Thursday, February 6, 2025
Homeयशकथातरुणांनो, कधीही नाउमेद होऊ नका ! - देवेंद्र भुजबळ

तरुणांनो, कधीही नाउमेद होऊ नका ! – देवेंद्र भुजबळ

भारतात गेल्या वर्षभरात झालेल्या १ लाख ३९ हजार आत्महत्यांमध्ये ९० हजार तरुण, तरुणींच्या आत्महत्या आहेत. अशा या अत्यन्त चिंताजनक पार्श्वभूमीवर केलेले “तरुणांनो, कधीही नाउमेद होऊ नका !”  हे स्वानुभवातून केलेले आवाहन महत्वाचे आहे.
……………..संपादक

आजच्या तरुणांनी कोणत्याही गोष्टींनी कधीही नाराज होऊ नये. नाउमेद होऊ नये. कधीही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये. नाउमेद करणारे क्षण येतात आणि जातात. अपयश हे क्षणिक असते म्हणून आपली जिद्द आणि चिकाटी सोडू नका, हरवू देऊ नका असा स्वानुभवावर आधारित मोलाचा संदेश निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी तरुणांना दिला.

सह्याद्री वाहिनीवरून  १७ डिसेंबर २०२० रोजी “नमस्कार मंडळी” या कार्यक्रमात थेट प्रक्षेपित झालेली, नेहा परांजपे यांनी घेतलेली त्यांची मुलाखत नुकतीच दूरदर्शनवर पुन्हा प्रक्षेपित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, लहानपणीच माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे सर्व जबाबदारी आईवर येऊन पडली. जो काही पैसा अडका होता त्यावर आईने काही वर्ष संसाराचा गाडा ओढला. पुढे परिस्थिती बिकट झाली. मी दहावीत नापास झालो. त्यावेळी दहावीत नापास होणे म्हणजे आपण जगण्याच्या लायकीचे नाहीत, असा समज व्हायचा. म्हणून मी अकोला सोडून पुण्याला मोठ्या भावाकडे गेलो. मिळेल ते काम करीत राहिलो. फी चे पैसे जमल्यावर दीड वर्षाने दुसर्‍या प्रयत्नात दहावीची परीक्षा पास झालो.

पुढे अकरावी एका, बारावी एफ वाय दुसऱ्या तर एसवाय – टीवाय तिसऱ्याच कॉलेजात असे करीत शिकलो. शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही, असे माझ्या लक्षात आले होते. त्यातच मी पदवीधर व्हावे, असा आईचा आग्रह होता.

वाचनाची आवड लहानपणापासूनच होती. त्यातून लिखाणाची आवड निर्माण झाली. नगर येथे कॉलेजमध्ये असताना ‘समाचार’ वृत्तपत्रात व पत्रकारिता पदवी प्राप्त केल्यानंतर पुणे येथे ‘केसरी’ वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून नोकरी लागली. केसरी प्रकाशनच्या सा.सह्याद्री साठी अनेक स्टोरीज लिहिल्या. सह्याद्रीसाठी लिहिलेली शनि शिंगणापूरची कव्हरस्टोरी खूप गाजली, असे त्यांनी मुलाखतीत सांगितले.

पुढे भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शन केंद्रात नोकरी मिळुनही वरच्या पदांसाठी प्रयत्न करत राहिलो. त्यातून एक क्षण असा आला की, एकाच वेळी राजपत्रित दर्जाच्या सहा-सहा नोकऱ्या माझ्या हातात आल्या. सर्व नोकऱ्यांची तुलना करून महाराष्ट्र शासनाच्या माहिती खात्यात जिल्हा माहिती अधिकारी, वर्ग १ म्हणून रुजू झालो. तिथे पदोन्नती मिळत मी संचालक पदापर्यंत गेलो. अनेक मानसन्मान मिळाले.

तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी शासनाच्या महान्यूज पोर्टलवर शेकडो लेख लिहिले. त्यातुनच “करिअरच्या नव्या दिशा” हे पुस्तक निर्माण झाले.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या महिलांच्या यशकथा असलेले “गगनभरारी”
“प्रेरणेचेे प्रवासी” “समाजभुषण” अशी ईतर प्रेरणादायी पुस्तके लिहिली, असेही त्यांनी सांगितले.

आपल्याला जीवनात आनंदी राहायचे असेल तर आपण इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आनंद दिल्याने आपलाही आनंद वाढतो, आपले जीवन सुखी होते, असा जीवन जगण्याचा मूलमंत्र देत ‘अरे संसार संसार, एका श्वासाचे अंतर ‘ या प्रसिध्द कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं काव्यही लक्षात घेतले पाहिजे, असे मनोगत निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केले .

ही संपूर्ण मुलाखत आपण पुढील लिंकवर पाहू शकता.

आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. खूपच प्रेरणादायी मुलाखत! आपला सर्व प्रवास अनेक निराश लोकांना प्रेरणा देईल ही आशा .

  2. देवेन्द्रजी भुजबळ यांनी स्वत:च्या शिक्षण आणि परिस्थितीमध्ये घडवून आणलेले आमुलाग्र बदल हे त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोन, जिद्द आणि चिकाटीने घेतलेली सातत्यपूर्ण मेहनत यांचं फलित आहे.
    आपल्या तरूणांनी याच गोष्टी जर आत्मसात् केल्या, तर निश्चितपणे ते आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त होऊ शकतात, आपल्या आयुष्याचं खरं मोल समजून घेऊ शकतात आणि निर्धारपूर्वक आपली स्वप्नं प्रत्यक्षात उतरवू शकतात. मनापासून धन्यवाद, देवेंद्र जी..!

  3. नमस्कार, खुपच प्रेरणादायी मुलाखत. शाळेतील मुलांना, तसेच तरूणांना ही उपयोगी.धन्यवाद सर.

  4. महाराष्ट्र राज्याचे निवृत्त माहिती संचालक श्री.देवेंद्र भुजबळ हे आपल्या अनुभवांतून तरूणांना जो संदेश देतात तो निस्चितच प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द न सोडता कष्ट,
    सतत शिकण्याची तयारी ,प्रामाणिकपणा आणि समाजप्रबोधनाची इच्छा यातून त्यांनी सतत विविध माध्यमांतून तरूणांना प्रेरणा दिली आहे.विविध मुलाखती,विविध पुस्तके,पोर्टलवरून ते अव्याहतपणे हे कार्य करीत आहेत हे स्तुत्य आहे.

  5. देवेंद्र भुजबळांची ही मुलाखत सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
    राखेतून फिनीक्स जन्मतो याचेच अदाहरण त्यांनी त्यांच्या जगण्यातून दिले.
    तरुणांच्या आत्महत्या ही समाजाची गंभीर समस्या आहेच.
    त्यांना ंनिराशेपासून परावृत्त करण्यासाठी असे आदर्श हवेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी