नमस्कार, मंडळी.
आपलं शनिवारी प्रसिध्द होणारं
“वाचक लिहितात…..” हे सदर आता सोमवारी प्रसिद्ध करण्याचं ठरवलं आहे. त्याचं कारण असं की बऱ्याचदा शनिवारी, रविवारी प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया राहून जात. त्यामुळे यापुढे संपूर्ण आठवड्यात येणाऱ्या प्रतिक्रिया देता येतील.
आपला लोभ आहेच, तो असाच राहू द्या.
धन्यवाद.
आपला
देवेंद्र भुजबळ. संपादक
सर, माणुसकी फौंडेशन पुरस्कार मिळाल्याबद्दल आपलें अभिनंदन 💐, मुलाखत ही छान आहे 🌷👍
– श्रीकांत चव्हाण. आर्किटेक्, मुंबई.
डॉ राणी खेडीकर यांचा लालबत्ती…खुप भावलं .
अमर शेंडे यांनी अप्रतिम लिहलंय तरी तुमचं सगळे बोलणे त्यांना नाही टिपता आले.तुम्हीं त्या दिवशी खुपच सुंदर बोललात. धन्यवाद🙏
माणुसकी पुरस्काराबद्दल हार्दिक अभिनंदन.
ग्रेस👍👍
🎊🎊🙏🙏🏆🏆💐💐💐🌹🌹
– आशा दळवी. फलटण.
श्रीयुत देवेंद्रजी भुजबळ साहेब,
आपला
“माणुसकी हाच परमार्थ” हा लेख आपल्या न्यूज स्टोरी टुडे मध्ये प्रसिद्ध करून वाचकांना एक नवीन परामर्श मिळाला आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्यांनी ज्यांनी या संतांची शिकवण खूप नाही परुंतू थोडीही अंगिकारली त्यांना जीवन जगण्याचा खरा अर्थ कळला आणि आपण हाच धागा पकडून संतांची शिकवण म्हणजे केवळ स्वार्थ न पाहता गरजवंताला मदत करणे, तीही निःस्वार्थ पने करणे हेच मानवाचे कर्तव्य आहे हे आपल्या आजच्या लेखातून आणि आपल्या मुलाखतीतून अर्थपूर्ण बोध होतो असे आपले सुंदर विचार अनेकांचे जीवन समृध्द व सुखी होण्यासाठी उपयोगी पडतील.
– दीपक जवकर. डोंबिवली
“माणुसकी हाच परमार्थ”
अती उत्तम👌
– सुखदेवे. अमरावती
“माणुसकी हाच परमार्थ”
खूपच छान. आपले विचार आवडले. अभिनंदन💐
– डॉ डी व्ही कासार. पुणे.
क्षणभर आयुष्य
सुखाचे दिवस जगायला फुलाकडून शिकायला मिळते. छान कविता.
– विलास प्रधान. मुंबई.
छान आहे अंक.
विशेष म्हणजे गडकरी यांनी लिहिलेला र.वा.दिघे यांच्यावरील लेख आवडला.
डॉ शास्त्री यांच्यावरील लेख चांगला माहितीपूर्ण.
सुनीता नाशिककर यांचा पुढचा भाग वाचायची इच्छा व्हावी असे लेखन आहे .
कविता छान.
– स्वाती वर्तक. मुंबई.
वाचक प्रेक्षकांनी सजग रहावे असा माननीय देवेंद्रजी भुजबळ यांनी अतिशय मोलाचा संदेश देऊन जणू लेखकांना नव्याने मागदर्शन केले आहे व लाख मोलाचा सूचना देऊन एक नवी दिशा दाखवली आहे जी आजच्या काळाची गरज आहे. धन्यवाद सर 🙏
– रश्मी हेडे. सातारा
वकिल, शेतकरी, साहित्यिक र. वा. दिघे यांचे चरित्र आवडले. संपादकास धन्यवाद🙏
– सुधाकर धारव.
निवृत्त माहिती उपसंचालक. यवतमाळ
कलायात्री प्रा. सुभाष पवार. उत्तम व्यक्तिमत्त्व,
अप्रतिम लेख👌👌 सर्वच सदर उत्तम👍
– प्रणाली म्हात्रे. मुंबई.
प्रा.सुभाष पवार यांच्या वरील आपण लिहीलेला लेख खूप आवडला. ते आमच्याही ओळखीचे होते. व्हाट्सएप ग्रुप वर त्यांचें जाणे वाचले होते. कलाकार व माणूस म्हणून ही खूप चांगले होते.
– प्रा वृषाली मगदूम. नवी मुंबई.
आजचा अंक सर्वांगसुंदरच आहे. डॉ सुभाष पवार यांच्यावरील लेख मनापासून आवडला, माझ्याजवळ ही बहुलकर यांची पुस्तके आहेत. माझे ही नमन त्यांनाआजच्या हौतात्म्य दिनी प्रसिद्ध केलेला स्मिता यांचा लेख ही उत्तम रित्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व गमविणाऱ्या देशप्रेमींचा व्यवस्थित धांडोळा घेणारा आहे. आवडला.
केरळ ची सचित्र माहिती रंजक.
भावे यांनी घेतलेल्या गाण्याचा रसास्वाद ही छान आहे.
शिल्पा यांची कविता आवडली.
– स्वाती वर्तक. मुंबई
नुकत्याच झालेल्या नासिक महिला मेळावा: २०२२
महिलारत्न पुरस्काराच्या मानकरी……………
सौ.प्रतिभाताई भेलोंडे मनभा ता.जि.वाशिम.
हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.💐
– गोविंद अंधारे. सटाणा
प्रतिभा ताई तुमचे कौतुक करण्यास शब्दही कमी पडतील खरंच महिलांसाठी आदर्श आहात तुम्ही 👌👌👌👌👏👏🙏🙏
– विद्या जगताप. जेजुरी, पुणे.
Kinner Katha kup chan lihili ahe. dolayat Pani ale.khup chan.
– हीना नीलकंनी
Kinnar katha vachun, dolyat Pani anle
– गीता बोरकर
Kinnar Katha chan
– विद्या उबाळे.
किंनारांविष्यी खूप मोठी माहिती मिळाली. आता पर्यंत मला सतत वाटत राहायचे की एवढं छान पुरुष शरीर प्राप्त झालेलं असताना यांना का स्त्री सारखे रहावेसे वाटते. पण आता लक्षात आले की हा सर्व जैविक गुणसूत्रांचा खेळ आहे. त्यात त्या गरीब जीवाचा काय दोष ? खरंच समाजात उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेल्या या घटकाला न्याय मिळाला पाहिजे.
– सुप्रिया सावंत.
कवितेवरील कविता !
खुप छान !! 👌👌👌
– सुरेखा तिवाटणे. पुणे
20 तारखेचे “किन्नर” वाचले अन मन सुन्न झाले. .अकोला येथील पुरषानी आयोजित केलेले महिला संमेलनहि आवडले .सर्वच बातम्या छान आहेत.फलटण सम्मेलनाची फोटोसह बातमी सविस्तर आहे 🙏धन्यवाद.
– आशा दळवी. फलटण
कार्यशाळा घेऊन गझल किंवा कविता लिहिता येते हा उतू गेलेला गैरसमज बरा नव्हे! त्यासाठी कविवर्य भा. रा. तांबे यांच्या शब्दांत “ये अंडे फोडून बाहेरी” प्रक्रियेने जगात येऊन बरे-वाईट अनुभव घ्यावे लागतात, अलीकडे गझल लिहू पाहणा-या प्रसिध्दीलोलुपांना गझल अथवा कविता पाडणे हे ‘हातचा मळ’ वाटू लागले आहे, म्हणूनच पुढील काळात उकडलेली अंडी सोलण्याच्याही कार्यशाळा आयोजित होण्याची शक्यता बळावते ! !
– श्रीकृष्ण बेडेकर. इंदूर
वन दिनाचे महत्त्व चांगल्या रीतीने. पटवून दिलेत धन्यवाद.
– अशोक डुंबरे, निवृत्त संचालक. दूरदर्शन
बातमीदारी करतांना… लेख क्रमांक २७….
आवडला. प्रा. डॉ. किरणजी ठाकूर यांनी उच्च शिक्षण घेऊन पत्रकारितेच्या पदवी, पदविकाच्या विद्यार्थी, विद्यार्थींनींना शिकवितांना जे मार्मिक प्रश्न विचारले ते ऐकूण सध्याच्या तरूणांच्या व्रुत्तपत्र वाचनाची ? कल्पना आली.
याप्रसंगी डॉ ठाकूर साहेबांनी उत्तम मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. हा संपूर्ण लेख आवडला. माझ्या पुण्यातील सेवाकाळात त्यांचे मला दैनंदिन मार्गदर्शन मिळत होते याचा मला ही लेखमाला वाचतांना त्यांचे विषयी खुप अभिमान वाटतो. आणि त्यामुळे व्यक्तीशः मला फारच समाधान वाटते.
📘सुधाकर तोरणे📘
निवृत्त माहिती संचालक. नाशिक.
माणुसकी हाच परमार्थ – देवेंद्र भुजबळ
Very important and informative information shared by Sir
– सुरेखा तायडे.
अलका श्री. भुजबळ सरांचे खूप अभिनंदन. खूपच चांगले कार्य आहे🌹🌹
– वृंदा विजय आदतराव.
लालबत्ती ( २३ )
फार तरलतेने टिपता सारे काही. मीही अस्वस्थ झाले हे वाचून. अशा कितीजणी घुसमटत असतील नाही ? खूप वाईट वाटतं आणि आपण काहीच करू शकत नाही याचं दुःख होतं.
– नीला बर्वे
वाचक, प्रेक्षकांनी सजग रहावे – देवेंद्र भुजबळ
🌹अप्रतिम sir 🌹
आपलं कार्य हिमालय सारखं उतुंग आहे.
🌹🌹🌹🌹
– अशोक साबळे
छान विषय. साध्या प्रसार माध्यमांनी कोणत्या विषयाला किती प्राधान्य द्यायचे याचे भान ठेवावे… सुंदर.
– दिनेश पिंटो
चांगलंच लिहिलंय… !
प्रसारमाध्यमांची सकारात्मक ताकद आज आपण खऱ्या अर्थाने वापरतो आहोत का , हा एक मोठा प्रश्न आहे …
बातमीदारी करताना ( २८ )
वाह किरण साहेब..! एवढं सडेतोड उत्तर तुम्ही दिलंत, हे वाचून बरं वाटलं…
… प्रशांत थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
माणसाने स्वार्थातून परमार्थ साधला पाहिजे. भुजबळ साहेब आपण मुलांसाठी करिअरचे वेग वेगळे मार्ग दाखविल्या बद्दल आपले मनापासून आभार 🙏🌹
– मोहन आरोटे
💐देणे फुलांचे💐
🌹अतिशय सुंदर रचना 🌹
सर्व फुलांची गुंफुन माळ
बहारली कविता
अति सुंदर.
धन्यवाद.
– अशोक साबळे
Ex. Indian Navy
‘आणि, मी पोलिस अधिकारी झाले !’ ( १५ )
सुनिता नाशिककर यांचे सर्वच लेख मला आवडतात. सर्व लेख आवर्जून वाचावेत असेच आहेत. पोलीस खात्यांविषयी असलेले अनेक समज गैरसमज दूर होऊ शकतात. त्यांच्या विवीध कामांविषयी माहिती मिळते. नाशिककर यांच्यासारख्या निष्ठेने काम करणार्या व्यक्ती गोंधळलेल्या सामान्य माणसांसाठी
आशादायी, प्रेरक आणि दिलासा देणार्या वाटतात.
चौकात कैची पडली आहे अशा तर्हेच्या सांकेतिक भाषेबद्दल वाचताना खूपच मजा वाटली.
वाहतुक नियम का पाळायचे हेही त्या वारंवार सांगत असतात.
एक जागृत नागरिक म्हणून मला असे वाटते की सार्वजनिक जीवनातले नियम पाळले गेले तर शासकीय काम करणार्यांनाही सुलभ सहज विनासायास काम करता येईल.
– राधिका भांडारकर
“ओठावरलं गाणं”
विकास खरोखर वाचताना मन भरून आणि धन्य झाल्या सारखे वाटले. असे महाराज पुन: होणे नाही
– मोहन पिसाट
क्रांतिकारकांच्या कथा (१)
सुंदर रीतीने स्वातंत्र्यातील क्रांतिकारकांवर प्रकाश टाकला आहे आता पुढील भाग वाचण्यासाठी उत्सुकता..
वसंत
सुंदर शब्दांची गुंफण करून वसंताला बहार आणला आहे 🙏🌹
– सौ माधवी प्रसाद ढवळे राजापूर.
वसंत
खूप सुंदर शब्दरचना. शब्द आणि भावनांचा सुरेख मेळ. वसंताच्या हिरव्या रंगात न्हाल्याचा खूप छान अनुभव.
– अलका प्रताप माने
कलायात्री प्रा.डॉ.सुभाष पवार
डॉ. प्राचार्य. श्री सुभाष ए. पवार यांची अतिशय मुद्देसूद आणि सर्वांगीण व्यक्तिमत्वाची जाणीव श्री भुजबळ यांच्या लेखातून कळली. हा लेख निच्छितच भुजबळ सरांचे श्री पवार सरांशीचे मित्रत्व आणि आत्मीयता दर्षवते. भुजबळ सरांनी वरील माहिती प्रकाशित करून दिवंगत श्री सुभाष पवार सरांना एक आगळी वेगळी श्रद्धांजलीच वाहिली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मी ही भुजबळ सरांचे आभार मानतो….
– श्रीकांत चव्हाण, मुंबई
चित्रांच्या साम्राज्याचा महासम्राट. त्यांच्याबद्दल फार माहिती नव्हती. परंतु आपल्या लेखामुळे त्यांच्या अफलातून चित्रशैलीबाबत खूप काही समजले. अशा या महासम्राटाला मानाचा मुजरा…
– अलका प्रताप माने
“वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे”
वन दिन माहिती खूप छान…आणि लेखाबारोबर चित्र पण खूप अप्रतिम होती..
– वासंती पाठक
वसंत
🌹खूपच छान वर्णन केलं आपण. 🌹
मनाला भावलं, आता असं होत नाही.
– अशोक बी साबळे
Ex. Indian Navy. महाड रायगड.
वसंत ऋतुचे वर्णन मनाला भावले.
क्रांतिकारकांच्या कथा (१)
फार सुंदर व माहितीपूर्ण लेख स्मिताताई. देशप्रेम तुमच्या प्रत्येक शब्दात उमटलेले दिसून येते. 🙏🙏🙏
– लीना फाटक. यु.के.
क्रांतिकारकांच्या कथा (१)
मनापासून धन्यवाद, स्मिताताई…! मुद्देसूद मांडणी आणि अमोघ युक्तिवाद..!
वसंत
वाह..! वसंताचं विलोभनीय वर्णन..!
.. प्रशांत थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
“ओठावरलं गाणं”
मधूकर जोशी यांच्या लेखणीतून उतरलेल्या गाण्यापैकी हे एक सुरेख गाणं आपण रसग्रहणासाठी निवडल्याबद्दल धन्यवाद. सुंदर शब्द व दशरथ पुजारी यांनी संगीत देऊन स्वतः त्यांच्या सुरेल आवाजात गाऊन हे गीत अजरामर केले. हे गीत मधुकर जोशी यांच्या गीतशिवायन मधील आहे असे मला स्मरते.
– विवेक भावे.
हुंडा प्रतिबंधक कायदा : एक दृष्टिक्षेप
अतिशय उद्बोधक लेख आहे.. समाजातील मानसिकता सुधारणे गरजेचे आहे…
… प्रशांत थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
एक अनमोल ठेवा..
अतिशय भावस्पर्शी सुंदर कविता.
या चिमणीत आपलं सर्वांचच चिमणविश्व सामावलं आहे..
ती चिमणी हरवली…
स्मिता भागवत यांचा अतिशय सुंदर लेख.
एका प्रेरणादायी इतिहासाचे स्मरण..जे पिढ्यानुपिढ्या आवश्यकच आहे..
वृक्षवल्ली लेख तर सुंदरच आहे पण लेखासोबत जोडलेल्या सुंदर छायाचित्रांनी लेख हिरवागार केला..मस्त
– राधिका भांडारकर
🌹खूपच छान रचना 🌹
गेले ते दिवस चिऊताई, खारुताई आता राहिला तो इतिहास.
आज कुणीही मुलगा नाही सांगू शकत.
गोष्ट विसरले मेनाच्या घराची नं पावसाची.
असो. शब्द रचना अप्रतिम 🌹🌹
– अशोक साबळे
उधळू या रंग ……
वेगवेगळ्या रंगात गुंफलेली गोपी व कृष्ण यांची रासलीला, सुंदर शब्दांत केली आहे. त्याला समर्पक असे फोटो पण टाकल्याने लेख उठावदार झाला आहे. 👏👏👏
रंग माझा वेगळा…
खुपच सुंदर वर्णन केलं आहे. माणसांच्या आयुष्यातले रंग सुरेख शब्दात मांडले आहेत. अतिशय आवडले. मला तर माणसांच्या स्वभावांत रंग दिसतात. लाल रंग तापट स्वभावाचा, पांढरा रंग शांत स्वभावाचा, गुलाबी रंग रोमॅंटीक स्वभावाचा, असे बरेच रंग स्वभावविषेशात दिसू शकतील. 👌👌👌
– लीना फाटक. यु.के.