नकळत तू अचानक येतेस,
घाबरून भांबावून तू सोडतेस,
ओळख स्त्रीतारुण्याची तू देतेस,
आयुष्य घटक सखी बनतेस ॥
येण्या आधी चाहूल देतेस,
दरमहा न चुकता येतेस,
सणवारांची तमा न करतेस,
उत्साह मात्र तू घालवतेस,
तारुण्याची कळी तू फुलवतेस,
तनीमनी सुखद भावना जागवतेस,
अचानक तुझ्या न येण्याने,
आई होण्याचे सुख दाखवतेस,
बारा महिने तू दूरावतेस,
तुझ्या सवयीची हूरहूर लावतेस,
शरीर जणू हलके करतेस,
तुझ्यात मानवजात वेल वाढवतेस ॥
लपंडाव खेळूनी दडी मारतेस,
सदा सोबत असावी वाटतेस,
निसर्ग नियम तूही पाळतेस,
वार्धक्य आयु काळ दाखवतेस ॥

– रचना : सौ. वर्षा महेंद्र भाबल.
किती सुंदर कल्पना, समर्पक वर्णन केल आहे. 👌👌👌
स्त्रीत्वाची ग्वाही देणारी आणि निसर्गाच्या नियमाशी सन्मानाने
पेश येणारी कविता!!