Wednesday, September 17, 2025
Homeलेखलघु कथा : बिल पेड..

लघु कथा : बिल पेड..

राम नावाचा एक अनाथ गरीब होतकरू मुलगा पुढील कॉलेज शिक्षणासाठी परभणीला आला. तेथे तो एक  करायचा. आपले कपडे आपणच धुवायचा. सगळी कामं स्वतः करायचा. गरिबी अकाली वयस्क व शहाणी करते माणसाला. कॉलेज सुटल्यानंतर घरोघरी गृहोपयोगी वस्तू विकायचा. त्यातून मिळणार्या नफ्यातून जेवण खर्च, कपडा सत्ता, वह्या पुस्तके ईत्यादी खर्च कसाबसा भागवायचा.

एके दिवशी तो असाच घरोघरी फिरत असताना त्याला कडकडून भुक लागली. खिशात तर दमडीही नव्हती.
त्याने जवळच्या अपार्टमेंट मधील एक दरवाजा खटखटकवला. एक वयस्क स्त्री बाहेर आली. तो तिला म्हणाला, एक ग्लास पाणी मिळेल काय ? तिला लक्षात आले कि तो खूप भुकेला आहे मात्र संकोचाने पाणी मागत आहे. तिने त्याला आत सोफ्यावर बसायला सांगितले. आंत जाऊन गरम ग्लासभर दुध व बिस्किटे आणली. त्याने ती बिस्किटे खाल्ली व राहिलेले संपूर्ण दुध गटागटा पिले.

तो म्हणाला, आई किती पैसे झाले ?
त्यावर ती ऊत्तरली,
तु माझ्या मुलासारखा! आपल्या मुलांकडून का कुठली आई पैसे घेते ?
राम त्यांच्या पाया पडला व पुढील घराकडे वळला.

तो अभ्यासात खूप हुशार होता. तो वर्गात नेहमीच पहिला असे. त्याचा नंबर शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे एम बी बी एस ला नंबर लागला. त्याला आता स्कॉलरशिप ही मिळत होती. नंतर त्याने एम. एस. सर्जरी केले. पुढे परभणी येथे स्वतःचे हॉस्पिटल सुरू केले.
त्याचा मायाळू स्वभाव, गरिबीची जाणीव, वाजवी फी व शस्त्रक्रियेतील नैपुण्य या जोरावर तो एक निष्णात सर्जन म्हणून सर्वदूर प्रसिद्ध पावला. डॉ राम कडे दुरदुरून रुग्ण उपचारासाठी येऊ लागले.

एके दिवशी एक म्हातारी हॉस्पिटल मध्ये कुणीतरी
गंभीर अवस्थेत आणून टाकली म्हणून सिस्टरने मध्यरात्री फोन केला. डॉ राम हॉस्पिटल वरच सहकुटुंब राहत होता. तो ताबडतोब खाली आला. त्याने तिला व्यवस्थित तपासले. ती गंभीर रुग्ण होती. निदान केले.
Acute perforated Appendicitis with Peritonitis तात्काळ भुलतज्ञ डॉक्टर मित्राला बोलावून Preoperative करून Emergency operation साठी operation Theatre मध्ये घेतले. छान ऑपरेशन करून स्पेशल रुममध्ये
सेवकाने आणुन ठेवले.

ती नंतर शुध्दीवर आल्यावर, नर्सिंग स्टाफ व सेवकांना विचारु लागली. कुणी ऑपरेशन केले याची चौकशी करू लागली. डॉ शाम ही राऊंड ला आले. त्यांनी तपासून post operative medicine दिले. त्यांच्या लक्षात आले, ही तीच म्हातारी आहे, जिने आपल्याला वाईट काळात पाणीच नाही तर ग्लासभर दुध दिले होते व मुलगा मानले होते.
तो म्हणाला, आई, तुम्ही त्याच का ?
त्यावर ती म्हातारी म्हणाली, हो ती मीच संध्या पाटील!!

सातवे दिवशी टाके काढले. आजी ठणठणीत बरी झाली होती. तिने नर्सिंग स्टाफला विचारले, किती बील झाले ? त्यावर रिसेप्शनिस्ट ने सांगितले, 71,000/ रूपये. डॉ राम राऊंडला आले. त्यांनी आजीकडून एक रुपयाही घेऊ नका असे रिसेप्शनिस्ट व स्टाफला सांगितले आणि केस पेपर वर लिहिले,
“Bill already paid in Full Glass of Milk & Biscuits.” त्यांनी वाकुन आजीला नमस्कार केला.

डॉ राजेश गायकवाड

– लेखन : डॉ राजेश गायकवाड. अहमदनगर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अतिशय सुंदर कथा राजेश गायकवाड यांची.
    आयुष्यात निस्वार्थीपणाने केलेल्या चांगल्या कामाची परतफेड
    कधी ना कधी होतेच..म्हणून संचय असावा तो सत्कर्मांचा.
    हेच खरे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं