शब्दांपेक्षा अबोल जाणिवेची
शब्दांच्या पलीकडच्या भावनेची
समजुन घेणारी
एक तरी मैत्रीण असावी….
रोजच भेट व्हावी असे काही नाही
पण भेटल्यावर अंतरीची ओळख
पटवून देणारी
एक तरी मैत्रीण असावी…
फुलांप्रमाणे रंग भरणारी
अलगद दवबिंदु झेलणारी
सुगंधापरी दरवळणारी
एक तरी मैत्रीण असावी…
थोडी मिश्किल थोडी हळवी
सावळ्याच्या राधेवानी
न सांगता मनातले जाणणारी
एक तरी मैत्रीण असावी…
एक तरी मैत्रीण असावी…
– रचना : सौ. मंजुषा किवडे. पुणे
🌹खूप सुंदर कविता. मैत्री च्या नात्याची आठवण करून देणारी. 🌹
🌹अप्रतिम 🌹
🌹धन्यवाद सौ. मंजुषा किवडे 🌹
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ
मैत्रीण कविता भावली.