आत्मा आतच बरा की बाहेर काढू,
सवय असेल त्याला या अंधाराची..
खरतर मनातले मांडे मनात मांडावे,
सवय नसेल त्याला या प्रकाशाची….
भूतलावर संत महंत गेले सांगून,
आत्मा आहेच की हा स्वयं प्रकाशी..
का मलाच बाकी प्रश्न हा पडतो,
मग भरारी घेत का नाय आकाशी….
का भीती वाटावी काळ्या ढगांची,
कड कडनाऱ्या त्या विजेचा आवाज..
आयकून होई धावपळ मेघांची,
बरसती धारा टपटप करूनी आवाज….
ज्याचे भरवश्यावर मी जगतोय,
तो माझ्यातला आत्मा भित्रा निघाला..
आज मी माझा मलाच विकतोय,
मनानीच आत्म्यावर घातलाय घाला….
स्वप्नातून जेव्हा जागा झालो,
अन् केले आजूबाजूचे निरीक्षण..
आज माझे मलाच वाटू लागले,
तातडीने करावे मी आत्मपरीक्षण…

– रचना : सुभाष कासार. नवी मुंबई….💦