Thursday, February 6, 2025
Homeसाहित्यमाझा धर्म

माझा धर्म

सोडून मज गेलास सख्या तू
हे सत्य की असत्य
हा भास की आभास
काही समजेना म्हणून मी निराश
सोडूनि मज गेलास सख्या तू ||
का कोप मजवरी
सोडूनि गेलास अधांतरी
का रुसवा का अबोला?
काहीच कळे ना सांग ना मला
सोडुनी मज गेलास सख्या तू||

सहज आरश्यापुढे उभी राहते मी
माझाच चेहरा न्याहाळीतें मी
माझी मे नसतेच नसते
स्वतःला विसरुनी जाते
सोडूनि मज गेलास सख्या तू||
तू सतत समोर असताना
झाला होतास आरसा माझा
न मागता सर्व काही देणारा
आता कुठे शोधू मी तुला
सांग ना मला
सोडुनि मज गेलास सख्या तू ||

श्रुती सारखे कन्यारत्न देऊन
केलेस सुखी तू मला
आपल्या नातीमध्येच शोधते मी तुला
सोडुनी मज गेलास सख्या तू||
आपल्या दोघांची त्यांना
हवी होती साथ
नियतीने केला जरी घात
होऊ नाही देणार त्यांना अन्याय
सोडूनी मज गेलास सख्या तू||
तुझी सारी स्वप्ने
करीन मी पूर्ण
वचन देते मी तुला
हाच आहे आता माझा धर्म

कवयित्री- वाणी वेणूमाधव केरकलमटी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी