वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांना शासनाच्या विविध सवलती, जाहिराती मिळतात त्याप्रमाणे त्या आजच्या डिजिटल युगातील डिजिटल माध्यमांना मिळणे आवश्यक आहे जेणेकरून शासनाला तर लाभ होईलच पण डिजिटल माध्यमे सक्षम होण्यास
मदत होईल. पण त्यासाठी विविध डिजिटल माध्यमांचे संघटन होणे गरजेचे आहे. बदलत्या परिस्थितीमुळे डिजीटल माध्यमांना उज्वल भवितव्य आहे, असे विचार निवृत्त माहिती आणि जनसंपर्क संचालक देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केले.
अर्थसंकेत प्रस्तुत डिजिटल इंडिया २०२२ चर्चासत्र आणि पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री भुजबळ बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, माध्यम कोणतेही असले तरी आपली विश्वासाहर्ता कायम जपणं आवश्यक आहे. त्याच बरोबर इतरांचे सरसकट अनुकरण न करता स्वतःचे काही वैशिष्ट्य निर्माण करणे गरजेचे आहे तरच निश्चित स्वरूपाचा वाचक, प्रेक्षकवर्ग टिकून राहिल.
प्रमुख पाहुणे, डी सी बी बँकेचे डिजिटल व टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख श्री प्रसन्न लोहार यांनी नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे, एम ई पी एल समूहाचे श्री सुधीर म्हात्रे यांनी तंत्रज्ञानाशी मैत्री न केल्यामूळे उद्धवस्त झालेल्या उद्योगांची उदाहरणे देऊन आयुष्यात सतत बदलत राहणाऱ्या तंत्रज्ञानासोबत बदलत राहण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी डिजिटल बिझनेस कोच श्री जोतिराम सपकाळ व सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे माजी सेक्रेटरी जनरल श्री प्रदीप मांजरेकर यांनीही समयोचित मार्गर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजक, अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे यांनी प्रास्ताविकात बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरून पुढे जाण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले.
अर्थसंकेतच्या सह संस्थापक सौ रचना बागवे यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी पुढीलप्रमाणे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
१) बेस्ट ऑनलाईन न्यूज पोर्टल ‘हिंदुस्थान पोस्ट’ न्यूज पोर्टल – सल्लागार संपादिका सौ मंजिरी मराठे.
२) बेस्ट डिजिटल न्यूज चॅनेल, ‘कोकण नाऊ’ चॅनल – श्री विकास गावकर.
३) बेस्ट ऑनलाईन इनिशिएटिव्ह इन आंत्रप्रेनरशिप, ‘ऑनलाईन स्वराज्य’ – श्री केतन गावंड.
४) बेस्ट आंत्रप्रेनअर युट्युब चॅनल, ‘प्रोग्रेसिव्ह इंडिया वेब टीव्ही’ – श्री मनीष दळवी.
५) बेस्ट डिजिटल शेअर मार्केट अकॅडेमी, ‘शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडेमी’ – श्री शंभूराज खामकर.
६) बेस्ट बिझनेस कोच पुरस्कार – श्री दिनेश सिंघल.
७) बेस्ट क्रिएटिव्ह मार्केटिंग एजेन्सी, मैत्र एंटरटेनमेंट – श्री विनय शिंदे.
८) बेस्ट डिजिटल न्यूजपेपर, समृद्ध व्यापार – श्री दत्तात्रय परळकर.
– टीम एनएसटी. ☎️ ९८६९४८४८००
🙏🏻माननीय श्री.भुजबळ सरांनी आज चे बदलते डिजिटल युग, व डिजिटल माध्यम याबद्दल महत्त्व पूर्ण माहिती, दिल्याबद्दल मनपूर्वक सरांचे आभार💐💐
डिजिटल इंडिया २०२२ च्या चर्चासत्रात देवेंद्र भुजबळ यांनी डिजिटल माध्यमांच्या उज्वल भविष्याचे सूतोवाच करताना या माध्यमांच्या विकासासाठी आवश्यक कृतींचाही आग्रह धरला.
एका ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञाने केलेले विवेचन निस्चितच स्तुत्य आहे.
🌹हार्दिक अभिनंदन माननीय श्री. भुजबळ साहेब 🌹
आपण मांडलेले विचार नक्कीच अमलात येतील.
शासन दरबारी पाठपुरावा मात्र जरुरी आहे.
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ