रचना अप्रतिम 🌹🌹