अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, “न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर, संगीत विभागाने नुकताच ‘नगारा संगीत महोत्सव‘ आयोजित केला होता. या महोत्सवात राज्यस्तरीय महाविद्यालयीन युवांसाठी ‘अभंग गायन स्पर्धा‘ घेण्यात आली.
या स्पर्धेमध्ये पुणे येथील युवा शाहीर होनराज मावळे याने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्याचा प्रथम क्रमांक आला. “रुपये दहा हजार (रु.१०,०००/-) व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. या पुरस्काराबद्दल होनराजचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अल्प परिचय
होनराज सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात बी. ए. च्या अंतिम वर्षात कंठसंगीताचे शिक्षण घेत आहे.
प्रसिध्द शाहीर आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे व प्राध्या.सौ.संगीता हे. मावळे यांचा होनराज मुलगा आहे.
– टीम एनसटी. ☎️ ९८६९४८४८००.
