Wednesday, December 3, 2025
Homeलेखआऊट ऑफ रेंज !

आऊट ऑफ रेंज !

कुठे आणि कधी आपले जग बदलत गेले हे कळलेच नाही. ह्याला आपणच सो कॅाल्ड झाल्यामुळे न कळतच आपणच जबाबदार आहोत.

जाणवत सगळ्यांनाच असेलही .पण बदलायचे दुसर्यांनी आपल्यासाठी !काय झालय नेमके, तर अलिप्तपणा आलाय. नको वाटते कोणाशी बोलावसे . करू नये कोणाच्या आयुष्यात लुडबुड. आपण बरे, आपले काम बरे .
कोणी कसेही वागले तरी वागू द्यावे!

वाईट कशाला व्हा ? भावनिक कोरडे पणा आलाय .एक सांगू का ? आपण सगळे रेसचे घोडे झालोय . धावून धावून दमलोय. त्यामुळे दुसऱ्यासाठी काही जाणीव राहिली नाही.  सुरक्षित आयुष्य जगण्याची धडपड करतोय .

पूर्वीच्या माणसांनी कधी आपल्या भोवती कुंपणेच आखली नव्हती त्यामुळे प्रेम जिव्हाळा , आदर , मदतीच्या भावनाची रेंज होती. आता मात्र सोशल एटिकेटस् , मॅनर्स नको तिथे जपतोय . खर तर तेच नकोय आपण करायला.

म्हणून एकटे पडत चाललोय. ह्याची झलक कोविड मध्ये मिळालीच आहे सगळ्यांना . विशेष करून हा बदल प्रकर्षाने घरगुती नातेसंबंधामध्ये जास्त जाणवू लागलाय . सुख दुख्ाचे शेअरींग आणि केअरिंग बंद झालेय . व्हॅटस अॅप वर कोरड्या शुभेच्छांचा वर्षाव असतो . कलीयुगाचा प्रभाव नक्कीच जाणवतोय .

पूर्वीच्या लोकांची पुण्याई संपत आली . बिझी बिझी असल्याची अफरमेशन्स आपण आपल्यालाच देत असतो . देव म्हणतो तथास्तु .आपणच आपल्याला आऊट ऑफ रेंज केलय . असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. मार्ग एकच जर आपल्या भोवती घातलेले कुंपण काढले तर रेंजमध्ये पुन्हा नक्कीच येऊ .
तुम्हाला काय वाटतं ?

शलाका कुलकर्णी

– लेखन:: शलाका कुळकर्णी, नेदरलँड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on धुक्याची चादर
सौ.मृदुला राजे on बहिणाबाईं…
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on प्रतिभावान प्रतिभा
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on सानपाडा : अनुकरणीय आनंद मेळावा
चंद्रकांत Chandrakant बर्वे Barve on चित्र सफर : 58
Vilas kulkarni on खळी पडू दे !
गोविंद पाटील सर on प्रतिभावान प्रतिभा
स्नेहा मुसरीफ on स्नेहाची रेसिपी : ३७