Thursday, September 18, 2025
Homeलेखपरदेशस्थ केरळवासी

परदेशस्थ केरळवासी

नमस्कार,
वाचक हो.

इतके दिवस आपण केरळचे विविधांगी दर्शन घेत आलो आहोत. आजही आपण अशाच एका गोष्टीची माहिती घेणार आहोत.

पर्यटनच्या बाबतीत केरळचा क्रमांक खूप वरचा आहे त्याबरोबरच केरळ हे शंभर टक्के साक्षरता असलेले राज्य आहे. हे सर्वांना माहिती आहेच. शिक्षणाचा पगडा सर्वसामान्यांवर फार आहे. आणि या मुळेच शिक्षण घेऊन नोकरी व्यवसाय निमित्त परदेशी जाणारे केरळवासीयही खूप आहेत. तिथे त्यांना त्यांच्या गुणवत्तानुसार नोकरी मिळते. काहीजण व्यवसाय करतात.

केरळ मधील साधारण ६० लाख लोक परदेशात वास्तव्य करतात. इतर देशांपेक्षा आखाती देशामध्ये  (सौदी, कुवेत, कतार, ओमान, बहरीन, यूएई) मल्याळी लोकांचा आकडा जास्त आहे.
काही कुटुंबासमवेत स्थायिक होतात तर काहींची कुटुंबे केरळ मध्येच असतात. ज्याच्या त्याच्या सोयीनुसार किंवा घरातील जबाबदारीनुसार कुठे स्थायिक व्हायचे ते ठरवतात.

अजून एक बाबतीत खास बाब म्हणजे केरळ मधील परिचारिका. केरळमध्ये परिचारिकेचे शिक्षण घेण्याचे प्रमाण जास्त आहे. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगतात केरळच्या परिचारिका नोकरीसाठी जातात. त्यांच्या सेवेचा उत्कृष्ट नमुना त्या त्या ठिकाणी दवाखान्यात दाखवतात.
आखाती देशात तर साधारण ७०% केरळमधीलच परिचारिका नोकरीसाठी आहेत.

आपले घर, कुटुंब, संसार सोडून लांब राहणे सोपे नसते पण तरीही या परिचारिका आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असतात.
जशी सुट्टी असेल, मिळेल किंवा काही खास विशेष कार्यक्रम असेल तेव्हा हे परदेशस्थित केरळवासी आपल्या घरी येतात कुटुंबासमवेत छान अनमोल वेळ घालवतात आणि सुट्टी संपल्यावर पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी जातात.. सोबत आठवणींना घेवून.
शेवटी प्रपंच चालवायचा म्हणजे प्रिय जणांपासून दूर जाणे, विरह अशा गोष्टी येणारच.

यांच्यामुळे राज्याच्या आर्थिक व्यवस्थेत काही प्रमाणात हातभार लागतो हे मात्र नक्की आहे.

मनिषा पाटील

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील. पालकाड, केरळ.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ९८६९४८४८००.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. मनिषा पाटील या लेखिकेने केरळच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा आढावा घेतला आहे.शिक्षण,साक्षरता,पर्यटन अशा बाबींचा उल्लेख करतानाच समाजसेवेचे कंकण हाती घेतलेल्या
    परिचारिकांची केरळमधील संख्या जास्त असल्याचा उल्लेख महत्त्वपूर्ण वाटतो.

  2. छान वर्णन केलं आपण.
    एक प्रगत राज्य केरळ आहे. प्रत्येक घरातील माणूस
    परदेशीं नौकरी करतो.
    एक गोष्ट नमूद करावीशी वाटते.
    मलेशिया आणि सिंगापूर ला जास्त केरळी आहेत.

    मलेशिया तर तामिळ ही ऑफिसिअल भाषा आहे.
    तेथे तामिळ प्रेसिडेंट होते.
    मी Navy त असताना कोचीन ला सर्विस केली आहे.

    🌹धन्यवाद सौ. मनीषा पाटील 🌹

    अशोक साबळे
    Ex. Indian Navy
    अंबरनाथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा