Thursday, February 6, 2025
Homeलेखमहाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

१ मे हा महाराष्ट्र व जागतिक कामगार दिन आहे. यानिमित्ताने “सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”.

आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. महाराष्ट्र राज्य निर्माण होण्याकरिता अनेक जण हुतात्मा झाले. त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा आजचा दिवस.

महाराष्ट्राबद्दल थोर साहित्यिक राम गणेश गडकरी म्हणतात, “मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा, हा श्री महाराष्ट्र देशा, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्या ही देशा”. गडकरींनी महाराष्ट्राचे असे सुंदर वर्णन केले आहे.

आधुनिक महाराष्ट्राचे ‘शिल्पकार यशवंतराव चव्हाण’ यांच्या हाती नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली, तेव्हा ते म्हणाले “१ मे हा सोन्याचा दिवस आहे. हा मराठी भाषिकांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे.
हा दिवस प्रत्येक मराठी नागरिकासाठी महत्त्वपूर्ण असा दिवस आहे.”

दृष्टीक्षेपात महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिमेला स्थित आहे. महाराष्ट्र राज्याची ओळख ही भारतातील सर्वात धनवान व समृद्ध राज्य म्हणून आहे.

• महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे.
• लोकसंख्येच्या (12.47 लाख) दृष्टीने भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य. क्षेत्रफळाच्या (3,07,713 चौ. किमी) दृष्टीने तिसरे सर्वात मोठे राज्य.
• महाराष्ट्राची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर आहे.
• आपले राज्य हे भारताच्या सर्वात विकसनशील राज्यांपैकी एक आहे.
• महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे तर ३५८ तालुके आहेत.
• महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प जायकवाडी प्रकल्प आहे.
• महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण चंद्रपूर आहे.
• महाराष्ट्राचे सर्वाधिक पावसाचे ठिकाण अंबोली आहे.
• महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे.
• सर्वप्रथम आकाशवाणी केंद्र १९२७ मध्ये मुंबई येथे सुरू झाले.
• महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण गंगापूर येथे आहे.
• महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा, रायगड येथे आहे.
• महाराष्ट्राच्या पहिल्या राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित होत.
• महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र “दर्पण”
• महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा पंढरपूर येथे भरते.
• महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी तापी.
• महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे होते.
• महाराष्ट्रातील कागदासाठी प्रसिद्ध ठिकाण बल्लारपूर {चंद्रपूर}.
• महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षर जिल्हा मुंबई,सिंधुदुर्ग.

अशा या आपल्या महाराष्ट्र राज्याची संस्कृती, इतिहास व विकास आदीं खूप अभिमानास्पद आहे.
महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालण्यासाठी आपण कटिबध्द राहू या.
जय हिंद, जय महाराष्ट्र. 🚩

प्रियंका देशपांडे

– लेखन : प्रियंका देशपांडे. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ ९८६९४८४८००

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. 🌹 सर्वाना महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा 🌹
    खूप छान वर्णन केले आपण
    अभिमान आहे मराठी पणाचा
    🌹धन्यवाद प्रियांका देशपांडे 🌹

    अशोक साबळे
    Ex. Indian Navy
    अंबरनाथ

  2. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या ऐतिहासिक, भौगोलिक, निसर्गविषयक, विकास कार्यक्रमांतर्गत विविध प्रकल्प, पर्यावरणविषयक, जनसंपर्क माध्यमांविषयक, साक्षरताविषयक आदि कार्याचा माहितीपूर्ण आढावा प्रियंका देशपांडे यांनी घेतला आहे.अभिनंदन.

  3. छान माहिती,,

    थोडी दुरुस्ती,,,राज्याची लोकसंख्या,,,12.47 कोटी,,
    लाख नव्हे,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी