Tuesday, September 16, 2025
Homeबातम्यापरदेशस्थ मराठी कवी संमेलन

परदेशस्थ मराठी कवी संमेलन

साहित्य कला व्यक्तीत्व विकास मंच या व्हाट्सएप समुहाचे प्रथम आंतरराष्ट्रीय कवी संमेलन नुकतेच आभासी पद्धतीने संपन्न झाले.

लेखक, कवी, आणि साकव्य समूहाचे संस्थापक श्री. पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन अतिशय बहारदार पद्धतीने साजरे झाले. संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आणि कवी श्री. संजीव दिघे उपस्थित होते.

संमेलनाचे अध्यक्ष, श्री. पांडुरंग कुलकर्णी यांच्या मनोगतातून सर्व सहभागी कवी कवयित्रींचे आणि प्रत्येकाच्या कवितेचे कौतुक केले गेले. परदेशात राहून देखील भारतीय सांस्कृतिक वारसा, विशेषतः माय मराठीचा प्रसार हे सर्व साहित्यिक करत असल्याचा अभिमान त्यांच्या बोलण्यातून जाणवला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, श्री. संजीव दिघे यांनी त्यांच्या खास विनोदी शैलीत छोटे छोटे चुटकुले सांगत सगळ्यांना हसते केले. आपल्या भाषणात प्रत्येक कवितेबद्दल त्यांनी स्वतः चारोळी रचून अथवा त्या संदर्भातली अलक सांगून उपस्थित कवी कवयित्रींचे कौतुक केले आणि मनोबल वाढवले.

या कवी संमेलनात ऑस्ट्रेलिया मधून सर्जेराव पाटील, दुबई येथून रागिणी निशित रावळीया, एरवी कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या प्राची देशपांडे यांनी भारतातून, रशिया मधून कल्याणी मसादे, नेदरलँड्स येथून शलाका कुळकर्णी, जर्मनी मधून संगीता पालवे, आणि अमेरिकेतून शिल्पा कुलकर्णी, तनुजा प्रधान आणि डॉ गौरी जोशी कंसारा या कवी, कवयित्री यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी कंसारा यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केले.

कार्यक्रमासाठी समूहाचा ध्वज बनवला ग्राफिक्सकारा, शरयू खाचणे मॅडम यांनी आणि या कार्यक्रमाचे पोस्टर बनवले श्री. मिलिंद पगारे सर यांनी. साकव्यचे हे सदस्य जरी पडद्यामागचे कलाकार आहेत तरी ते कधी साक्षात पडदा किंवा ध्वज होवून जातात हे कळतही नाही .

वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या घटिकेला असणाऱ्या ह्या सर्वांची भारताशी जोडलेली नाळ ह्या कार्यक्रमाच्या रूपाने अधिक घट्ट झाली. आपण आपल्या परिवारालाच भेटल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर शेवट पर्यंत होता.

या संपूर्ण कविसंमेलनाचा आनंद आपण पुढील लिंक वर घेऊ शकता.

https://youtu.be/4fzlfrO5so4

आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

तनुजा प्रधान

– लेखन : तनुजा प्रधान. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. भारताबाहेरही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन किती आटोपशीर झाले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं