दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने सुप्रसिद्ध संगीतकार
श्री अशोक पत्की यांच्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीचा वेध घेणारा “शब्दसूरांचा जादूगार” हा लघुपट तयार केला आहे. दूरदर्शनच्या निवृत्त सहायक संचालक, निर्मात्या डॉ किरण चित्रे यांनी या लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे.
या लघुपटाचं प्रसारणपूर्व प्रदर्शन रसिक प्रेक्षक आणि मान्यवरांसाठी खास दूरदर्शन वरळी इथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली.
अशोकजींनी कुठल्याही प्रकारचा मोठेपणा किंवा आविर्भाव न ठेवता, अतिशय सहजपणे, दिलखुलास पणे स्वतःची जडणघडण, मिळत गेलेले अनुभव, त्यातून नवनवीन शिकण्याची मिळालेली संधी, या सांगितिक प्रवासात भेटलेल्या महान व्यक्ती याविषयी जशी कृतज्ञता व्यक्त केली आहे तसेच मनःस्ताप देणारे प्रसंग, व्यक्तींविषयीही मोकळेपणाने सांगितले आहे.
सर्व साधारण प्रेक्षकांची संगीताची जाण वाढविणारा हा लघुपट खरं म्हणजे सर्व संगीत विद्यालयांमध्ये, त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून समाविष्ट केला पाहिजे.
अशोकजींनी अतिशय पारदर्शकपणे सांगितलेली गीत, संगीत निर्मितीची प्रक्रिया तर इतकी वैश्विक, महत्वपूर्ण आहे की, ती सर्व जगभर जाण्यासाठी लघुपट हिंदी, इंग्रजी भाषेत डब करण्याबाबत किंवा त्या त्या भाषेतील सब टायटल्ससह दाखविण्याबाबत दूरदर्शनने विचार केला पाहिजे.
आज ६ मे रोजी सायं. 07.35 वा. आणि शनिवार दि. 07 मे रोजी दु. 01.30 वा. आणि रात्री 10.30 वा. दुरदर्शनवर प्रसारित होणारा लघुपट आपण पाहिलाच पाहिजे, असा आहे.
या लघुपटाबद्दल श्री अशोक पत्की, निर्मात्या डॉ किरण चित्रे आणि दूरदर्शन या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीतप्रवासाचा लघुपट नक्कीच श्रवणीय व माहितीपूर्ण असेल
अशोक पत्की यांच्यावरील दूरर्शनवर प्रसारित होणारा हा लघुपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार.
अशोकजी पत्कींच्यासारखे चतुरस्त्र संगीतकार झाले आपल्याकडे; पण त्यांना म्हणावं तसं वलय लाभलं नाही…
प्रशांत थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007